Monday, 8 May 2017

Ukadpendi/Ukarpendi: उकडपेंडी/उकरपेंडी :



ukadpendi उकड्पेंडी


Ukadpendi/Ukarpendi: 

This is one of the famous breakfast menu from Vidarbha and this can be prepared from the ingredients we are having available always at home. :)
Ingredients: 1 cup sorghum flour (Jowar aata), oil, mustard seeds, cumin seeds, turmeric powder and asafoetida for tempering, 6 green chilies, few curry leaves, 1 onion finely chopped, 2 cupes buttermilk. (not too sour), salt and sugar as per taste, chopped coriander for garnishing.

Procedure: Dry roast the jowar flour on slow flame till it gets a good aroma.. 
make a tempering of oil, mustard seeds, cumin seeds, turmeric powder and asafoetida and add curry leaves, green chilies and onion. Saute till the onion gets golden brown colour. Meanwhile mix the roasted flour in buttermilk such that there are no lumps. Add sugar and salt to the mixture. Slowly add this mixture in the tempering. Cover the pan and let it cook for 5-7 minutes.
Garnish with finely chopped coriander.

Note: Serve hot. This doesn't taste that nice when cooled down.


उकडपेंडी/उकरपेंडी :
या मंडळी नाश्त्याला. आज मी केली उकडपेंडी/उकरपेंडी. घरच्याघरी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांमधून बनणारा एक खमंग आणि स्वादिष्ट वैदर्भीय पदार्थ. उकडपेंडी/उकरपेंडी कणकेची जशी करतात तशीच ज्वारीच्या पिठाचीही करतात. मी ज्वारीचं पीठ वापरलंय.
पहिल्यांदा एक वाटी ज्वारीचं पीठ मंदाग्नीवर चांगलं खमंग भाजून घेतलं.
नंतर जरा जास्त तेलाची फोडणी मोहरी, जिरे, हळद, हिंग (किंचित जास्त), आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (मी ६ घेतल्या. तिखट असतात त्या) आणि कडीपत्ता घालून केली. त्यात एक कांदा बारीक चिरून घातला. कांदा परतून होईतो एकीकडे २ वाट्या ताकात (अती आंबट नाही) भाजलेलं ज्वारीचं पीठ एकत्र करून छान ढवळून ठेवलं. गुठळ्या होऊ न देता. त्यातच चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घातली. कांदा परतला गेल्यावर त्यात हे मिश्रण घातलं. मस्त ढवळून झाकण ठेवलं आणि दणदणीत वाफ काढली.
आणि काय? संपलं की काम. मस्त डीशमध्ये घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यावर आणि स्वाहा... अहाहा!!!

तळटीप- हा पदार्थ अगदी मोकळा होत नाही. आपण तांदळाची उकड करतो तसाच प्रकार. गरम गरमच खायचा.



1 comment:

  1. This recipe has been posted by me on 08.05.2017 @ 10 am

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...