Kadhi Pakode: My
magic
This is very
famous Punjabi Dish.
Recipe : for 3-4 people
Measurement:
1.
For
Kadhi: 2 cups thick yogurt (should be sour), 2 teaspoon gram flour (Besan), 2
green chilies, ½ inch Ginger piece, 8-10 curry leaves, 2 teaspoon oil, ½ teaspoon
mustard seeds, 8-10 fenugreek seeds, ½ teaspoon turmeric powder, 1 pinch asafetida,
salt as per taste.
2.
For
Pakode: 1.5 cups gram flour (Besan), 1/2 teaspoon carom seeds, ½ teaspoon
turmeric powder, 1 teaspoon red chili powder, salt as per taste, water as
required, 1 pinch baking soda.
3.
Oil
for frying.
Method:
Beat yogurt and add gram flour to it. Beat again so that no lumps
formed. Grind ginger-chili and add to the curd mixture. Add salt and keep
aside.
Now take besan in a bowl, add carom seeds, red chili powder, turmeric,
salt and water. Make batter thicker than we make for usual pakodas. Add baking
soda.
Now, heat oil in a pan and make pakodas as usual from the batter.
Take another pan and add 2 teaspoon oil in it. When heated, add mustard
seeds, fenugreek seeds, turmeric powder, asafetida and curry leaves. Add curd
mixture and a little water. (This Kadhi is thick than the one Maharashtrian
people make. So add water accordingly)When Kadhi comes to a boil, add pakodas
and let it boil for another 2-3 minutes. Serve this with Jeera rice, roti or
fulkas.
Note: The curd must be sour. If its not so, the kadhi will not taste
nice. Some people add onions or potatoes in the pakoda batter. But in our home,
we like the simple way.
कढी पकोडे: माय मॅजिक
ही एक पंजाबी पाककृती आहे.
वाढणी:३-४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१. कढीसाठी: २ कप घट्ट दही. (आंबट
असल्यास उत्तम. गोड दही बिलकुल नको), २ टीस्पून डाळीचे पीठ(बेसन), २
हिरव्या मिरच्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, ८-१०
कढीपत्त्याची पाने, २ टीस्पून तेल, १/२ टीस्पून
मोहरी, ८-१० मेथीदाणे, १/२ टीस्पून हळद, चिमूटभर
हळद, चवीनुसार मीठ.
२. पकोड्यांसाठी: १.५ वाट्या डाळीचे पीठ,
१/२
टीस्पून ओवा, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार
मीठ, चिमूटभर खायचा सोडा, आवश्यकतेनुसार पाणी.
३. तळण्यासाठी तेल.
कृती:
दही घुसळून त्याला डाळीचे पीठ लावून
ठेवावे. चांगले घुसळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आलं-हिरव्या मिरच्या बारीक
वाटून या मिश्रणात घाला. चवीनुसार मीठ घाला.
डाळीच्या पिठात ओवा, तिखट, मीठ,
हळद,
मीठ
आणि पाणी
घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवून घ्या आणि त्यात खायचा सोडा
घाला.
एका कढईत तेल गरम करून त्यात या पिठाची भजी तळून
घ्यावीत.
आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मेथीदाणे, मोहरी, हिंग,
हळद,
कढीपत्त्याची
फोडणी करून त्यात आपण तयार केलेले दही घाला.
ही कढी महाराष्ट्रियन पद्धतीपेक्षा घट्ट असते. ते लक्षात घेउन पाणी
घाला. कढीला उकळी आली की त्यात ही भजी
सोडा आणि आणखी एक उकळी आणा.
गरम गरम जिरा राईस, पोळ्या किंवा
फुलक्यांबरोबर वाढा.
टीपः दही खूप नाही पण आंबटच हवे. गोड असेल तर
ही कढी चांगली लागत नाही.
काही जण या भज्यांच्या पिठात कांदा, बटाटाही घालतात. आपल्याला आवडत असल्यास
घालावा. अशी साधी कढीही खूप छान लागते.
This recipe has been posted by me on 11.06.17 @ 10 p.m.
ReplyDeleteThis looks super delicious. Thanks for the recipe.
ReplyDelete