Wednesday 7 March 2018

Gulabjaam / गुलाबजाम




Gulabjaam – My Magic

I think the person who doesn’t love gulabjaam must be rare. In our home, we really don’t need any reason to eat Gulabjaam. But, today, I tried the gulabjaam by bringing the khoya (milk solids) and it turned out really very well. Do give it a try.

Ingredients:

 250 grams khoya (Mava as it is pronounced as it is a softer variety of regular khoya.)m 50 grams maida (all-purpose flour), 1 pinch baking soda, clarified butter for deep frying, 2 cups sugar, 1 cup water, 1 teaspoon green cardamom powder, few strands of saffron.

Method:

 knead mava very well about 10 minutes so as there are no lumps at all. Add maida slowly and knead it again. The measurement of maida will vary as it is dependent on how soft your mava is. I required only half of it, i.e. 25 grams. Add 1 pinch baking soda in it and knead a very soft dough. Make small balls or oval shaped gulabjaams as per your choice.

Now in a pan mix water and sugar together and make one string sugar syrup. Add cardamom powder and saffron in it and switch off the flame.
Now heat the clarified butter in one kadhai and deep fry all the gulabjaams and soak it in the sugar syrup for half an hour.
And then.. just take one gulabjaam and see.. how it melts in the mouth… heavenly.



गुलाबजाम - माय मॅजिक

गुलाबजाम आवडतच नाही अशी व्यक्ती विरळाच असेल नाही? आमच्या घरी तर सणवार काही नसताना सुद्धा लहर आली म्हणून गुलाबजाम चा बेत ठरतो. पण यावेळी पहिल्यांदाच खवा आणून त्याचे गुलाबजाम केले आणि ते छानच झाले.

साहित्यः

 २५० ग्रॅम गुलामजामचा मावा (हा नेहमीच्या खव्यापेक्षा मऊअसतो), ५० ग्रॅम मैदा, १ चिमूट खायचा सोडा, तळण्यासाठी साजूक तूप, २ वाट्या साखर, १ वाटी पाणी, १ टीस्पून वेलदोड्याची पावडर, थोडेसे केशर.

कृती:

 खवा खूप मळून त्यातल्या सगळ्या गुठळ्या छान मोडून घ्याव्यात. त्यात लागेल तसा हळूहळू मैदा घालत खवा मऊसर मळा. (मैद्याचे प्रमाण बर्‍याचदा माव्याच्या ओलसरपणावर अवलंबून असते असं आईकडून ऐकलं होतं. मला या प्रमाणातील जेमतेम अर्धा म्हणजे २५ ग्रॅम मैदा लागला. खवा मळतानाच त्यात चिमूटभर खायचा सोडाही घातला.
एकीकडे एका पातेल्यासाखर आणि पाणी एकत्र करून पाक करण्यास ठेवा. एकतारी पाक होत आला की त्यात वेलदोडा पूड आणि केशर घालून गॅस बंद करा.

आता एका कढईत साजूक तूप तापत ठेवा. मळलेल्या खव्याचे गोल किंवा लांबट गोल आकाराचे गोळे करून तुपात मंदाग्नीवर तळून घ्या आणि लगेच पाकात सोडा. या प्रकारे सगळे गुलाबजाम करून घ्या.
हे गुलाबजाम मुरायला अर्धा तासही पुरतो.

आणि नंतर.. एक गुलाबजाम हळूच तोंडात सोडा आणि कसा अलगद विरघळतो ते पहा.. स्वर्गीय...



1 comment:

  1. This recipe has been posted by me on 07.08.18 at 9:30 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...