Monday 15 May 2017

Palak Paneer/ Spinach-Cottage cheese:पालक पनीर

Palak Paneer/ Spinach-Cottage cheese: My magic Taste

We always love to have a restaurant style Palak Paneer when we visit. Today, here is an attempt which turned out to be successful by me. Have a look:

Ingredients:

Palak / Spinach -  a big bunch of about 250 gms., 3 tablespoon oil, 1 teaspoon butter , 1 teaspoon cumin seeds,, 1 bay leaf, 1 spicy cardamom (masala ilaichy), 4 cloves and 4 peppercorns, 1 tablespoon ginger-garlic paste, 3 green chilies, 2 medium sized onions, 2 medium sized tomatoes, ½ tsp. red chili  powder, ½ tsp. turmeric powder,  salt to taste,1/4 teaspoon  amchur powder (dry Mango Powder)  if required, 1 teaspoon kasoori methi , water as required. Fresh Paneer 150 gms , fresh cream for garnishing (optional)

                                      Ingredients

Method: 

Clean and blanch the spinach leaves/palak leaves in warm water for 5 minutes. Take the leaves out in one sieve and immediately pour cold water on these leaves so that their green colour remains intact.  Grind the onions to a fine paste and keep aside. Make puree of the tomatoes and keep aside. When it cools down, grind the blanched leaves with green chilies in a mixer to a very fine paste. Cut the paneer in cubes.

Heat oil and butter together in a pan. Add cumin seeds, bay leaf, masala ilaichy, cloves and peppercorns. Add ginger garlic paste and sauté till the raw taste goes off. Add onion puree. Saute till it gets golden brown colour. Add tomato puree and sauté it till the oil separates.  Add turmeric powder and red chili powder. Add Palak puree and some water. Put salt as per taste. Let it boil on slow flame for 10 minutes. Add kasoori methi and paneer cubes.  Garnish it with fresh cream and serve it with hot jeera rice or roti/chapatti.

Notes:

1.       If the paneer is fresh, there is no need to deep fry them. It tastes very good as it is.
2.       I have not added the amchur powder as the sourness of tomatoes was sufficient. But if you feel, do add it.



पालक पनीर:माय मॅजिक टेस्ट

आपल्याला पालक पनीर नेहमीच हॉटेल मध्ये खायला आवडतं. आज तोच प्रयत्न  घरी केला आणि चांगलाच यशस्वी झाला.तुम्हीही पहा कसं केलं ते:

साहित्यः

पालक- एक मोठी जुडी (२५० ग्रॅम्स), ३ टेबलस्पून तेल, १ टीस्पून बटर, १ टीस्पून जिरे, १ तमालपत्र, १ मसाला वेलची, प्रत्येकी चार लवंगा आणि मिरी दाणे. १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट,३ हिरव्या मिरच्या२ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, १/४ टीस्पून आमचूर पावडर (लागली तर), १ टीस्पून कसूरी मेथी, पाणी आवश्यकतेनुसार, ताजं पनीर १५० ग्रॅम्स, फ्रेश क्रीम सजावटीकरता. (वैकल्पिक)


साहित्य

कृती:

पालक धुवून त्याची फक्त पाने गरम पाण्यात ५ मिनिटे ब्लांच  करा आणि एका चाळणीत काढून ताबडतोब ती पाने थंड पाण्याखाली धरा/ थंड पाणी पानांवर ओता. यामुळे पालक चा रंग हिरवा राहील.  कांद्यांची मिक्सर  मधून पेस्ट करून घ्या, टोमॅटोचीही प्युरी  करून घ्या. आता मिक्सर मधून पालकची पाने आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या. पनीर चे तुकडे करून घ्या.

आता एका भांड्यात तेल आणि बटर असं एकत्रित गरम करा. त्यात जिरे घाला. तमालपत्र, मसाला वेलची, लवंगा आणि मिरी घाला. आलं लसूण पेस्ट घाला आणि कच्चट वास जाईतो परता. त्यात कांद्याची पेस्ट घाला आणि छान सोनेरी रंग येइतो परता. टोमॅटो प्युरी  घाला आणि तेल सुटेतो परता. हळद आणि तिखट घाला. पालक प्युरी घाला.  थोडंसं पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला. १० मिनिटे भाजी मंदाग्नीवर शिजूद्या. कसूरी मेथी आणि पनीरचे तुकडे घाला. फ्रेश क्रीम घालून सजवा आणि गरमागरम जीरा राईस, पोळी बरोबर वाढा.

सूचना-

१.पनीर ताजं असेल तर तळायची आवश्यकता नाही. तसंच वापरलं की छान लागतं.
२.मला आमचूर पावडर ची आवश्यकता वाटली नाही म्हणून घातली नाही. टोमॅटोचा आंबट पणा पुरला. पण तुम्हाला वाटली तर जरूर घाला.





1 comment:

  1. This recipe has been posted by me on 15.05.2017 at 3.30 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...