Monday 29 May 2017

Jackfruit subjee / फणसाची भाजी






Jackfruit subjee -  My magic

Measurement: 3-4 people

Ingredients:

 1 medium sized raw jackfruit, (I took the one which measured almost 750gms), fresh grated coconut-1/2 cup, finely chopped coriander 1/2 cup, red chili powder 1 teaspoon, field beans - 1/4 cup (soaked for 8 hrs, skin removed and cleaned), jaggary 1 tablespoon, salt as per taste, for tempering - -oil, mustard seeds, asafoetida, turmeric powder, 4-5 red dry chilies.



Method:

cut the jackfruit in big cubes with skin  and pressure cook for 2 whistles (so that it becomes easier to clean the jackfruit).After cooker gets cooled down, clean the jackfruit by removing the skin and cut it in small pieces. remove the skin of the seeds and cut the seeds in two pieces.

Now heat 3 tablespoon oil in a pan and add mustard seeds, asafoetida, turmeric powder. Add soaked field beans and cover the pan for a minute. Now add the cleaned jackfruit with seeds, red chili powder, salt, jaggary, half of the grated coconut and half of coriander leaves. Now cook the vegetable on slow flame for 5 minutes.
Now again in a small pan, heat 2 tablespoon oil and make the tempering of mustard seeds, asafoetida, turmeric powder, 4-5 red dry chilies and add on top of the vegetable. Garnish with left coconut and coriander leaves and serve it with rice bhakri/jowar bhakri.

Note: This subjee requires much more oil and tempering than the other subjees/vegetables. Then only it tastes very nice. This subjee has a nice aroma of asafoetida. So use more than usual. I used 1 teaspoonful of asafoetida randomly.
The more you use grated fresh coconut and coriander leaves and tempering, it tastes nice. Just Yummy.
This style is from Konkan region of Maharashtra. You can use horsegram/soaked groundnuts also insteas of these field beans.




फणसाची भाजी - माय मॅजिक

वाढणी: ३-४ व्यक्तींसाठी

साहित्यः

१ भाजीचा फणस (मी घेतलेला पाउण किलो होता), ओला नारळ खोवून अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, तिखट १ टीस्पून, भिजवून सोललेले वाल - १/४ वाटी, गूळ - १ टेबलस्पून, मीठ चवीनुसार. फोडणीसाठी तेल, मोहरीहिंग, हळद, लाल  सुक्या मिरच्या ४-५.



कृती:

 भाजीचा फणस चिरून त्याचे मोठे तुकडे केले आणि कुकरला २ शिट्ट्या होईतो वाफवले. (त्यामुळे फणस साफ करायला सोपा जातो.) थंड झाल्यावर फणस नीट साफ करून, साली काढून, त्यातल्या आठळांवर जो पापुद्रा असतो तो काढून टाकून त्यांचे दोन दोन तुकडे करून घेतले. 

पातेल्यात नेहमीपेक्षा जास्त तेलाची म्हणजे जवळपास ३ टेबलस्पून तेलाची फोडणी केली. हिंगावर जरा जास्तच सढळ हात ठेवला.:) त्यात वाल घालून एक वाफ आणली. मग त्यात सोललेला फणस, आठळांचे तुकडे घातले. तिखट, मीठ, गूळ घातले.थोडे ओले खोबरे आणि कोथिंबीर घातली. ५ मिनिटे भाजी शिजू दिली. नंतर एका कढल्यात परत दोन टेबलस्पून तेलाची जास्त हिंगाची चरचरीत फोडणी केली. त्यात सुक्या मिरच्याही घातल्या. आणि वरून ही फोडणी भाजीवर घातली. खोबरे आणि कोथिंबीर घालून तांदळाच्या भाकरीबरोबर वाढली.

सूचना: मी ही भाजी कोकणात आमच्याकडे करतात त्या पद्धतीची दिली आहे.
या भाजीला एकूणच खोबरे, कोथिंबीर आणि चरचरीत तेलाची फोडणी हे जास्त लागतं. हिंगाचा ह्या भाजीला एक सुरेख स्वाद येतो.
वालाऐवजी तुम्ही या भाजीत हरभरे, काळे वाटाणे किंवा भिजवलेले शेंगदाणेही घालू शकता.



Sunday 28 May 2017

Akkha masoor / अख्खा मसूर




Akkha masoor- My magic

Measurement: 3-4 people

Ingredients:

1 cup whole red lentils, 1 onion, 1 tomato, 1 teaspoon ginger-garlic paste. ¼ cup grated dry coconut, 1 teaspoon sesame seeds, 1 teaspoon goda masala, ½ teaspoon coriander-cumin seeds powder, ½ teaspoon garam masala, 1.5 teaspoon red chili powder, salt as per taste, finely chopped coriander leaves for garnishing., Water as required. For tempering –oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder.

Method:

wash whole red lentils 5-6 times in water and pressure cook it for 4 whistles. It should not be uncooked or too mushy.
Dry roast sesame seeds and grated coconut. Finely chop onion and tomato.
Now grind sesame seeds, coconut, ginger-garlic paste and 2 teaspoon chopped onion without water.

Heat oil in a pan. Add  mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder. Add the ground mixture and sauté. Add onion and sauté it till the onion gets translucent. Add tomato and sauté for a minute. Add chili powder, cumin seeds-coriander powder and cooked masoor/red lentils. Add goda masala and garam masala. Add water as per requirement and salt as per taste. This curry is of semi dry type. At the time of serving, garnish with chopped coriander leaves. 

Serve it with soft rotis/ jowar roti, sliced onion and lemon.



अख्खा मसूर  : माय मॅजिक

वाढणी-३-४ व्यक्तींसाठी

साहित्यः

 १ वाटी अख्खे मसूर, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/४ वाटी सुके खोबरे किसून, १ टीस्पून तीळ, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर , १/२ टीस्पून गरम मसाला, १.५ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, सजावटीकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.

कृती:

 अख्खे मसूर  ५-६ वेळा स्वच्छ धुवून कुकरमधून ४ शिट्ट्या काढून मउ शिजवून घ्यावेत. मसूर चा गाळही होता कामा नये आणि ते कच्चटही रहाता कामा नयेत.
एका पातेल्यात तीळ खमंग भाजून घ्यावेत. त्यातच सुके खोबरेही भाजून घावे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
तीळ, खोबरे, आलं लसूण पेस्ट आणि चिरलेल्या कांद्यातला थोडासा कांदा मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.

नेहमीसारखी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद याची फोडणी करून वाटलेले मिश्रण घालून जरासे परता. त्यात उरलेला कांदा घालून सोनेरी रंग येइतो परता. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परत थोडेसे परता. तिखट, धने-जिरे पावडर घाला, शिजवलेले मसूर घाला.गोडा मसाला, गरम मसाला, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. ही उसळ अगदी कोरडी नसली तरी फार घट्टही नसते. वाढताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी/ मौसूत पोळ्या, कांदा, लिंबाची फोड
 याबरोवर द्या.

Friday 26 May 2017

Shev-bhaaji/शेवभाजी




Shev-bhaaji -My magic

Measurement-for 3-4 people

Ingredients:

 1 big onion, 1 medium tomato, 2 tablespoon dry grated coconut, 1 teaspoon cumin seeds, 1 teaspoon ginger-garlic paste, 1 bay leaf, 1 black cardamom, ½ inch piece of cinnamon stick, 1-1.5 teaspoon red chili powder, 1 teaspoon garam masala, ½ teaspoon cumin-coriander powder,  salt as per taste, 1-1.5 teaspoon sorghum (jowar) flour, oil, mustard seeds, asafetida, turmeric powder, 6 cups water, finely chopped coriander leaves, 150-200 grams spicy red coloured thick shev.

Method: 

chop onion and tomatoes. Dry roast grated dry coconut. Grind together ginger-garlic paste, cumin seeds, roasted coconut and 1 teaspoon of chopped onion from mixer. Heat one teaspoon oil and roast the jowar flour on slow flame till it gets a good aroma. Keep it aside in a plate.
Now heat oil again and add bay leaf, black cardamom, cinnamon stick mustard seeds, asafetida, turmeric powder. When it splutters, add the ground mixture and sauté till its raw taste goes off. Add onion and sauté till it gets golden brown colour. Add tomato and sauté again. Add 6 cups of water. Add red chili powder, garam masala, cumin-coriander seeds powder, salt and bring to a boil. Add the roasted jowar flour slowly in this curry and mix well so that no lumps formed. With this the curry becomes somewhat thicker and very nice in taste. Add chopped coriander leaves and switch off the gas.

While serving, add this curry in a bowl and add shev in it. Shev bhaaji is ready. This tastes good with roti, bhakri and pav also.


Note: Add shev only at the time of serving. Otherwise this bhaaji will be a big mess.


शेवभाजी - माय मॅजिक

वाढणी-३-४ व्यक्तींसाठी

साहित्यः
१ मोठा कांदा, १ मध्यम टोमॅटो, २ टेवलस्पून सुके किसलेले खोवरे, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, १ तमालपत्र, १ मसाला वेलची, १/२ इंच दालचिनीचा तुकडा, १ -१.५ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून गरम मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर, चवीनुसार मीठ, ज्वारीचे पीठ- १-१.५ टीस्पून, तेल, मोहरी, हिंग, हळद, आवश्यकतेनुसार पाणी (मी ६ वाट्या घेतलं.)  बारीक चिरलेली कोथिंबीर, १५० ते २०० ग्रॅम्स जाड लाल रंगाची मसालेदार जाड शेव.

कृती: 

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. किसलेले खोबरे कोरडेच भाजून घ्या. आलं-लसूण पेस्ट, जिरे, खोवरे आणि थोडासा कांदा  मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.  एक टेस्पून तेलावर ज्वारीचे पीठ मंदाग्नीवर खमंग भाजून घेउन एका डिश्मध्ये काढा.

आता पातेल्यात तेल तापत ठेवा. तापलं की त्यात तमालपत्र, १ मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा आणि मोहरी, हिंग, हळद घाला. त्यात वाटण घालून कच्चा वास जाईतो परता. चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येइतो परता. टोमॅटो घाला. परत थोडं परता. त्यात ६ वाट्या पाणी घाला. तिखट, मीठ, धने-जिरे पावडर आणि गरम मसाला घाला. छान उकळी आली की भाजून ठेवलेले ज्वारीचं पीठ हळूहळू या रश्श्याला लावा. याने तो खमंग आणि थोडा घट्ट होईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.
खायला देताना बाउल मध्ये हा रस्सा घालून त्यावर ही शेव घालून द्यावी. झटपट शेव - भाजी तयार.

 ही भाजी पोळी, भाकरी, पाव कशाहीबरोबर छान लागते.

सूचना: भाजीमध्ये शेव अगदी आयत्यावेळी घाला. नाहीतर लगदा होतो.

Wednesday 24 May 2017

Spicy Misal / झणझणीत मिसळः


Spicy Misal


Spicy Misal (Mixture)-My magic

Measurement : 3-4 people

Ingredients

 1. For Usal/semi dry spiced curry: Sprouted moth beans 250 grams, red chili powder 1 teaspoon, goda masala 1 teaspoon, ½ teaspoon amchoor powder, salt as per taste, 1 pinch of sugar. For tempering : oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, 8-10 curry leaves.

2. For spicy curry (कट्/तर्री) : oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, 5-6  curry leaves, 4-5 mint leaves, ginger-garlic paste 1 teaspoon, 2 small onions, 1 Tomato, 1 teaspoon coriander-cumin seeds powder, ½ teaspoon garam masala, 1 teaspoon red chili powder, salt as per taste, 1 pinch sugar, amchoor powder if required, 2 teaspoon farsan (salty savory snack mixture)

3.For serving: farsan, finely chopped 2 onions, 1 tomato, coriander leaves, lime and pav. (bread)

Method

1. Usal: Pressure cook  sprouted moth beans for 2 whistles. Heat oil in a pan and add  oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, 8-10 curry leaves. Add moth beans and add all the spices mentioned for usal. It should be semi dry.

2. Spicy curry:  Grind 2 onions to a very smooth paste. Make puree of one tomato.
Heat 2 tablespoon oil in a pan. Add mustard seeds, cumin seeds, asafetida, 5-6  curry leaves, 4-5 mint leaves, ginger-garlic paste. Saute it. Add pureed onions and sauté it. Then add tomato puree and again sauté it till the oil separates. Add coriander-cumin seeds powder, garam masala, red chili powder, and a pinch of sugar. Add water. Add salt and amchoor powder as per taste. Let it boil. This curry is hot, spicy but watery. For making it somewhat thick, grind 2 teaspoons of farsan to a fine powder and add it to curry.

Now take one serving bowl. Add usal as first layer, then curry, farsan and on top add finely chopped onion, tomato and coriander leaves. Add a lemon piece on top of it and serve it with bread. Here, I have served it with wheat bread.

You can add boiled potatoes also for garnishing and in usal if you want.


झणझणीत मिसळः माय मॅजिक
वाढणी: ३-४ व्यक्तींसाठी
साहित्य:
१. उसळीसाठी: मोड आलेली मटकी पाव किलो, तिखट १ टीस्पून, गोडा मसाला एक टीस्पून, १/२  टीस्पून आमचूर पावडर , चवीनुसार मीठ, चिमूट भर साखर. फोडणीकरता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, ८-१० कढीपत्त्याची पाने.
२. कट/तर्री साठी: फोडणीकरता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद,५-६ कढीपत्त्याची पाने, ४-५ पुदिना पाने, आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून, २ छोटे कांदे, १ टोमॅटो, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून  तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, आमचूर पावडर १/२ टीस्पून ऐच्छिक, २ चमचे फरसाण.
३. सजावटीसाठी: बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर,  टोमॅटो, फरसाण, लिंबाची फोड, पाव.

कृती:
१) उसळ:
 नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली.
२) कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून छान परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी मिसळ नुसतीच तिखटजाळ करण्यापेक्षा ती सणसणीत होईल पण घशात येणार नाही अशी करते. हे परतल्यावर त्यात चिमूट्भर साखर घालून पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि यातही थोडी आमचूर पावडर घातली. तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं Description: https://www.facebook.com/images/emoji.php/v8/f57/1/16/1f609.png;) हवी तेवढीच दाट होते याने तर्री.

मग नेहमीप्रमाणे बाउल मध्ये आधी उसळ, मग तर्री, मग फरसाण घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सजवली. एक लिंबाची फोड आणि गव्हाचा पाव याबरोबर फन्ना पाडण्यास दिली घरच्यांना. 

यात तुम्ही हवा असल्यास उकडलेला बटाटाही वापरू शकता. तेव्हा तो उसळीत आणि  वरून कांदा कोथिम्बीरी बरोबर घालावा.


Monday 22 May 2017

Dakshin Davangiri Loni Sponge Dosa (Butter dosa) / दक्षिण दावण गिरी लोणी स्पंज डोसा


Dakshin Davangiri Loni Sponge Dosa

Dakshin Davangiri Loni Sponge Dosa (Butter dosa) My magic
Measurement: For 3-4 people
Ingredients: 4 cups Rice, 1/2 cup sago, 1/2 cup split black gram, 1 cup puffed rice-thick one, 1/2 teaspoon fenugreek seeds, 1/2 teaspoon baking soda, salt as per taste, water and white butter.
Method: Soak all the ingredients above except baking soda & salt for 5 hours. After that, grind to a fine paste and add salt, baking soda and keep overnight for fermentation.
 Before making dosa, add sufficient water so that the batter will spread evenly on hot griddle. You won't have to spread with the help of a cup.
Heat a griddle and while spreading dosa, keep the flame on slow mode. Put some white butter pieces on the dosa. When the upper side looks looked, turn the dosa and cook the other side.

Dosa batter on griddle with butter on 

 Spongy Texture of Dosa
Serve it hot with Potato Subji, Chutney, Sambar.

दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा
दक्षिण दावण गिरी लोणी स्पंज डोसा - माय मॅजिक
वाढणी- ३-४ व्यक्तींसाठी
साहित्य:
४ वाट्या तांदूळ, १/२ वाटी साबुदाणा, १/२ वाटी उडीद डाळ, १ वाटी जाडे पोहे, १/२ चमचा मेथी दाणे, १/२ टीस्पून खायचा सोडा, चवीनुसार मीठ, पाणी, डोशावर घालण्यासाठी पांढरे लोणी.


 कृती:
वर दिलेले सर्व साहित्य ५ तास भिजत ठेवणे. नंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणे. त्यात खाण्याचा सोडा व मीठ घालून पीठ आंबण्याकरिता ठेवून द्यावे. डोसा करण्यापूर्वी त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. (डावाने पीठ घातले की आपोआप तव्यावर पसरायला हवं. वाटीने पसरायचं नाही. जाळी नीट पडत नाही.
डोसा तव्यावर घालून लोणी घातल्यावर
तवा चांगला गरम झाला की मंदाग्नीवर गॅस ठेवून डोसा घाला. वरून लोणी घाला आणि वरील बाजू सुकली की एकदाच डोसा पलटा.
डोशाचा मऊ  पोत आणि पडलेली जाळी
चटणी, बटाटा भाजी, सांबार याबरोबर खाण्यास द्यावा.



Saturday 20 May 2017

Cucumber Thalipeeth / काकडीचे थालीपीठ



Cucumber Thalipeeth (pancake):

Measurement : for 2 people

Ingredients: 
4 cucumbers (1 cucumber for 1 pancake/thalipeeth), 1 teaspoon cumin seeds, 1/2 teaspoon Turmeric Powder, 5 green chilies, 8-10 garlic cloves, 1/2 inch ginger, 1 tablespoon chickpea flour (besan), salt as per taste, Rice flour as per requirement. (I took 2.5 cups)

Method:
Wash and peel the cucumbers, grate them and add a pinch of salt. rest for half an hour. Meanwhile coarsely grind the chilies, garlic, ginger and cumin seeds from mixer.
Now press the grated cucumber between palms and take of the water. Don't discard the water as we will use this for making the dough for thalipeeth if required.
Now add turmeric, ground paste, salt, chickpea flour in the grated cucumber. Now slowly add the rice flour to make a nice soft dough for making thalipeeth.If more water is needed, take the cucumber water kept aside .

Take a griddle. Apply a little oil to it and  with the help of your palm, take a ball size dough and spread on griddle like a pancake. Make some holes in it so that it gets cooked easily. Add some drops of oil in each hole and cover it. Put it on a medium flame for 2 minutes. Turn the side and let it cook from the other side without cover. Put some oil on the sides of thalipeeth. 

Serve this with Onion-Tomato salad.Don't chop onions and Tomatoes too fine.. Rather keep them rustic style big pieces. Add rock salt, chaat masala , black pepper powder and coriander leaves. That's it.

Note: This thalipeeth tastes very good when its hot. So try to serve and eat hot.☺☺



काकडीचे थालीपीठ
वाढणी- २ व्यक्तींकरिता.

साहित्यः 

४ काकड्या (१ काकडीचे १ थालीपीठ ), १ चमचा जिरे, १/२ चमचा हळद, ५ हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ टेबलस्पून डाळीचं पीठ (बेसन), मीठ चवीनुसार, तांदूळ पीठ काकडीच्या किसात मावेल तेवढं. मला २.५ वाट्या लागलं.

कृती: 
काकड्या धुवून, साले काढून, किसून घ्या. मीठ लावून थोडावेळ तो कीस तसाच असूद्या. तोपर्यंत मिरच्या, लसूण, आलं आणि जिरं यांची मिक्सर मधून भरडसर पूड करून घ्या.
काकडीचा कीस व्यवस्थित पिळून त्यातलं पाणी एका भांड्यात काढून ठेवा. थालीपीठाचं पीठ भिजवण्यासाठी लागलं तर हेच पाणी वापरायचं. 
काकडीच्या किसात वाटलेले मिश्रण, हळद, डाळीचं पीठ घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आता थालीपीठ करण्यासाठी जेवढं पीठ आवश्यक असेल तेवढं तांदळाचं पीठ घाला.
तव्याला तेल लावून त्यावर छान थालीपीठ लावा. थालीपीठाला भोके पाडा आणि तेल सोडा. झाकण ठेवून एकीकडून थालीपीठ शिजूद्या. नंतर थालीपीठ उलटून झाकण न ठेवता तेल सोडून खरपूस भाजून घ्यावं. 

वाढताना कांदा-टोमॅटोच सॅलड बरोबर द्यावं. - हे करताना कांदा-टोमॅटो चे मोठे तुकडे करून त्यात सैंधव, मीरपूड , किंचित चाट मसाला आणि कोथिंबीर घातली आहे.

विशेष सूचना- हे थालीपीठ "तव्यावरून ताटात" असेच खावे. थंड झाल्यावर तितकी चव येत नाही.  

Udid ghuta (split black gram curry) /उडदाचं घुटं. (उडदाची आमटी)



Udid ghuta (split black gram curry) – My Magic

Measurement for 3-4 people.

Ingredients:

 ¼ cup Split Black Gram, 2 inch dry coconut- grated, 1 teaspoon cumin seeds, 10-12 garlic cloves, 4 hot green chilies (please take according to your taste), 3 kokam , salt according to taste. For tempering –oil, mustard seeds, asafetida, turmeric powder, water.

Method:

 Dry Roast Split black gram and pressure cook it with sufficient water for 2 whistles.
Grind dry grated coconut, cumin seeds, garlic cloves and green chilies roughly in mixer.
Now, heat oil and add mustard seeds, asafetida, turmeric powder, and the ground masala. Saute till oil separates. Add cooked and mashed daal.   Add kokum, salt and bring it to boil.
This curry/aamti tastes best with roti or rice. This curry doesn’t require any other spices. And this curry is always thin.

Note: Some people prefer buttermilk to kokum. If you are going to add buttermilk, then add it at the time of serving. 




उडदाचं घुटं. (उडदाची आमटी) - माय मॅजिक

वाढणी-३-४ जणांसाठी
साहित्य: 
पाव वाटी उडीद डाळ, २ इंच सुके खोबरे-किसून, १ चमचा जिरे, १०-१२ लसूण पाकळ्या, ४ तिखट मिरच्या (किंवा आपल्या आवडीप्रमाणे), ३ कोकम, मीठ, पाणी. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग,हळद.
कृती:
उडदाची डाळ भाजून पाणी घालून कुकरमधून तीन शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची. सुके खोबरे, जिरे, लसूण पाकळ्या,  मिरच्या (तुमच्या आवडीप्रमाणे), मिक्सर मधून फिरवून घ्या.
तेल, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करून त्यात ते वाटण तेल सुटतो परता. त्यात घोटलेली उडदाची डाळ घाला. पाणी घाला. ही आमटी पातळ च असते. त्यामुळे पाणी बरच लागतं. (३-४ वाट्या). चवीनुसार मीठ आणि ३ कोकम (आमसूल ) ही घाला. उकळली की उडदाचं घुटं तयार. पोळी-भाकरी किंवा भाताबरोबर फस्त करा.
हिला लसूण आणि जीरे मिरचीचाच सुंदर स्वाद असतो. बाकी मसाले घालायचे नाहीत. 
जर कोकम नको असेल तर काहीजण ताकही घालतात. पण मग ते आयत्यावेळी घ्यायचं. नाहीतर ते आमटीत फुटतं.



Friday 19 May 2017

Split green Gram curry/मोडाच्या मुगाची आमटी:




Split green Gram curry:

Measurement : for 3-4 people

Ingredients:

sprouted split green gram 250 grams, 1 medium onion, 7-8 garlic cloves, ½ inch ginger, 4 green chilies, 2 Teaspoon fresh scrapped coconut, 1 teaspoon chopped coriander leaves, 1 teaspoon salt, ½ teaspoon sugar, 1 teaspoon goda masala, for tempering: oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder, curry leaves 5-6, water as per requirement.

Method:

Pressure cook sprouted green gram for 2 whistles. Roast Onion, ginger piece and garlic cloves directly on gas flame.  when it cools down , chop onion, clean the garlic cloves and grind with green chilies in mixer.
Now Heat oil in a pan. Add mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder, curry leaves and the ground masala till the oil starts separating.  Add cooked green grams, goda masala, salt, sugar, coconut. Coriander leaves, and water as required. I took 5 cups water. Boil for 5 minutes.
The curry tastes good with hot rice and/or rotis.




मोडाच्या मुगाची आमटी:

वाढणी – ३-४ व्यक्तींसाठी.

साहित्यः

मोड आलेले मूग २५० ग्रॅम्स, १ कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, ४ हिरव्या मिरच्या, २टीस्पून ओले खोबरे, १ टीस्पून चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून साखर, १ टीस्पून गोडा मसाला. फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्त्याची ५-६ पाने, आवश्यकतेनुसार पाणी.


कृती:

पहिल्यांदा मोड आलेले मूग कुकरमधून २ शिट्ट्या काढून वाफवून घ्या. गॅसच्या ज्योतीवर कांदा, आल्याचा तुकडा आणि लसणीच्या  पाकळ्या भाजून घ्या.  थंड झालं की मिरच्या, कांदा सोलून, बारीक चिरून, लसूण सोलून आणि आल्याचा तुकडा एकत्र मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
पातेल्यात तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात क्रमाने  मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्त्याची पाने  घालून वाटलेला मसाला तेल सुटेतो परतून घ्यावा. वाफवलेले मूग घालावे. गोडा मसाला, मीठ, साखर, ओले खोबरे, कोथिंबीर आणि पाणी घालावे. (मी ५ वाट्या पाणी घेतलं होतं.) २ उकळ्या येउ द्याव्यात.

मुगाची आमटी तयार आहे. गरम गरम भाताबरोबर किंवा पोळ्यांबरोबर ही खूप सुरेख लागते.

Sesame seeds chutney / तिळाची चटणी



Sesame seeds chutney:  My magic

We don’t enjoy our meals without the chutneys, salads and pickles. We enjoy all these types. Don’t we? So here is one basic chutney that you will enjoy.

Ingredients:

 1 cup roasted sesame seeds, 1 cup curry leaves, 12-15 dry red chilies, ½ cup dry  grated coconut, ½ cup roasted groundnuts, ½ teaspoon asafetida, 1 teaspoon/ as per taste- salt, 1 pinch sugar, 2 teaspoon oil.


Method

Heat Oil in a pan. Add asafetida and curry leaves and sauté. Take out and keep aside. In the same oil, sauté dry red chilies and grated coconut. Let all these ingredients cool down.
In mixer, add sesame seeds, groundnuts and all the ingredients and grind roughly/  prepare with the help of mortar and pestle.




तिळाची चटणी: माय मॅजिक

आपलं जेवण कधीही चटणी, लोणची, कोशिंबिरी याशिवाय पूर्ण होउ शकत नाही. हे सगळं हवंच. त्याशिवाय जेवणाला काय मजा? नाही का? तर आज पाहू तिळाची चटणी:

साहित्यः

भाजलेले तीळ १ वाटी, कढीपत्त्याची पाने १ वाटी, १२-१५ सुक्या लाल  मिरच्या, १/२ वाटी सुकं खोबरं किसून, १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/२ टीस्पून हिंग पावडर१ टीस्पूग/ चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, २ टीस्पून तेल.

कृती:

 पहिल्यांदा एका कढईत तेल घेउन त्यात हिंग घालावा. त्यातच कढीपत्ता पानेही परतून घ्यावीत आणि बाजूला काढून ठेवावीत. त्याच तेलात मिरच्या आणि किसलेले खोबरेही परतून घ्यावे. हे सगळं थंड झालं की शेंगदाणे आणि तिळासह मिक्सरमधून अर्धबोबडं वाटून घ्यावं किंवा खलबत्त्यात चटणी कुटावी, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर मीठ घालावे.
सुंदर तोंडीलावणे तयार.

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...