Showing posts with label no garlic recipes.. Show all posts
Showing posts with label no garlic recipes.. Show all posts

Saturday, 3 February 2018

Banarasi Nimona / बनारसी निमोना :



Banarasi Nimona - My Magic
Recipe For: 4-5 people
Ingredients:
1/2 kg green peas, 1 bay leaf, each two cloves, black pepper corns,green cordamoms,  1 green chili, 1/4 inch ginger piece, 1/4 teaspoon cumin seeds-coriander powder,  cumin seeds and asafoetida for tempering, clarified butter (desi ghee.) Don't use oil. It doesn't taste good, salt as per taste.
Method:
make course  paste of green peas, ginger, green chili  .
Now heat ghee(clarified butter) and add cumin seeds and asafoetida. Add bay leaf, pepper corns, green cordamoms and add the green peas paste. Saute for a minute. Add cumin seeds-coriander powder, water and salt as per taste. This vegetable is not too thick or thin. But its extremely taste. 
Serve hot only. Otherwise it won't taste that good.
Serve with puri or roti. 

बनारसी निमोना : माय मॅजिक
पाककृती: ४-५ व्यक्तींसाठी
साहित्यः-
 अर्धा  किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको), चवीपुरत मीठ.
कृती: 

अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही. पुरी किंवा पोळी, भात कशाबरोबरही वाढा.

Wednesday, 20 December 2017

Kolache Pohe/कोळाचे पोहे



Kolache Pohe- My Magic (flattened Rice / beaten rice dipped in tamarind pulp and coconut milk)

Today, I am giving you the most yummy Maharashtrian snack dish. Do prepare and enjoy.

Recipe for -4 people

Ingredients: 

½ kg. thick poha (Flattened Rice), coconut-1 big, 2-3 green chillies, ½ cup tamarind, ½ cup jiggery, salt as per taste, ½ bunch of fresh coriander – finely chopped, for tempering clarified butter- 2 tablespoon (Desi Ghee), ½ teaspoon cumin seeds, a pinch of  asafoetida, curry leaves 7-8, 2-3 dry red chillies.

Method:

Scrap coconut and with the mixer, take out the coconut milk by mixing water. Strain it and redo the procedure so that you will get 6 cups of coconut milk. Mix jaggery in this milk and keep ready. Soak tamarind in lukewarm water for ½ hour and take out the pulp. It will be almost 1 cup. Grind the green chilies.
Rinse  the flattened rice in water and strain it just 15 minutes before you plan to eat this dish.
Now add the grind chili, salt and coriander in the strained poha and mix well.
For tempering, heat clarified butter in a pan and put cumin seeds, asafetida, curry leaves and dry red chilies in it. Add this tempering in Coconut milk.
Always serve this dish in a bowl. Take poha in a bowl and add coconut milk and tamarind pulp as per your taste.
Don’t mix all the poha with coconut milk and tamarind pulp at once, because, as the time passes, it becomes thicker.

Enjoy a very simple, yet an absolutely mouthwatering dish.


आज एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी पाककृती सांगत आहे: जरूर करा आणि आस्वाद घ्या.


कोळाचे पोहे-माय मॅजिक


पाककृती: ४ व्यक्तींसाठी


साहित्यः 


१/२ किलो जाड पोहे, नारळ -१ मोठा, २-३ हिरव्या मिरच्या, १/२  वाटी चिंच, १/२ वाटी गूळ , मीठ चवीनुसार, १/२ जुडी कोथिंबीर  बारीक चिरून, फोडणीसाठी साजूक तूप - २ टेबलस्पून, १/२ टीस्पून  जिरे, कढीपत्ता – ७-८ पाने, हिंग चिमूट भर , २-३ सुक्या लाल मिरच्या.
कृती: 

प्रथम नारळ खोवून त्याचे दूध काढून घ्या. ते साधारण ६ वाट्या होईल. त्यात गूळ चिरून घाला आणि हे दूध मिक्स करून घ्या. चिंचेचा कोळ काढा.तो १ वाटी होईल. हिरव्या मिरच्या वाटून घ्या.
ज्यावेळी तुम्हाला पोहे खावयास घ्यायचे असतील, त्याआधी १५ मिनिटे पोहे भिजवून ठेवा. भिजवलेल्या पोह्यांना मीठ. मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर नीट लावून घ्या.
त्यानंतर साजूक तुपाची जिरे, कढीपत्त, हिंग, सुक्या मिरच्या घालून फोडणी करून ती नारळाच्या दुधाला द्या.
खायला देताना एका खोलगट डीश मध्ये पोहे घालून त्यावर आवडीनुसार हे नारळाचे दूध आणि चिंचेचा कोळ घालून द्या.

एक फर्मास डीश तयार आहे.


Friday, 8 December 2017

Chitranna / चित्रान्ना



Chitranna – My Magic

Recipe for : 3 people

Ingredients:

 2 cups rice, 5 cups water, ¼ cup split Bengal gram (chana dal), 3 teaspoon split black lentil, 5-6 dry red chillies, 23 teaspoon mustard seeds, 8-10 curry leaves, ½ cup fresh scrapped coconut, juice of one lemon, ¼ cup chopped coriander leaves, salt as per salt, for garnishing- 10-12 cashew nuts and groundnuts – optional), for tempering –oil, mustard seeds, turmeric powder, asafetida.

Method: 

Soak yellow lentil in water for 2 hours. Wash rice and drain it. Keep it aside. Now after half an hour, take 1 teaspoon oil and heat it. Saute rice in it. Add 5 cups of hot water in it and cook rice nicely in a manner that each rice grain will be separate. Take the rice out in one big plate and let the rice cool down.

Heat Oil in a kadhai and deep fry soaked Bengal gram and split black lentil in it. Grind mustard seeds with 4-5 teaspoons of water from mixer. Add these fried lentils and mustard water in rice. Add fresh scrapped coconut and salt as per your taste. Mix it.
Heat oil for tempering and add mustard seeds, turmeric powder and asafetida, curry leaves and dry chilies. Add this tempering in rice and add juice of lemon. Garnish it with finely chopped coriander leaves. If you wish add fried cashew nuts and groundnuts also in the rice.
Serve at room temperature with roasted papad and pickle. Enjoy.




चित्रान्ना : माय मॅजिक

पाककृती: ३ व्यक्तींसाठी

साहित्यः

 २ वाट्या तांदूळ, ५ वाट्या पाणी, पाव वाटी चणाडाळ, ३ टीस्पून उडीद डाळ, ५-६ सुक्या लाल मिरच्या, २ टीस्पून मोहरी, कढीपत्ता - ८-१० पाने, खोवलेला नारळ-अर्धी वाटी, १ लिंबू, १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, सजावटीसाठी काजू (ऐच्छिक), फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,

कृती: 

चणा डाळ २ तास पाण्यात भिजत घाला,तांदूळ धुवून अर्धा तास उपसून ठेवा, थोड्या तेलावर तांदूळ परतून घ्या. नंतर त्यात अडीच पट (५ वाट्या) गरम पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. त्यानंतर तो एका परातीत काढून थंड करून घ्या.

एका कढईत  थोडे तेल घालून दोन्ही डाळी  तळून घ्या. मोहरी ४-५ टीस्पून  पाण्याबरोबर मिक्सरमधून फिरवून घ्या. थंड झालेल्या भातावर मोहरीचे पाणी , तळलेल्या डाळी, मीठ,खोवलेला नारळ  घालून एकत्र करून घ्या.
आता नेहमीसारखी फोडणी करून त्यात कडीपत्ता, सुक्या मिरच्या घाला. ही फोडणी भातावर घालून त्यात चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घाला. बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवा. (हवे असल्यास यात काजू आणि शेंगदाणेही तळून घालतात)

हा भात थंडच छान लागतो. भाजलेला पापड आणि लोणच्यासोबत याचा आस्वाद घ्या.


Thursday, 29 June 2017

Pointed gourd (parwal) subjee / परवलाची भाजी




Pointed gourd (parwal) subjee: My Magic

Recipe for 2-3 people

Ingredients: 

1/2 kg pointed gourd (Parwal), 1 teaspoon each red chili powder and coriander-cumin seeds powder, salt as per taste, for tempering - oil, mustard seeds, asafetida, turmeric powder. Optional- 1 teaspoon roasted groundnut  powder. (After cleaning and deseeding, this vegetable becomes much less in weight. So, take accordingly)

Method:

Wash and remove the skin of the pointed gourds (Parwal) . Take out the seeds and surrounding part. Slice the pointed gourds vertically.

cleaned pointed gourds (Parwal) 

Heat oil in a pan. Add  mustard seeds, asafetida, and turmeric powder. Add the pointed gourd pieces and cover the pan for 2 minutes. Then uncover it and add red chili powder, coriander-cumin seeds powder and salt as per taste. Saute for 2-3 minutes and add roasted groundnut powder if you like.
The parwal vegetable is ready. Serve it with hot rotis.
This vegetable is very easy to cook and very tasty. Do try.





परवलाची भाजी - माय मॅजिक

वाढणी: २-३ व्यक्तींसाठी

साहित्यः

१/२ किलो परवल, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून धने-जिरे पावडर, चवीनुसार मीठ, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, हळद, दाण्याचे कूट (ऐच्छिक) १ टीस्पून.

कृती:

परवल धुवून, साले काढून त्यातील बिया व जाळी  काढून टाकून त्यांचे उभे पातळ काप करून घ्यावेत. (साले, बिया असं सगळं जाउन ही भाजी तशी कमी होते. त्यामुळे नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त लागते)

साले काढलेले परवल 

एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून त्यावर हे परवलाचे काप घालावेत. झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर त्यात तिखट, मीठ, धने-जिरे पावडर घालून हवे असल्यास दाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.

अतिशय साधी तरीही खूप चवदार आणि पटकन तयार होणारी ही भाजी आहे. अगदी ५-७ मिनिटात ही भाजी शिजते. गरम पोळी बरोबर खूप  छान लागते.




Sunday, 25 June 2017

Veg Cauliflower / फ्लॉवरची भाजी



Veg Cauliflower - My Magic

Recipe for 4 people

This is very simple, yet very delicious recipe.

Ingredients: 


1/2 kg. Cauliflower, 2 red tomatoes, fresh grated 1/2 coconut, 1 tablespoon cumin seeds, 5-6 fresh red chilies, (you can take as per your taste), salt as per taste, sugar 1 teaspoon, for tempering oil, mustard seeds and asafetida, finely chopped coriander leaves for garnishing.

Method: 

cut cauliflower in large florets. Blanch for 2 minutes. Run through cold water and keep aside. Blanch tomatoes and puree them. Make paste of grated coconut, chilies and cumin seeds.

Now heat oil in a pan. Add mustard seeds and asafetida. Add Cauliflower florets and give a steam. Now add coconut-chili-cumin seeds paste, add some water, salt, sugar. Add tomato puree. Again steam till the vegetable cooks well. Garnish with finely chopped coriander leaves. Serve this yummy dish with hot and soft rotis/fulkas.

Notes:

1. Don't add turmeric powder in this veg. Due to this, the colour of recipe looks attractive.
2. This recipe needs slightly more sugar than the other recipes. It tastes good.



फ्लॉवरची भाजी:माय मॅजिक

वाढणी: ४ व्यक्तींसाठी

एक अतिशय साधीसुधी आणि तरीही चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे.

साहित्यः 

अर्धा किलो फ्लॉवर, २ लालबुंद टोमॅटो, नारळाची अर्धी वाटी खोवून, १ टेबलस्पून जिरे, ५-६ ओल्या लाल मिरच्या (चवीनुसार कमी-जास्त करू शकता), चवीनुसार मीठ, साखर १ टीस्पून, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती

फ्लॉवर चे मोठे मोठे तुरे चिरून घ्या. मीठ घातलेल्या गरम पाण्यात २ मिनिटे हे तुरे उकळून गार पाण्यातून काढून घ्या. टोमॅटो ब्लांच करून घ्या. मिक्सर मधून खोवलेला नारळ, जिरे, मिरच्या यांची पेस्ट करून घ्या. टोमॅटोची साले काढून त्याची प्युरी करा.
एका पातेल्यात तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करा. हळद घालायची नाही. यात फ्लॉवरचे तुरे घालून एक वाफ आणा. त्यात खोबरे-जिरे-मिरचीची पेस्ट घाला. व्यवस्थित ढवळून थोडे पाणी घाला. मीठ साखर घाला. आता टोमॅटोची प्युरी घालून परत एक वाफ आणा. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून गरम गरम पोळ्यांबरोबर वाढा.

टीपा:

१.या भाजीत हळद घालायची नाही. त्यामुळे हिचा रंग वेगळा आणि आकर्षक दिसतो.
२. त्याचप्रमाणे या भाजीत थोडीशी जास्त साखर चांगली लागते.


Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...