Pointed
gourd (parwal) subjee: My Magic
Recipe for
2-3 people
Ingredients:
1/2 kg pointed gourd (Parwal), 1 teaspoon each red chili powder and
coriander-cumin seeds powder, salt as per taste, for tempering - oil, mustard
seeds, asafetida, turmeric powder. Optional- 1 teaspoon roasted groundnut powder. (After cleaning and deseeding, this
vegetable becomes much less in weight. So, take accordingly)
Method:
Wash
and remove the skin of the pointed gourds (Parwal) . Take out the seeds and
surrounding part. Slice the pointed gourds vertically.
cleaned pointed gourds (Parwal) |
Heat oil in
a pan. Add mustard seeds, asafetida, and
turmeric powder. Add the pointed gourd pieces and cover the pan for 2 minutes.
Then uncover it and add red chili powder, coriander-cumin seeds powder and salt
as per taste. Saute for 2-3 minutes and add roasted groundnut powder if you
like.
The parwal
vegetable is ready. Serve it with hot rotis.
This
vegetable is very easy to cook and very tasty. Do try.
परवलाची
भाजी - माय मॅजिक
वाढणी:
२-३ व्यक्तींसाठी
साहित्यः
१/२ किलो परवल, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून धने-जिरे पावडर, चवीनुसार मीठ, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, हळद, दाण्याचे कूट (ऐच्छिक) १ टीस्पून.
कृती:
परवल धुवून, साले काढून त्यातील बिया व जाळी काढून टाकून त्यांचे उभे पातळ काप करून
घ्यावेत. (साले, बिया असं सगळं जाउन ही भाजी तशी कमी
होते. त्यामुळे नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त लागते)
साले काढलेले परवल |
एका
पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून त्यावर हे परवलाचे काप
घालावेत. झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर त्यात तिखट, मीठ, धने-जिरे पावडर घालून हवे असल्यास
दाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.
अतिशय
साधी तरीही खूप चवदार आणि पटकन तयार होणारी ही भाजी आहे. अगदी ५-७ मिनिटात ही भाजी
शिजते. गरम पोळी बरोबर खूप छान लागते.
This recipe has been posted by me on 29.06.2017 @ 10:10 p.m.
ReplyDelete