‘Bhogi’ is
celebrated a day before Makar sankranti in Maharashtra. As its winter season, all
fresh vegetables are available easily.
So, this type of mixed vegetable is prepared specially on this day and all the
family members enjoy having it early in the morning. Let’s see the recipe for
Bhogichi Bhaaji.
Recipe for -4
people
Ingredients :
1 small
carrot, 7-8 ber (Indian Jujube),
fresh green chana (chick peas)Lima beans, broad beans, lablab beans and many
other types of beans available in the market, 1 potato, 1 small brinjal, 1
drumstick, 4-5 pieces of sugarcane (cut into 1 inch size), green peas, raw tamarind and ginger piece of 1 inch - all these vegetables equal to ½ kg.
¼ cup scrapped fresh coconut, ½ cup finely chopped coriander,
3 teaspoon roasted sesame powder, 2 teaspoon roasted peanut powder, 2 teaspoon Maharashtrian Goda Masala, 2
teaspoon red chilli powder, 1 teaspoon tamarind pulp, 2 teaspoon jiggery (Adjust
according to your taste), salt as per taste.
For tempering: oil, mustard seeds, cumin seeds, asafoetida,
turmeric powder, few curry
leaves.
Method:
peel carrot, drumstick and potato. Make medium size pieces
of potato and brinjal and keep in water. Clean and de shell all the other
vegetables. Cut Carrot also in medium size cubes, make 4-5 pieces of drumstick.
Heat oil in a pan and make usual tempering by adding mustard
seeds, cumin seeds, asafoetida, turmeric powder, few curry leaves. Add brinjal,
potato and drumstick pieces and cover the pan. Steam for
2 minutes. Add all the other vegetables. Stir properly and steam again for 2
minutes. Add chilli powder, salt, goda masala, tamarind pulp, jiggery, roasted
sesame and peanut powder. Add very less water just to cook the vegetables.
Serve after garnishing with scrapped coconut and chopped coriander.
This subjee is served with Bajra bhakri prepared with sesame,
a dollop of white butter on it, yellow
lentil-rice khichadi, kadhi and sesame chutney.
Do give it a try. Its just awesome. Yummilicious..
संक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगीचा दिवस
म्हणून महाराष्ट्रात साजरा करतात. तीळ लावलेली भाकरी, मुगाची
खिचडी, कढी आणि ही भाजी हा भोगीचा मुख्य नैवेद्य असतो. तर आज पाहू भोगीची
भाजी कशी करायची ते. हिला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात.
पाककृती: ४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१ छोटे गाजर, ७-८ बोरं, सोलाणे (ओल्या हरभर्याचे दाणे ),
पावटा,
पापडी
, डबलबी आणि इतरही मिळतील आणि आवडतील त्या सर्व शेंग भाज्या, १
बटाटा, १ वांगं,शेवग्याची १ शेंग, उसाचे ४-५
सोललेले तुकडे (करवे), मटार, १ इंचाचा ओल्या हळदीचा आणि आल्याचा तुकडा अशी सगळी मिळून भाजी अर्धा किलो
१/४ वाटी खोवलेले खोबरे, १/२ वाटी बारीक
चिरलेली कोथिंबीर, ३ टीस्पून तिळाचं आणि २ टीस्पून शेंगदाण्याचं
कूट, २ टीस्पून गोडा मसाला,२ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून
चिंचेचा दाट कोळ, २ टीस्पून गूळ (आवडी नुसार कमीजास्त करु शकता
)चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे,
हिंग,
हळद,
कढीपत्ता
कृती:
गाजर, शेवग्याच्या
शेंगा आणि बटाटा यांचे साल काढा. बटाटा आणि वांगं
यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन पाण्यात ठेवाव्या म्हणजे त्यांचा राप
निघुन जाईल. इतर सर्व शेंग भाज्या नीट निवडून आणि दाणे काढून घ्याव्यात. काही शेंगांच्या
सालीही चालतात.त्याही घ्याव्यात. गाजराचेही मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
शेवग्याच्या शेंगांचे ४-५ तुकडे करावेत.
आता एका पातेल्यात तेल घेउन नेहमीसारखी मोहरी,
जिरे,
हिंग,
हळद,
कढीपत्ता
घालून फोडणी करावी. त्यात पहिल्यांदा वांगं, बटाटा आणि
शेवग्याच्या शेंगा घालून एक वाफ काढावी. नंतर त्यात बाकीच्या सर्व भाज्या
घालाव्या. नीट ढवळून परत एक वाफ काढावी. त्यात तिखट, मीठ, गोडा
मसाला, चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. तिळाचे आणि शेंगदाण्याचे कूट घालावे.
पाणी अगदी जेमतेम घालून ही भाजी शिजवावी. वाढताना वरून खोवलेले खोबरे आणि कोथिंबीर
घालून द्यावी.
भोगीच्या दिवशी ही भाजी
तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, मुगाची खिचडी, कढी आणि तिळाच्या चटणीबरोबर खातात.
करा तर मग ...
This recipe has been posted by me on 13.01.18 at 7:20 am
ReplyDelete