Masala Bhendi/ spicy okra/spicy ladies fingers
Ingredients:
1/4 kg Okra/Ladies fingers/ Bhendi, 1 big onion, 2 tomatoes, 7-8 garlic cloves, 1/2 inch ginger, 8-10 curry leaves, 1 tsp. red chili powder, 1/2 tsp. garam masala, 1 tsp. coriander-cumin seeds powder, 1/2 teaspoon amchoor powder, 1/2 tsp. sugar, 1 tsp. sesame seeds, 1 tablespoon ground peanut powder, salt as per taste, oil, mustard seeds, cumin seeds, asafetida, turmeric powder for tempering and finely chopped coriander for garnishing.
Ingredients |
Ingredients |
Method:
clean the okra/bhendi and cut lenght wise. If the okra is too long, cut it in 2-3 pieces or if its a small one, let it be only 2 pieces of each okra.
cut onion and tomatoes in thin slices. chop roughly the ginger and garlic cloves.
Now heat oil in a pan and add cumin seeds, mustard seeds, asafetida, turmeric powder, curry leaves, sesame seeds. When it sputters, add chopped ginger garlic and onion. When onion turns light golden, add tomatoes and saute well till the oil separates. Then add coriander-cumin seeds powder, red chili powder, garam masala, amchoor powder and okra pieces. mix properly and cook the vegetable on a slow flame. don;t cover the pan. when it cooks little bit, add salt, sugar and peanut powder. Mix well and let it cook for further 5 minutes. Garnish with chopped green coriander leaves. Masala bhendi is ready to serve.
Masala Bhendi |
मसाला भेंडी
साहित्य:
पाव किलो कोवळी भेंडी, १ मोठा कांदा, २ टोमॅटो, ७-८ लसणीच्या पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची ८-१० पाने, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून साखर , १ टीस्पून तीळ, १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल, मोहरी,जिरे हिंग, हळद, सजावरटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.
साहित्य |
साहित्य |
कृती:
भेंडी धूवून, पुसन, कोरडी करून उभी चिरावी. फार मोठी नसेल तर तुकडे केले नाहीत तरीही चालतात, नाहीतर एका भेंडीचे २-३ तुकडे करून घ्यावेत. कांदा, टोमॅटो उभे पातळ चिरून घ्यावेत . लसूण आणि आलं बारीक चिरून घ्यावं.
आता कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात कढीपत्त्याची पाने घालावीत. तीळ घालावेत. आलं लसूण घालून कांदा घालावा. कांदा छान सोनेरी परतला गेला की त्यात टोमॅटो घालावा आणि परत परतावं. तेल सुटू लागलं की त्यात धने-जिरे पावडर, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर घालून भेंडीचे तुकडे घालून ढवळावी आणि मंदाग्नीवर भाजी होऊ द्यावी. झाकण अजिबात ठेवू नये. भाजी थोडीशी शिजली की मीठ, साखर, दाण्याचं कूट घालावं आणि परत ढवळावी. ५ मिनिटे शिजू द्यावी. गरमागरम मसाला भेंडी तयार. वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देणे.
मसाला भेंडी |
this recipe has been posted by me on 13.05.2017 @ 5 pm
ReplyDelete