Tuesday 31 October 2017

Potato Tikki-My Magic / बटाटा टिक्की - माय मॅजिक

Potato Tikki-My Magic


Ingredients:

 7 medium sized boiled potatoes, sago flour as per requirement, 2 teaspoon cumin seeds, 2 hot green chillies, 1 inch ginger piece, 1 pinch dry Mango powder, salt as per taste, cashew nuts for garnishing, oil for shallow fry.

For Dip/Chutney:

 3 medium sized cucumbers- peeled and cut in small pieces, 1 green chilli,1/2 inch ginger piece, salt as per taste and 2 tablespoon curd.

Method:-

 Grind chillies, ginger, salt, cumin seeds from mixer. Mash the potatoes. Add  chilli paste  and a pinch of dry mango powder and add sago flour as required to make the tikkies. Prepare all the tikkies ,put one cashew on each tikki and Keep them in refrigerator for 15 minutes. Then  shallow fry them.

For Dip/Chutney:

 take all the ingredients of Dip mentioned above and make a smoothy style paste from the mixer.
The Dip is ready.

Serve Hot.

Enjoy the Tikkies with this Dip.

With this measurement, you can make 15 medium sized tikkies.


बटाटा टिक्की - माय मॅजिक



साहित्यः 

७ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, साबुदाणा पीठ- आवश्यकतेनुसार, २ टीस्पून जिरे, २ तिखट हिरव्या मिरच्या, १ इंच आलं, चिमूटभर आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी काजू शॅलो फ्राय करण्याकरिता तेल.

डिप/चटणी  बनविण्यासाठी: 

३ मध्यम आकाराच्या काकड्या, १ हिरवी मिरची, १/२ इंच  आलं. चवीनुसार मीठ, दही २ टेबलस्पून.
कृती: मिरची, आलं, जिरे, मीठ यांचे वाटण करून घ्या. उकडलेल्या बटाट्यात हे वाटण घालून त्यात आवश्यकतेनुसार साबुदाणा पीठ  व चिमूटभर आमचूर पावडर घालून मध्यम आकाराच्या टिक्क्या करून त्यावर काजू लावा. १५ मिनिटांसाठी या टिक्क्या फ्रीज मध्ये ठेवा. आणि  एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापवून शॅलो फ्राय करा.


डिप्/चटणी: काकडीची साले काढून तिचे तुकडे करून घ्या . आता हे तुकडे, मिरची, आलं, मीठ आणि दही एकत्र मिक्सरमधून फिरवा.

उपासाची आलू टिक्की आणि डिप चा मस्तपैकी आस्वाद घ्या..

या साहित्यात साधारणपणे १५ टिक्क्या तयार होतात.

Saturday 21 October 2017

Shahi Vegetable Biryani / शाही व्हेजिटेबल बिर्याणी



Shahi Vegetable Biryani: My Magic



Recipe: for 4 people.

Ingredients:

 1.5 cups Basmati rice, 1.5 cups mixed vegetables- cut in medium pieces. (I have taken Carrots, green peas, French Beans, Flower, potato and one green chili cut in half.) 7 medium onions, 8-10 garlic cloves, 1 inch piece of ginger, 2 ripe tomatoes, 100 grams fresh cottage cheese (pander), 1 teaspoon black cumin seeds (Shaha jire), 5 cloves, 1 inch cinnamon stick, 2 black cardamoms, 2 green cardamoms, 1 bay leaf, 2 teaspoon biryani masala, 10-12 saffron strands soaked in 2 teaspoon milk, 2 tablespoon thick curd, 10 almond and 10 cashew nuts cut finely, bunch full of coriander leaves and mint leaves finely chopped, 1 pinch sugar, ½ teaspoon red chili powder, salt as per taste, water and oil as per need.


Method: 

Wash Rice and drain it. Keep for at least 2 hours. Cut the vegetables in medium size. Don’t cut very finely otherwise all the vegetables will get mashed up.
Blanch 2 tomatoes and puree them.  Make paste of ginger, garlic and 2 onions.
After two hours take 6 cups water in a large pan and add 1 teaspoon salt, 5 cloves, cinnamon stick, black and green cardamoms, 1 bay leaf and 1 teaspoon oil.  Boil the water. Add drained rice and let it cook up to 80% not more than that. Drain excess water from the rice by pouring it on a strainer. Let it cool.



In another pan,  heat 1 teaspoon oil. Add black cumin. After it splutters, add ginger-garlic-onion paste. Saute it. Add tomato puree and again sauté it. Add red chili powder, Biryani masala and sauté till the oil separates. Add all the vegetables. Cover the pan for 2-3 minutes. Add  pieces of cottage cheese. Add salt as per taste and a pinch of Sugar. The vegetables should be nicely coated with the masala.



Now take one pan. Add 1 teaspoon of clarified butter (Desi ghee) and a little water in it. Now make 1 layer of the half done rice in that pan. Above this layer, make one layer of the mixed vegetables. Add third layer of coriander and mint leaves, fourth layer of cashew nuts and almonds. Add half of thick curd and again repeat the total process of layers. The uppermost layer should be of rice. Add remaining coriander and mint leaves and add the soaked saffron strands with milk in it. Now the process of making layers is complete.

making second layer
making 4th layer
making final layer


Sprinkle a spoonful of milk on the rice. Cover the pan. Now heat a griddle and keep this Biryani pan on it. The flame should be very slow. Cook the biryani for 5-7 minutes.
Now cut the remaining 5 onions length wise and very thin. Fry them and garnish the biryani with this onion.



Enjoy this biryani with Tomato soup,cucumber salad and fried papad.




शाही व्हेजिटेबल बिर्याणी - माय मॅजिक

वाढणी: ४ व्यक्तींसाठी.

साहित्यः 

१.५ वाट्या बासमती तांदूळ, १.५ वाट्या चिरलेल्या भाज्या (यात मी गाजर, मटार, घेवडा, फ्लॉवर आणि बटाटा या भाज्या घेतल्या आहेत आणि एक हिरवी मिरची २ तुकडे करून. ). ७ कांदे,८-१० लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ मोठे पिकलेले टोमॅटो, १०० ग्राम पनीरचे तुकडे, १ टीस्पून शहाजिरे५ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा, २ मसाला वेलच्या, २ हिरवे वेलदोडे, १ तमालपत्र, २ टीस्पून बिर्याणी मसाला, केशराच्या १०-१२ काड्या २ टीस्पून दुधात भिजवून२ टेबलस्पून घट्ट दही चांगले फेटून घेउन, प्रत्येकी १० बदाम आणि काजू बारीक तुकडे करून, प्रत्येकी मूठ्भर पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून, चिमूटभर साखर,१/२ टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार. पाणी आणि तेल आवश्यकतेनुसार.



कृती: 

प्रथम तांदूळ धुवून रोवळीवर २ तास उपसून ठेवा. भाज्या चिरून घ्या. चिरताना फार बारीक न चिरता मध्यम तुकडे करा नाहीतर बिर्याणीत त्या भाज्यांचा शिजून गाळ होतो.


२ टोमॅटो ब्लांच करून त्यांची मिक्सरमधून प्रुरी करून घ्या. आलं लसूण आणि २ कांदे घालून ही पेस्ट तयार करा.

दोन तासांनी एका मोठ्या पातेल्यात ६ वाट्या पाणी  गरम करत ठेवा. त्यात १ टीस्पून मीठ, ५ लवंगा, दालचिनी, १ तमालपत्र , दोन्ही प्रकारचे वेलदोडे घाला. १ टीस्पून तेल घाला. पाण्याला उकळी आली की धुवून उपललेले तांदूळ त्यात घाला. सतत ढवळू नका. तांदळाचा दाणा मोडतो.

तांदूळ साधारण ८०% शिजत आले की चाळणीवर ओतून त्यातील पाणी काढून टाका.  भात तसाच निथळत ठेवा .



एकीकडे दुसर्‍या पॅन मध्ये १टीस्पून तेल घाला. गरम झाले की त्यात शहाजिरे घाला. ते तडतडले की त्यात आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट घालून चांगली परता. मग टोमॅटो प्युरी घालून परत परता. त्यात तिखट, बिर्याणी मसाला घालून परता. तेल सुटू लागलं की सगळ्या भाज्या घाला. भाज्यांना एक चांगली वाफ येउदे. आता पनीरचे तुकडे घाला आणि चांगलं ढवळा. भाजीला मसाला सगळीकडून नीट लागायला हवा. चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घाला.



आता एका पॅन मध्ये खाली किंचित पाणी आणि १ चमचा साजूक तूप घाला. त्यावर या तयार भाताचा एक थर घाला. त्यावर भाजीचा थर घाला, त्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा थर, नंतर काजू आणि बदाम तुकडे, मग फेटलेल्या दह्यापैकी अर्ध दही असे थर लावा. परत भात, भाजी, कोथिंबीर-पुदीना, काजू-बदाम, दही आणि परत भात असे थर येउदेत. त्यावर उरलेली कोथिंबीर-पुदिना पाने घाला. वरून केशर मिश्रित दूध घाला. ही झाली बिर्याणीचे थर लावायची पध्दत.

२ रा थर 
४ था  थर 
शेवटचा थर


त्यावर चमचाभर दूधाचा शिपका मारा. आता एक तवा चांगला तापवा. त्यावर हे बिर्याणीचे पातेले ठेवा. त्यावर झाकण ठेवा आणि अगदी मंदाग्नीवर ५-७ मिनिटे शिजवा.

आता जे कांदे बाजूला काढून ठेवले असतील, ते लांब पातळ चिरून तळून घ्या आणि बिर्याणी वाढताना तिच्यावर हा तळलेल्या कांद्याचा कीस घालून द्या.


या बिर्याणीचा आस्वाद टोमॅटो सूप, काकडीची कोशिंबीर आणि तळलेल्या पापडाबरोबर जरूर घ्या.


Saturday 7 October 2017

Golabhat / गोळाभात

Golabhat: My Magic



Recipe: for 3 people

Ingredients:
2 cups rice (washed and drained), 4 cups hot water, 1 cup chickpea flour (besan) , 1 cup nicely chopped fenugreek leaves, 1 teaspoon ginger-garlic paste, ¼ cup grated dry coconut, 1 teaspoon cumin seeds, 2 teaspoon red chili powder, salt as per taste, juice of 1 lemon, ½ teaspoon sugar, 2 tablespoon oil,
Extra 2 tablespoon oil for tempering, 8-10 garlic cloves- slightly crushed,  mustard seeds, asafoetida, turmeric powder.

Method: 
Heat two tablespoon oil and in a pan and sauté  chickpea flour in it till it gives a nice aroma. Add fenugreek leaves and sauté again. Grind grated coconut, cumin seeds with ginger-garlic paste and add this mixture in the chickpea flour-fenugreek leaves mixture and keep aside to let it cool.
In other pan, take 1 teaspoon oil and sauté drained rice for 2-3 minutes. Add hot water and let it cook.
Now add chili powder, salt in the besan and add water slowly to knead the dough in the manner that we can make small balls out of it. Make the balls accordingly.
Till this time, the rice must be half done. Add 1 pinch chili powder, salt as per taste, sugar and lemon juice. Mix properly and add the besan-methi balls in the rice. Cover the pan and let the rice cook completely on slow flame. It will take 5 minutes. Switch off the gas.
Before serving, take 2 tablespoon oil and heat it. Add mustard seeds, asafetida and turmeric powder and garlic cloves. Add it to the rice.
Serve hot. Enjoy this rice with pickle, papad and buttermilk after that. Yummy.



गोळाभातः माय मॅजिक.

वाढणी: ३ व्यक्तींसाठी

साहित्यः 
२ वाट्या तांदूळ (धुवून अर्धा तास उपसून ठेवलेले), ४ वाट्या गरम पाणी, १ वाटी हरभरा डाळीचे पीठ, १ वाटी धुवून बारीक चिरलेली मेथीची पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, पाव वाटी किसलेलं कोरडं खोबरं,१ टीस्पून जिरे, २ टीस्पून तिखट, मीठ चवीप्रमाणे, १ लिंबाचा रस, १/२ टीस्पून साखर२ टेबलस्पून तेल, , वरून घ्यायच्या फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल८-१० लसूण पाकळ्या ठेचून, मोहरी, हिंग, हळद.

कृती: 
एका भांड्यात २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात हरभरा डाळीचे पीठ छान खमंग भाजून घ्यावे. त्यातच मेथीची चिरलेली पाने घालून परतून घ्यावीत. आलं लसूण पेस्ट, किसलेले खोबरे आणि जिरे वाटून घेउन  या मिश्रणात घालावे. नीट २-३ मिनिटे परतून हे मिश्रण थंड होउ द्यावे.

तोपर्यंत एका पातेल्यात १ टीस्पून तेल घालून ते गरम झाले की त्यात उपसून ठेवलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावेत. नंतर त्यात गरम पाणी घालून भात शिजत ठेवावा.

आता हरभरा डाळीच्या पिठात तिखट, मीठ घालावे आणि या पिठाचे सुपारी एवढे गोळे करता येतील या बेताने पाणी घालून पीठ भिजवावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.

शिजत असलेल्या भातात अगदी चिमूटभर लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालावा. अर्ढवट शिजत आलेल्या भातात हे गोळे अलगद सोडावेत आणि झाकण लावून भात मंदाग्नीवर शिजू द्यावा.


वाढण्याआधी एका कढल्यामध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद आणि लसणीच्या पाकळ्या घालून चरचरीत फोडणी करावी आणि भातावर घालावी. लोणचं, पापड आणि ताकाबरोबर आस्वाद घ्या या गोळाभाताचा..


Guravali /गुरवळी

Guravali –My Magic




This is an almost lost recipe of Maharashtra. It’s  a sweet dish made on the occasion of our festivals like Diwali. Let’s see how it is made:

Ingredients:
For cover:
1.      1 cup semolina (Fine one), ½ cup maida (All-purpose flour), 2 teaspoon Clarified butter (Desi Ghee), 1 pinch salt and water as required.
2.      For stuffing: ½ cup grated dry coconut, 2 teaspoon poppy seeds (Khuskhus), 1 cup powdered sugar, 1 teaspoon green cardamom powder.
3.      For deep frying : Desi ghee
4.      For dusting: ½ cup rice flour
5.      And THE most important: Jasmine  flower buds – as required.


Method:

Mix semolina, all-purpose flour, 2 teaspoon ghee and 1 pinch salt and knead firm dough with water as required . Keep the dough covered for at least an hour.

Now, heat a pan and dry roast grated dry coconut first and then poppy seeds (khuskhus) till they give a nice aroma. Powder them from mixer to a very fine paste and add powdered sugar and cardamom powder in it. The stuffing is ready.

Now again take the dough and knead it well again.

Take a small lemon sized ball out of it. Give a shape of bowl and stuff the mixture in it. Stuff to the fullest capacity of that bowl and seal it. Now roll this small stuffed ball with the help of rice flour lightly. See that there are no corners to this puri at all. The stuffing should spread nicely in the puri.

Heat ghee in a kadhai and deep fry this puri on a slow flame.  When it puffs up, immediately change the side of puri and keep pouring ghee (from the kadhai only) on this puri. It should puff up completely like a ball . Make all the guravalies like this.

Now take one guarvali and make 4-5 holes in it with the help of a niddle, small pin and insert the jasmine flower buds in the guravali.






When someone opens this gurawali (in the evening or next morning) for eating, they will surely get surprised to see the jasmine flowers inside the gurawali.




This sweet gets a good flavour of cardamom as well as the flavour of jasmine flower also. It gets along very well with each other. It smells very good and tastes yummy.

Do try it this Diwali. Its just unique.


गुरवळी: माय मॅजिक

या पदार्थाच नाव गुरवळी. इतकं अनाकर्षक नाव असलेला पदार्थ..पण स्वाद आणि सुवास उत्तम. (हो. बरोब्बर वाचताय तुम्ही). तर आता पाहू ही गुरवळी कशी करायची ते:
साहित्यः
१. आवरणासाठी: १ वाटी बारीक रवा, १/२ वाटी मैदा, २ टीस्पून साजूक तूप, चिमूटभर मीठ, पाणी आवश्यकतेनुसार.

२. सारणासाठी: १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, १ वाटी पिठीसाखर,१ टीस्पून वेलदोड्याची पूड.
३. तळण्यासाठी: साजूक तूप
४. लाटण्यासाठी: १/२ वाटी तांदळाची पिठी
५. सगळ्यात महत्त्वाचे साहित्यः जाईच्या कळ्या.


कृती:
पहिल्यांदा रवा, मैदा, २ चमचे तूप, चिमूटभर मीठ हे सारं एकत्र करून घट्ट मळून गोळा तासभर झाकून ठेवा.

नंतर किसलेले खोबरे आणि खसखस वेगवेगळे खमंग भाजून घेउन मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. त्यात वेलदोडे पूड आणि पिठीसाखर मिसळून सारण तयार करा.
आता मळलेला गोळा किंचित पाण्याचा हात घेउन चांगला भरपूर मळा. पुरणपोळीच्या कणकेपेक्षा किंचित घट्ट गोळा हवा.

या गोळ्यातून एका पुरीएवढी गोळी घ्या, तिला वाटीचा आकार देउन त्यात हे सारण चमच्याने दाबून मावेल तितकं घाला. वाटीचं तोंड बंद करा आणि तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पुरी लाटा. या पुरीला काठ रहाता कामा नये. आता गरम तुपात ही पुरी ज्या बाजूने तोंड बंद केलं होतं ती बाजू वर ठेवून सोडा. थोडी फुगली की लगेच उलटा. पळीने त्या पुरीवर कढईमधलं तूप घालत रहा. मंदाग्नीवर सावकाश तळा. अशा प्रकारे सगळ्या गुरवळ्या तयार करा.





आता थंड झालेली एक गुरवळी हातात घेउन तिला दाभणाने चार- पाच भोके पाडा आणि त्यात चार-पाच जाईच्या कळ्या घाला. असं सगळ्या गुरवळ्यांचं करायचं.

दुसर्‍या दिवशी किंवा संध्याकाळी नैवेद्य दाखवला की द्यायची प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला.
प्रत्येक जण ही गुरवळी खाण्यासाठी फोडतो तो काय......... आतून उमललेली जाईची सुरेख फुलं बाहेर पडतात. ही दिसतात पण छान आणि त्यांचा वासही या गुरवळीला उत्तम लागतो.




या दिवाळीत जरूर करून पहा हा उत्तम पदार्थ. 







Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...