Monday 8 May 2017

Veg Kurma:/व्हेज कुर्मा:



Veg Kurma:


Ingredients – 

a)      1 cup each –french beans , carrot and potato, peeled and diced  into 1 cm size, medium sized flower florets, green peas – all blanched
b)      6 cashew nuts, 6 almonds and 1 teaspoon poppy seeds boiled in hot water.
c)       2 medium sized onions finely sliced and roasted with minimum oil till brown and crispy
d)      2 medium tomatoes-puried
e)      Oil, 1 tsp each cumin seeds, ginger -garlic paste, coriander cumin powder, garam masala, ½ tsp turmeric powder, salt according to taste.
f)       1 bay leaf, ½ inch cinnamon stick, 1 black cardamom, 5-5 clove and black papper
g)      2 tsp curd, 1 bunch mint leaves finely chopped.

Procedure:



In a mixer make a fine paste of poppy seeds, cashew nuts,  almonds. Add roasted onion and make a very fine paste.
In a pan, heat oil and add cumin seeds, bay leaf, cinnamon, cardamom, clove and black pepper.. Add ginger-garlic paste and add ground masala. Soute till oil gets separated. Add tomato puree and again sauté finely. When the oil starts separating again, add curd, mint leaves, all spices and vegetables. Add salt and  a little water. Cover the pan with lid for 5 minutes.

Garnish with chopped coriander and Serve hot with rotis.


व्हेज कुर्मा: 
बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते.

साहित्यः
१. प्रत्येकी एक वाटी फ्रेंच बीन्स - तिरके शंकरपाळ्याच्या आकारात कापूनगाजर आणि बटाटे सालं काढून, १ सेंमी च्या चौकोनी आकारात चिरून, फ्लॉवर- मध्यम आकाराचे तुरे काढून, मटार.- हे सारं गरम पाण्यात ४ मिनिटे ब्लांच करून लगेच थंड पाण्यात घालून चाळणीवर उपसून ठेवले.
२. पाककृती करायच्या आधी तासभर  एक कप गरम पाण्यात ६-६ काजू, बदाम आणि १ चमचा खसखस भिजत घातली होती.
३. मध्यम आकाराचे दोन कांदे पातळ चिरून फ्राय पॅन मध्ये चमचाभर तेल घालून कुरकुरीत होईतो परतून घेतले.
४. मध्यम आकाराचे २ टोमॅटो- प्युरी करून घेतले.
५. तेल, प्रत्येकी एक चमचा जिरं, आलं लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, धने-जिरे पावडर, १/२ चमचा हळद, मीठ चवीनुसार.
६.१ तमालपत्र, १ दालचिनीची छोटी काडी (१/२ इंच), १ मसाला वेलची, ५-५ लवंगा, मिरीचे दाणे
७. २ चमचे दही आणि मूठभर पुदिना पाने धुवून, बारीक चिरून. सजावटीला चिरलेली कोथिंबिर.

कृती:
काजू, बदाम, खसखस बारीक वाटून घेतले. त्यातच परतलेला कांदा घालून परत एकदा अगदी गंधासारखं मऊ वाटून घेतले.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात सगळा खडा मसाला आणि जिरे घातले. आलं लसूण पेस्ट आणि हा वाटलेला मसाला घालून छान परतले. मग त्यात टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेतो परतून घेतले. त्यात तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून थोडंसं परतून त्यात दही घातले. बाजूने तेल सुटू लागल्यावर त्यात सगळ्या भाज्या, पुदिना पाने घालून थोडंसं पाणी घातलं. मीठ घालून झाकण लावून ५ मिनिटे शिजवलं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोबर वाढलं.


3 comments:

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...