Monday, 8 May 2017

Veg gold coin/sesame toast



Veg gold coin/sesame toast

Ingredients: 2-3 potatoes- boiled and mashed, 2 bell peppers green, 1 carrot, 1 onion all very finely chopped, ½ cup corn coarsely ground, ginger-garlic paste -1 teaspoon, 7-8 chilies –fine paste, 1 teaspoon soya sauce, pepper powder, salt, corn flour ½ cup, 3 tablespoon sesame seeds, 10-12 bread slices, oil for frying.

Procedure: First take out the borders of slices and shape them circular with the help of any bowl having edges. Then mix all the ingredients till salt together and add 2-3 teaspoon breadcrumbs (you can use the leftover slices after cutting the borders) for binding.

Place this mixture nicely and firmly on one side of the slice. Make a watery paste of corn flour. Apply a little paste on the mixture and then apply the sesame seeds on it, nicely.

Fry these coins in oil till they become golden brown from both the sides.

Serve with schezwan sauce

व्हेज गोल्ड कॉईन/ सीसमी टोस्ट

आपल्याला खूप वेळा हॉटेल मध्ये हे स्टार्टर म्हणून मिळते. तर त्याची ही व्हेज आवृत्ती एका मित्राकडून कळल्या बरोबर तुमच्यासाठी हजर.J

साहित्य: २-३ बटाटे उकडून. किसून, २ ढोबळी मिरच्या बारीक चिरून, १/२ कप मक्याचे दाणे भरडसर वाटून, १ मध्यम गाजर-बारीक चिरून, कांदा -१ बारीक चिरून, आलं-लसूण पेस्ट १ टी -स्पून, मिरची पेस्ट ७-८ मिरच्यांची, १ चमचा सोया सॉस,मिरपूड, मीठ, कोर्नफ्लोर १/२ कप, ३ टेबलस्पून तीळ, ब्रेड च्या १०-१२ स्लाईस, तळण्यासाठी तेल.

कृती:  पहिल्यांदा ब्रेड च्या कडा काढून वाटी ने गोलाकार कापून घ्याव्या. वरचे मीठापर्यंत चे सगळे साहित्य एकत्र करून त्यात या राहिलेल्या कडांचा २-३ चमचे चुरा बाइन्डिन्ग साठी मिक्स करावा. 
ब्रेडच्या स्लाइसवर हे मिश्रण एका बाजूस दाबून बसवावे. कोर्नफ्लोर ची थोड्या पाण्यात पातळ पेस्ट करून घ्यावी. ती या सारणावर थोडी लावावी आणि ही स्लाईस तिळात घोळवावी.
तेल तापवून तिळाची बाजू वर करून त्यात स्लाईस सोडावी. एक बाजू सोनेरी झाली की दुसर्याही बाजूने तळावी. शेजवान सॉस बरोबर खायला द्यावी.



1 comment:

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...