Sunday 16 July 2017

Matkichi Bhaji (split moth beans fritters ) /मटकीच्या डाळीची भजी




Matkichi Bhaji (split moth beans fritters ): My Magic

Ingredients: 

250 grams split moth beans (matki daal), 1/2 cup bengal gram (chana daal), 1 teaspoon ginger-garlic paste, 1 teaspoon cumin seeds-coriander seeds powder, 1.5 teaspoon red chili powder,1 teaspoon turmeric powder,  1 pinch asafetida, bunchful of curry leaves, 2 tablespoon finely chopped coriander, salt as per taste, for deep frying -oil, If you feel that the batter is somewhat watery, then use corn flour as per requirement  to make bhaji.

Method:

Soak both the lentils in water for at least 4 hours. Then take out the water from the lentils and keep them on a strainer for half an hour so that there will be no water. Grind these lentils from mixer without water. Then add Turmeric powder, asafetida, salt, red chili powder, ginger-garlic paste, cumin seeds-coriander seeds powder, coriander, curry leaves (cut by hands than the knife. It gives better aroma)

Heat oil in a kadhai. When the smoke starts coming from the oil, switch gas to minimum. Make bhajis as usual and deep fry them.

Enjoy with tomato ketchup.



मटकीच्या डाळीची भजी : माय मॅजिक

साहित्यः 

पाव किलो मटकीची डाळ, एक मूठभर हरभरा डाळ, १ टीस्पून आलं - लसूण पेस्ट, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १.५ चमचे लाल तिखट, चिमूटभर हिंग, मूठभर कढीपत्ता, १/२ टीस्पून हळद,२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. पीठ वाटल्यावर अगदीच पातळ झाले तर कॉर्न फ्लोअर वापरावे)

कृती:

प्रथम दोन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ  धुवून ४ तास भिजत घाला. नंतर या दोन्ही डाळी साधारण अर्धा तास चाळणीवर उपसून ठेवा म्हणजे त्यात पाणी रहाणार नाही. अर्ध्या तासाने या डाळी मिक्सरवर पाणी न घालता वाटून घ्याव्यात. त्यात हळद, हिंग, तिखट, मीठ, धने-जिरे पावडर कोथिंबीर घालावी. कढीपत्त्याची पाने हातानेच तोडून घालावी. त्याचा वास चिरलेल्या कढीपत्त्यापेक्षा छान येतो.

कढईत तेल चांगले तापवावे. धूर येउ लागला की गॅस मंद करावा आणि नेहमीसारखी भजी करावीत. केचप बरोबर खाण्यास द्यावीत.


Sunday 9 July 2017

Vadapaav, chili bhaji and mint chutney / वडापाव, मिरची भजी आणि पुदिना चटणी





Vadapaav, chili bhaji and mint chutney: My magic

There is no any need to describe the popularity of VadapAav. So, lets see how I made it.

Ingredients:

1.For vada: 1/2 kg boiled potatoes, 2 teaspoon ginger-garlic paste, paste of 6-7 green chilies (you can take according to your taste),  8-10 curry leaves, for tempering oil, cumin seeds, mustard seeds, asafoetida, turmeric powder, salt according to taste, 2 teaspoon finely chopped coriandar leaves.
2. for vada batter: 2 cups besan, 1/2 teaspoon red chili powder, 1/4 teaspoon turmeric powder, salt as per taste, sufficient water for making the batter, 2 pinch baking soda.
3. for chutney: 2 bunch full of mint leaves, 1 bunch full of coriander leaves, 1 inch piece of ginger, 1/4 cup fresh scrapped coconut, juice of half lime, 1 teaspoon cumin seeds, 5-6 green chilies (take according to your taste), salt as per your taste.
4. for chili bhaji: green chilies, dry mango powder (aamchur powder), salt (take proportion of aamchur powder and salt as 2:1)
5. Oil : for deep frying
6. paav: as per requirement.

Method:

1.Boil potatoes and cut them to small pieces.
2. Mix all the ingredients (except baking soda ) from Sr. No.2 above and prepare the batter.
3. Take all the ingredients mentioned in Sr. No.3 above and prepare chutney in mixer.
4. Make a vertical slit on green chilies and stuff the mixture of aamchur powder and salt in every chili and keep them ready.
5.Heat oil in a pan and  add cumin seeds, mustard seeds, asafoetida, turmeric powder,  8-10 curry leaves, ginger-garlic paste, green chili paste and saute till the raw aroma goes off. Add potatoes, salt and chopped coriander. Let  the mixture cool down.
6.Prepare vadas from this mixture.
7. Add Baking soda in the vada batter and mix well.
8.Heat oil in a kadhai. Dip vada in the batter and deep fry them on golden brown colour.
9.Make chili bhajis also by dipping chilies in the batter and deep frying them.
10.Cut a pav in between. spread chutney and keep one vada in the middle.
11. Serve this with mirchi bhaji.
12. Some people prefer tamarind chutney also with this. But I have nor prepared this.

From the above measurement, I could prepare 15 vadas of medium size.
Enjoy.




वडापाव, मिरची भजी आणि पुदिना चटणी - माय मॅजिक
वडापाव ची महती वेगळी सांगण्याची काहीच गरज नाही. तर आज संध्याकाळचा आमचा मेनू हाच. चला तर पाहू कसा केला ते..

साहित्यः

१. वड्यांसाठी - १/२ किलो बटाटे, २ चमचे आलं लसूण पेस्ट, ६-७ हिरव्या मिरच्यांची पेस्ट (आपल्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करू शकता), चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची ८-१० पाने, फोडणी साठी तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
२. वड्यांच्या आवरणासाठी : २ वाट्या डाळीचे पीठ (बेसन), १/२ टीस्पून लाल तिखट, हळदचवीनुसार मीठ, पाणी आवश्यकतेनुसार,खायचा सोडा २ चिमूट.
३. चटणीसाठी: पुदिन्याची फक्त पाने- २ मुठी, १ मूठ कोथिंबीर, १ इंच आल्याचा तुकडा, ५-६ हिरव्या मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करू शकता), ओले खोबरे अर्धी वाटी खोवून, जिरे १ टीस्पून, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.
४. मिरची भज्यांसाठी: मिरच्या, आमचूर पावडर, मीठ. (मिरच्य हव्या तेवढ्या घेणे. ) आमचूर पावडर आणि मिठाचे प्रमाण २:१ असे घेणे.
५. तळण्यासाठी तेल.
६. आवश्यकतेनुसार पाव.

कृती:

१.सर्वप्रथम बटाटे कुकरमधून उकडून घ्यावेत. 
२.वड्यांच्या आवरणासाठी क्र. २ मध्ये लिहिलेले सर्व साहित्य फक्त खाण्याचा सोडा वगळून भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असे भिजवून ठेवावे.
३.क्र. ३ मध्ये दिल्याप्रमाणे चटणीचे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून चटणी करून घ्यावी. 
४.मिरचीच्या भज्यांसाठी मिरच्यांना उभी चीर देउन त्यात आमचूर पावडर आणि मीठ भरून मिरच्या तयार ठेवाव्यात.
५. उकडलेले बटाटे सोलून चिरून त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.
६. एका पातेल्यात तेल गरम करून नेहमीप्रमाणे जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी करून घ्यावी. त्यात आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून कच्चा वास जाईतो परतावे. बटाट्याच्या फोडी, मीठ घालून परतून थोडी कोथिंबीर घालावी.
७. ही भाजी गार झाली की तिचे गोल किंवा चपटे असे आपल्या आवडीनुसार वडे करून घ्यावेत.
८. भिजवलेल्या डाळीच्या पिठात सोडा घालून पीठ सारखे करून ठेवावे..
९. एका कढईत तेल गरम करून  हे वडे डाळीच्या पिठात घोळवून चांगले लालसर रंगावर तळून घावेत.
१०. तशाच भरलेल्या मिरच्याही डाळीच्या पिठात घोळवून मिरचीची भजी तळून घावीत.
११. एक पाव घेउन मधून कापून त्याला ही चटणी लावून त्यात एक वडा घालून खाण्यास द्यावा. बरोबर मिरचीची भजी द्या.
१२. याबरोबर काही जण चिंचेची गोडसर चटणीही करतात. ती मी यावेळी केली नव्हती.

या प्रमाणात मध्यम आकाराचे १५ वडे होतात

Wednesday 5 July 2017

Banana Puri / केळ्याच्या पुर्‍या




Banana Puri : My Magic

Ingredients: 

3 ripe bananas, 1/2 cup sugar (Adjust according to your taste), Wheat flour to knead the dough, Oil for deep frying.

Method:

 Mash the bananas and add sugar in it. Keep the mixture on gas and stir continuously. In 2-3 minutes, the sugar will dissolve completely. Switch the gas off and let the mixture cool down. When it cools, add wheat flour in it so that you can knead it properly. Make a tight dough and keep aside for half an hour.
After half an hour, if you feel that the dough has become too tight, then take a little milk and knead the dough.
Make puris as usual and deep fry.

As these puris don't contain water at all, they can remain fresh for 7-8 days. You can take them in travelling or can enjoy as per your leisure time.
Tates yummy.



केळ्याच्या पुर्‍या: माय मॅजिक

साहित्यः 

चांगली पिकलेली ३ केळी, अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता), यात मावेल एवढी कणीक, तळण्यासाठी तेल.

कृती: 

केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी. गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे. २-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे.
साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमी सारख्या पुर्‍या लाटून तळून घ्याव्यात.


या पुर्‍या अजिबात पाणी नसल्याने बर्‍याच टिकतात. त्यामुळे प्रवासात वगैरे सहज नेता येतात. अगदी खुसखुशीत होतात. छान लागतात.

Saturday 1 July 2017

Corn-potato-fenugreek pattice / मका - बटाटा- मेथी पॅटिस




Corn-potato-fenugreek pattice: My Magic

Recipe for 3 people

Ingredients

Half kg each of Potatoes and fresh corn. Fenugreek leaves- 3 bunch full,100 grams grated paneer (cottage cheese), 1 teaspoon cumin seeds, 2 green chilies finely chopped, 1 teaspoon ginger-garlic paste,  2 teaspoon red chili powder, 1/2 teaspoon coriander-cumin seeds powder, 1/2 teaspoon garam masala, salt as per taste, 2 slices of bread, 1 teaspoon corn flour, 2 bunch full of vermicelli (sevai) (take as per your taste) crushed, oil for deep frying.

Method:

Boil potatoes,mash them. Grind 2 bread slices from mixer and add to potatoes. fry the fenugreek (methi) leaves on one teaspoon oil and mix in potatoes. Add salt, red chili powder and coriander-cumin seeds powder and mix well. Keep aside.
Now grind the fresh corns coarsely. Heat 1 teaspoon oil and add cumin seeds, finely chopped chili, ginger garlic paste and corn paste. saute and cover the pan. Let it cook for 5 minutes. saute till the mixture dries properly. Let it be cool. Add grated paneer, garam masala, salt, chili powder and cumin-coriander powder and mix well.

pattice - 4 simple and 2 rolled over sevai before deep fry

 Heat oil in kadhai. Meanwhile take a lemon size ball of potato mixture and stuff the corn mixture in it. Seal it properly. Make a paste of cornflour. Deep this pattice in it and roll over on crushed sevai. Deep fry.Make all the pattice by this way.

I could make 15 pattice out of this. 

Serve this potato-corn-methi pattice hot with tomato sauce.
Enjoy..





मका - बटाटा- मेथी पॅटिस : माय मॅजिक

वाढणी- ३ व्यक्तींसाठी

साहित्यः 

प्रत्येकी अर्धा किलो बटाटे आणि मक्याचे  दाणे., मेथीची अर्धी जुडी, १०० ग्रॅम पनीर, १ टीस्पून जिरे२ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, २ ब्रेडच्या स्लाईस, १ टीस्पून कॉर्न फ्लोअर, अंदाजे २ मूठ शेवया बारीक चुरून. तळण्यासाठी तेल.

कृती

बटाटे उकडून घ्यावेत. २ ब्रेडच्या स्लाईसचा मिक्सरमधून चुरा करून घ्यावा. मक्याचे दाणे मिक्सरमधून भरडसर वाटावेत. मेथीची फक्त पाने घेउन स्वच्छ धुवून घ्यावीत.
एका पातेल्यात एक टीस्पून तेल तापवून मेथीची पाने २ मिनिटे परतून बाजूला काढावीत. त्याच पातेल्यात परत १ टीस्पून तेल घालून त्यात जिरे, बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट घालून वाटलेले मक्याचे दाणे घालावेत. झाकण ठेवून एक वाफ काढावी. मोकळे होईतो परतावे. चवीनुसार मीठ व तिखट घालावे. हे मिश्रण थंड झाले की त्यात पनीर किसून घालावे,धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून चांगले एकजीव करून घ्यावे.

पॅटिस  तळण्यापूर्वी  शेवईत घोळवून 

परतलेल्या मेथीमध्ये उकडलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ, किंचित धने-जिरे पावडर घालून चांगले मळून घ्यावे. एक टीस्पून कॉर्न फ्लोअर पाव वाटी पाण्यात एकजीव करून ठेवावे.


एका कढईत तेल तापत  ठेवा. आता मोठ्या लिंबाएवढा  बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याची पारी करावी व त्यात एक टीस्पून मक्याचे मिष्रण भरावे. सगळीकडून बण्द करून त्या पॅटिसला हवा तसा आकार द्यावा. हे पॅटिस कॉर्न फ्लोअर च्या मिश्रणात बुडवून शेवईच्या चुर्‍यात घोळवावे आणि तेलात खमंग तळून घ्यावे. 

या मापाने माझे सर्वसाधारण आकाराचे १५ पॅटिस झाले. 

टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खाण्यास द्यावे. 

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...