Tuesday 9 May 2017

Matar kachori/green peas kachori: मटार कचोरी:






Matar kachori/green peas kachori:

Ingredients

1.For cover – 2 bowl full all-purpose flour (maida), 2 tablespoons very hot oil –mohan, carom seeds- a pinch, salt and lukewarm water.  Take maida in a pot. Mix all the ingredients and with the help of lukewarm water knead a tight dough. Don’t knead too much, otherwise kachories will not be crispy. Keep the dough covered for half an hour.

2. for filling: coarsely ground ½ kg matar/green peas. In a pan, take 2 teaspoon oil, when the oil becomes hot, add mustard and cumin seeds. As they splutter, add asafetida and turmeric powder. Add green chilies-Ginger-garlic paste. Saute it for 1 minute till the raw smell vanishes. Add ground peas paste and cover the pot for 2 minutes. Add  roasted and powdered fennel seeds ½ teaspoon, garam masala ½ teaspoon, coriander seeds and cumin powder ½ teaspoon, amchoor powder, salt and a pinch of sugar. Let this mixture cool.

After this mixture becomes cool, take a lemon sized ball of maida dough and roll it like a small puri. In the center, place a teaspoonful of filling and seal it from all sides. Press it between your palms and then roll to a shape of kachori. Make all the kachories in this manner.

Heat the oil in Kadhai. When the oil becomes too hot, keep the gas on low flame and deep fry all the kachories. It takes a lot of time to fry, but then only you will get good crispy kachories.

Enjoy it with coriander chutney and tomato ketchup.


मटार कचोरी:
साहित्य: १. आवरणासाठी: २ मोठ्या वाट्या मैदा, २ मोठे चमचे कडकडीत तेलाचं मोहन, १ छोटा चमचा ओवा, मीठ, कोमट पाणी.
२. सारणासाठी: अर्धा किलो मटार, हिरव्या मिरच्या व आलं लसूण पेस्ट- २ चमचे. (आपल्या आवडीनुसार), मीठ (चवीनुसार ), साखर –चिमूटभर, आमचूर पावडर अर्धा चमचा, गरम मसाला-१ छोटा चमचा, बडीशेप भाजून व पावडर करून – १ लहान चमचा, धने-जिरे पावडर – एक छोटा चमचा, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
३. तळण्यासाठी तेल

कृती: १. मैद्यात कडकडीत गरम तेल, ओवा,मीठ घाला आणि आधी हलक्या हाताने मिक्स करा. मैद्याचा मुटका व्हायला हवा एवढा मोहन हवं. मग कोमट  पाणी हळूहळू घालून  हलक्या हाताने गोळा मळावा. घट्टसर. पण खूप मळू नये. नाहीतर कचोरी खुसखुशीत होत नाही. गोळा झाकून ठेवावा.
२. मटार भरडसर वाटून घ्यावे. पातेल्यात फोडणी करून त्यात मिरची-आलं –लसून पेस्ट परतावी. त्यावर ही मटार पेस्ट घालून परतावं आणि एक वाफ काढावी. नंतर त्यात सर्व मसाले आणि साखर, मीठ, आमचूर पावडर घालावी व सारण थंड होऊ द्यावे.

नंतर मैद्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात चमचाभर सारण भरून गोळा करावा. तो हातानेच आधी चपटा करावा. आणि नंतर थोडीशी हलक्या हाताने लाटावी. आधीच लाटली तर फुटते. अशा प्रकारे सर्व कचोर्या करून घ्याव्यात.

तेल चांगल तापवावं. एकदा छान तापल की मंदाग्नी वरच सगळ्या कचोर्‍या तळाव्यात. तळायला खूप वेळ लागतो. पण तेव्हाच त्या खुसखुशीत होतात.
कोथिंबीरीची चटणी करून याबरोवर द्यावी.




3 comments:

  1. मस्त!! छान होतोय ब्लॉग, खूप खूप लिही.

    ReplyDelete
  2. धन्यवाद मीनल

    ReplyDelete
  3. This recipe has been posted by me on 09.05.2017 @ 5 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...