Thursday, 18 May 2017

Puranpoli / पुरणपोळी



PURANPOLI 

Each home has its own traditional way to prepare each food item. My house is no exception. We don't like very thin puranpolis that are available in market. We always enjoy a puranpoli which is totally filled with puran and we enjoy it with clarified butter. (desi ghee). I am giving below my method of preparing puranpoli. Do prepare and see the difference. I am sure you will love it.

Ingredients:

For Puran (Stuffing) : 250 grams Bengal Gram (Chana Dal), 125 grams sugar, 125 grams Jaggery, half nutmeg and 1 inch piece of dry ginger- both  finely powdered.

For poli/Roti : 3/4 cup Maida (All purpose flour),  You can't take whole wheat aata because it doesn't have that elasticity.2 tablespoon oil, a pinch salt and water to knead the dough.

For rolling out the poli- rice flour
For serving -desi ghee (unlimited ;))

Method:

 On previous night soak the bengal gram  (chana Dal ) in enough water.
Next morning, pressure cook the dal with a little turmeric powder.  When cooker cools down, take the daal and take out all the water from it with the help of sieve.

Take maida and add oil, salt and with the help of water, make a very soft dough. Let it rest for 1/2 hour.

Now, take the cooked daal in a pan and add sugar and jaggery to it. cook it on medium flame and keep stirring it. When the puran starts thickening, your spatula can stand upright in this puran. That means now, the puran is ready. Add nutmeg and dry ginger powder. Let it cool.

Now, take a very small ball out of the dough (smaller than we take for making poori)  - (see photo No. 001) and add a big ball size stuffing (Puran) in it. (see photo No. 002)

Roll out the puranpoli very tenderly with the help of rice flour. Now roast the puranpoli on a hot griddle on both sides by applying desi ghee.

Serve it again with the desi ghee, milk and one special curry - katachi amti..

If there is no any special occasion, just have it with onion fritters/pakoda.

I am sure you will love it. 




प्रत्येक घरात बनवल्या जाणार्‍या खास पदार्थांची एक खास अशी कृती असते आणि तो पदार्थ तसाच बनला तरच तो  घरच्या सगळ्यांना आवडतो. माझं घरही याला अपवाद नाहीच. आता पुरणपोळी हा काही मुद्दाम लिहिण्याचा प्रकार नव्हे. कारण प्रत्येक घरी ती बनतच असते. त्यामुळे इथून तिथून सर्वसाधारण सारखीच पाककृती असणार. तरीही  विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते. तीच कृती  तुमच्याकरता मी इथे देतेय. जरूर करून पहा...

 साहित्यः  

 पुरणासाठी : २५० ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम साखर, १२५ ग्रॅम गूळ,,चिमूटभर  हळद , अर्ध जायफळ आणि १ इंच सुंठ बारीक किसणीने किसून.
वरच्या पारीसाठी -  पाउण वाटी मैदा. (कणिक घेऊ शकत नाही कारण ती मैद्याइतकी ताणली जात नाही.) २ टेबलस्पून तेल, मीठ चिमूटभर आणि पाणी.
पोळी लाटण्यासाठी: तांदूळ पिठी
पोळीवर लावायला आणि वरून घ्यायला-  भरपूर साजूक तूप. हयगय चालतच नाही ;)

कृती: पुरणपोळी करण्याच्या आदल्या रात्री हरभरा डाळ धुवून पाण्यात भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी ती ६ वाट्या पाण्यात हळद घालून कुकरमध्ये अगदी मऊ शिजवून घ्यावी आणि कुकरची वाफ गेली की चाळणीत ही डाळ उपसून ठेवावी.

मैदा - तेल, मीठ आणि पाणी घालून खूप तिंबून अगदी सैल भिजवून ठेवावा (अर्धा तास तरी) 

उपसलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात साखर, गूळ घालून शिजत ठेवावे. हे मिश्रण सतत हलवायला लागते नाहीतर करपण्याची शक्यता असते. पुरणातला कालथा/ उलथने छान उभे राहिले की झालं पुरण. मग त्यात सुंठ पूड आणि जायफळ पूड घालून ते तावडतोब पुरण यंत्रातून काढावं. थंड करून घ्यावं.

आता....

पुरीची लाटी घेतो त्यापेक्षाही थोडी छोटी लाटी घेऊन (फोटो क्र.००१) तिच्यात मोठ्या चेंडूएवढं पुरण भरावं.(फोटो क्र. ००२) सराव नसतो तेव्हा हे खूप अशक्य वाटतं.  (फोटो क्र.००३) (स्वानुभव बोल्लाच मधे:) ) 

तांदळाच्या पिठीवर ही पोळी (फोटो क्र. ००४)खूप अलगद लाटावी आणि गरम तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी.

ही पोळी तिच्यावर मजबूत तूप घेउन, दूध, कटाची आमटी  याबरोबर फस्त करावी. खरंतर नैवेद्य वगैरे नसेल तर मस्त कांदाभजी आणि ही पुरणपोळी इतकाच मेनू करून स्वर्गसुख  मिळवावं.;:) 

1 comment:

  1. This recipe has been posted by me on 18.05.2017 @11 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...