Split green Gram
curry:
Measurement : for
3-4 people
Ingredients:
sprouted split green gram 250 grams, 1 medium onion, 7-8 garlic cloves, ½ inch
ginger, 4 green chilies, 2 Teaspoon fresh scrapped coconut, 1 teaspoon chopped
coriander leaves, 1 teaspoon salt, ½ teaspoon sugar, 1 teaspoon goda masala,
for tempering: oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder,
curry leaves 5-6, water as per requirement.
Method:
Pressure
cook sprouted green gram for 2 whistles. Roast Onion, ginger piece and garlic
cloves directly on gas flame. when it
cools down , chop onion, clean the garlic cloves and grind with green chilies
in mixer.
Now Heat oil in a
pan. Add mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder, curry leaves
and the ground masala till the oil starts separating. Add cooked green grams, goda masala, salt,
sugar, coconut. Coriander leaves, and water as required. I took 5 cups water. Boil for 5 minutes.
The curry tastes
good with hot rice and/or rotis.
मोडाच्या मुगाची आमटी:
वाढणी – ३-४ व्यक्तींसाठी.
साहित्यः
मोड आलेले मूग २५० ग्रॅम्स, १
कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, ४
हिरव्या मिरच्या, २टीस्पून ओले खोबरे, १ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून
साखर, १ टीस्पून गोडा मसाला. फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे,
हिंग,
हळद,
कढीपत्त्याची
५-६ पाने, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती:
पहिल्यांदा मोड आलेले मूग कुकरमधून २
शिट्ट्या काढून वाफवून घ्या. गॅसच्या ज्योतीवर कांदा, आल्याचा तुकडा
आणि लसणीच्या पाकळ्या भाजून घ्या. थंड झालं की मिरच्या, कांदा सोलून,
बारीक
चिरून, लसूण सोलून आणि आल्याचा तुकडा एकत्र मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
पातेल्यात तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात
क्रमाने मोहरी, जिरे, हिंग,
हळद,
कढीपत्त्याची
पाने घालून वाटलेला मसाला तेल सुटेतो
परतून घ्यावा. वाफवलेले मूग घालावे. गोडा मसाला, मीठ, साखर,
ओले
खोबरे, कोथिंबीर आणि पाणी घालावे. (मी ५ वाट्या पाणी घेतलं होतं.) २ उकळ्या येउ द्याव्यात.
मुगाची आमटी तयार आहे. गरम गरम भाताबरोबर किंवा
पोळ्यांबरोबर ही खूप सुरेख लागते.
This recipe has been posted by myself on 19.05.2017 @ 9pm.
ReplyDelete