Sesame seeds
chutney: My magic
We don’t enjoy our
meals without the chutneys, salads and pickles. We enjoy all these types. Don’t
we? So here is one basic chutney that you will enjoy.
Ingredients:
1 cup
roasted sesame seeds, 1 cup curry leaves, 12-15 dry red chilies, ½ cup dry grated coconut, ½ cup roasted groundnuts, ½
teaspoon asafetida, 1 teaspoon/ as per taste- salt, 1 pinch sugar, 2 teaspoon
oil.
Method:
Heat Oil
in a pan. Add asafetida and curry leaves and sauté. Take out and keep aside. In
the same oil, sauté dry red chilies and grated coconut. Let all these
ingredients cool down.
In mixer, add
sesame seeds, groundnuts and all the ingredients and grind roughly/ prepare with the help of mortar and pestle.
तिळाची चटणी: माय मॅजिक
आपलं जेवण कधीही चटणी, लोणची, कोशिंबिरी
याशिवाय पूर्ण होउ शकत नाही. हे सगळं हवंच. त्याशिवाय जेवणाला काय मजा? नाही
का? तर आज पाहू तिळाची चटणी:
साहित्यः
भाजलेले तीळ १ वाटी, कढीपत्त्याची
पाने १ वाटी, १२-१५ सुक्या लाल मिरच्या, १/२ वाटी सुकं
खोबरं किसून, १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/२
टीस्पून हिंग पावडर, १
टीस्पूग/ चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, २ टीस्पून तेल.
कृती:
पहिल्यांदा एका कढईत तेल घेउन त्यात हिंग
घालावा. त्यातच कढीपत्ता पानेही परतून घ्यावीत आणि बाजूला काढून ठेवावीत.
त्याच तेलात मिरच्या आणि किसलेले खोबरेही परतून घ्यावे. हे सगळं थंड झालं की
शेंगदाणे आणि तिळासह मिक्सरमधून अर्धबोबडं वाटून घ्यावं किंवा खलबत्त्यात चटणी
कुटावी, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर मीठ घालावे.
सुंदर तोंडीलावणे तयार.
This recipe has been posted by myself on 19.05.2017 @2.30 pm
ReplyDelete