Instant Dhokla:
Ingredients: 1 cup
(125 gms) chickpea flour (besan), 2 teaspoon semolina, 1 teaspoon oil, 4
teaspoons sugar, ½ teaspoon salt, ¼ teaspoon citric acid, 1 eno sachet
(regular), water- as required.
For tempering: oil, mustard seeds, asafetida, curry leaves, ½
teaspoon sugar dissolved in 3 teaspoon water, chopped coriander for garnishing.
Method: First of all keep the cooker on high flame with
sufficient water as usual. Grease one dhokla plate or a regular cooker pot . Mix
all the ingredients except Eno in big bowl. Taste and adjust sugar according to your
taste. The batter should be of the consistency of pakoda batter. Now add eno and whisk the batter vigorously.
And immediately transfer this mixture to a greased plate/pot and keep that in doula
stand/cooker immediately. Close the cooker without whistle. Keep the cooker on high flame for 10
minutes. Take out the Dhaka pot and let
it cool.
Meanwhile in a small kadhai, heat the oil and add mustard seeds, asafetida
and curry leaves. (don't add turmeric powder). Put the gas flame off and add sugar water in it. Immediately
add this mixture on doula and cover the pot for 10 minutes.
After that, shape the dokla according to your choice and
serve it with finely chopped coriander and fried green chilies.. Enjoy
झटपट ढोकळा:
साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा,
१
टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ,
१/४
जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार
पाणी.
फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग,
कढीपत्ता
आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली
कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती: सगळ्यात आधी कुकर पाणी घालून गॅसवर
मोठ्या आचेवर ठेवा. कुकरच्या एका भांड्याला थोडसं तेल लावून घ्या. इनो सोडून सगळे पदार्थ एका मोठ्या बोल मध्ये एकत्र
करून पाणी घालून भज्यांच्या पिठाइतपत भिजवून घ्या. चव घेउन आंबट वाटलं तर किंचित साखर घाला. (जर
वाटलं तरच)
आता सगळी एनर्जी एकवटून भराभर काम सुरु करायचं
बरं का. या पिठात इनो घालून खूप फेटायच. २ मिनिटात हे मिश्रण अगदी हलकं होतं. आता
हे मिश्रण ताबडतोब तेल लावलेल्या भांड्यात ओता. अर्ध पातेलं भरेल इतपतच घाला. कारण
ढोकळा फुगून ते पूर्ण भरेलच; :)
हे भांडं ताबडतोब कुकरमध्ये ठेवा. याला उशीर
झाला तर ढोकळ्याच्या पिठाचा मूड जातो आणि तो म्हणतो आता नाही फुगणार मी ;)
कुकरची
शिट्टी न लावता १० मिनिटे वाफवा आणि भांडं
बाहेर काढून ढोकळा गार करत ठेवा.
आता एका कढल्यात नेहमीप्रमाणे फोडणी करा.फक्त
त्यात हळद घालायची नाहीच्च.. गॅस बन्द करून
त्यात साखरेचं पाणी घाला. हे मिश्रण ताबडतोब ढोकळ्यावर ओता आणि १० मिनिटेढोकळा
झाकून ठेवा.
नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडा आणि बारीक
चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून तळलेल्या मिरच्यांबरोबर खायला द्या.
Tasty And khamaang
ReplyDeleteThis recipe has been posted by me on 12.05.2017 @ 4 pm
ReplyDelete