Dahivada:
Everybody likes Dahivada, a famous south indian snack item. So, here is a recipe for the yummy and delicious dahivada.
Ingredients:
For Vada: 1 cup split black gram, 2 green chilies, 1/4 inch ginger, 4-5 black peppercorns, 7-8 curry leaves, salt as per taste, Curd: 1/2 kg, 3 teaspoon sugar, salt as per taste.
For chutney: tamarind-lemon size ball, jaggery equal to tamarind, 7-5 dates, coriander-cumin seeds powder 1/4 teaspoon, red chilly powder 1/4 teaspoon, salt as per taste.
for garnishing: powdered peppercorns, red chilly powder, finely chopped coriander leaves.
For frying: Cooking Oil
Method: soak Black gram in water for 4-5 hours . Clean tamarind and dates and soak it also in water.
prepare a very thin buttermilk from 5 teaspoon curd for dipping the vadas after frying. With this, the taste of vada enhances.
Take the rest of curd, whisk it and add sugar and salt. keep this mixture in fridge.
Now, add jaggery in the soaked tamarind and dates and pressure cook this mixture till 2 whistles. Let it cool. Grind this to a very fine paste so that there will be no need to sieve this mixture/ pass through a muslin cloth. Add Chilly powder, salt, cumin-coriander seeds powder in this chutney and bring to boil. This chutney is thick.
Now grind the black gram with the help of very little water. Add chilies, ginger, peppercorns and salt while grinding. Cut the curry leaves roughly with hand and mix it to the batter. Now mix this batter vigorously with the help of your palms. The batter should become very light.
Prepare vadas in hot oil but on a low flame. Otherwise the vadas will get burn from outside and will remain uncooked from inside.
After frying, Dip these vadas in the thin buttermilk till the next lot gets fried. Take the soaked vadas out and press them with the help of your palms and take the water out. Likewise prepare all the vadas.
fried vadas |
the soaked vadas taken out |
Now, take a bowl. Place 4-5 vadas in it, pour sufficient amount of prepared curd, Add peppercorn powder, red chilly powder, chutney and coriander leaves and serve .
Dahivada |
सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे दहीवडा. मस्तच लागतो तो. तर काल आमच्याकडे हाच बेत. किती किती कारणं त्याची - एक तर शनिवार म्हणून मारुतरायाला उडदाने मस्का मारायचा. दुसर्या दिवशी चतुर्थी म्हणून रात्री काही उरायला नको, सगळे मजेत काय बरं खातील? असला डोस्क्याला व्याप नको.... हुश्श. तर कसा केला ते देतेय.
साहित्यः
वड्यांकरिता: १ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, ४-५ मिरीचे दाणे, कढीपत्त्याची ७-८ पाने, चवीनुसार मीठ
दही: अर्धा किलो, ३ चमचे साखर, मीठ चवीपुतं.
चिंच-खजुराची दाट चटणी- मोठ्य लिंबाएवढी चिंच, ७-८ खजूर, चिंचे एवढाच गूळ, धने-जिरे पावडर पाव चमचा, लाल तिखट पाव चमचा,मीठ
सजावटी साठी : मिरपूड, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर.
तळण्यासाठी-तेल.
कृती: उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवा. त्याच प्रमाणे चिंच साफ करून आणि खजुरातल्या बिया काढून दोन्ही एकत्र भिजत घाला.
अर्धा किलो दह्यातील अगदी थोडसं दही बाजूला काढून उरलेलं दही छान फेटून त्यात साखर आणि मीठ घालून फ्रीज मध्ये ठेवून द्या.
बाजूला काढलेल्या दह्याचं अगदी पातळ ताक करून घ्या. तळलेले वडे पाण्याऐवजी या अगदी पातळ पाण्यात बुडवायचे. यामुळे हे वडे पांचट लागत नाहीत.
आता चिंच-खजूर एका कुकरच्या भांड्यात घेउन त्यातच (आधीच साफ केलेलं असल्याने चिंचेत रेषा वगैरे कचरा नसतोआ) गूळ घाला आणि मस्त २-३ शिट्ट्या काढून हे शिजवून घ्या. थंड झालं की मिक्सर मधून बारीक वाटा. हे खूप मऊ शिजतं आणि शक्यतो गाळायला लागत नाही. मग एका भांड्यात हे मिश्रण घेउन त्यात धने-जिरे पावडर, तिखट आणि मीठ घाला. एक-दोन सणसणीत उकळ्या येउद्या. झाली चटणी. ही फार पातळ नको. घट्ट्च हवी. ही पण थंड करून घ्या.
वडे करण्यासाठी डाळ लागलंच तर पाणी घालून बारीक वाटा. त्यातच मिरची, आलं मिरीदाणे आणि मीठ घाला. कढीपत्याची पानं हातानेच तोडून घाला. तेल तापत ठेवा एकीकडे आणि आता सगळी शक्ती एकवटून हे पीठ खूप फेसा. अगदी हलकं झालं पाहिजे. पाहिजे तर घरातल्या शक्तिमानची मदत घ्या चमच्याने किंवा हाताने तेलात वडे घाला. मंदाग्नी वरच तळा. नाहीतर आतून वडे कच्चे आणि वरून करपलेले होतात. तळलेले वडे आपण केलेल्या पांचट ताकात बुडवा. (दुसरा घाणा होईतो). बाहेर काढताना वडे छान दाबून त्यातलं पाणी काढून टाका. या पद्धतीने सगळे वडे करून घ्या.:
तळलेले वडे: |
तळून पाण्यातून काढलेले वडे पुढचं एकदम सोप्पं आहे. घ्या हवा तो बाउल, त्यात हे ४-५ वडे घालून त्यावर दही घाला, तिखट, मिरपूड, चिंचेची चटणी आणि कोथिंबीर भुरभुरा आणि... आणि काय? करा स्वाहा.. |
दहीवडे |
This recipe has been posted by me on 14.05.2017 at 10.30 pm
ReplyDelete