Sunday, 9 July 2017

Vadapaav, chili bhaji and mint chutney / वडापाव, मिरची भजी आणि पुदिना चटणी





Vadapaav, chili bhaji and mint chutney: My magic

There is no any need to describe the popularity of VadapAav. So, lets see how I made it.

Ingredients:

1.For vada: 1/2 kg boiled potatoes, 2 teaspoon ginger-garlic paste, paste of 6-7 green chilies (you can take according to your taste),  8-10 curry leaves, for tempering oil, cumin seeds, mustard seeds, asafoetida, turmeric powder, salt according to taste, 2 teaspoon finely chopped coriandar leaves.
2. for vada batter: 2 cups besan, 1/2 teaspoon red chili powder, 1/4 teaspoon turmeric powder, salt as per taste, sufficient water for making the batter, 2 pinch baking soda.
3. for chutney: 2 bunch full of mint leaves, 1 bunch full of coriander leaves, 1 inch piece of ginger, 1/4 cup fresh scrapped coconut, juice of half lime, 1 teaspoon cumin seeds, 5-6 green chilies (take according to your taste), salt as per your taste.
4. for chili bhaji: green chilies, dry mango powder (aamchur powder), salt (take proportion of aamchur powder and salt as 2:1)
5. Oil : for deep frying
6. paav: as per requirement.

Method:

1.Boil potatoes and cut them to small pieces.
2. Mix all the ingredients (except baking soda ) from Sr. No.2 above and prepare the batter.
3. Take all the ingredients mentioned in Sr. No.3 above and prepare chutney in mixer.
4. Make a vertical slit on green chilies and stuff the mixture of aamchur powder and salt in every chili and keep them ready.
5.Heat oil in a pan and  add cumin seeds, mustard seeds, asafoetida, turmeric powder,  8-10 curry leaves, ginger-garlic paste, green chili paste and saute till the raw aroma goes off. Add potatoes, salt and chopped coriander. Let  the mixture cool down.
6.Prepare vadas from this mixture.
7. Add Baking soda in the vada batter and mix well.
8.Heat oil in a kadhai. Dip vada in the batter and deep fry them on golden brown colour.
9.Make chili bhajis also by dipping chilies in the batter and deep frying them.
10.Cut a pav in between. spread chutney and keep one vada in the middle.
11. Serve this with mirchi bhaji.
12. Some people prefer tamarind chutney also with this. But I have nor prepared this.

From the above measurement, I could prepare 15 vadas of medium size.
Enjoy.




वडापाव, मिरची भजी आणि पुदिना चटणी - माय मॅजिक
वडापाव ची महती वेगळी सांगण्याची काहीच गरज नाही. तर आज संध्याकाळचा आमचा मेनू हाच. चला तर पाहू कसा केला ते..

साहित्यः

१. वड्यांसाठी - १/२ किलो बटाटे, २ चमचे आलं लसूण पेस्ट, ६-७ हिरव्या मिरच्यांची पेस्ट (आपल्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करू शकता), चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची ८-१० पाने, फोडणी साठी तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
२. वड्यांच्या आवरणासाठी : २ वाट्या डाळीचे पीठ (बेसन), १/२ टीस्पून लाल तिखट, हळदचवीनुसार मीठ, पाणी आवश्यकतेनुसार,खायचा सोडा २ चिमूट.
३. चटणीसाठी: पुदिन्याची फक्त पाने- २ मुठी, १ मूठ कोथिंबीर, १ इंच आल्याचा तुकडा, ५-६ हिरव्या मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करू शकता), ओले खोबरे अर्धी वाटी खोवून, जिरे १ टीस्पून, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.
४. मिरची भज्यांसाठी: मिरच्या, आमचूर पावडर, मीठ. (मिरच्य हव्या तेवढ्या घेणे. ) आमचूर पावडर आणि मिठाचे प्रमाण २:१ असे घेणे.
५. तळण्यासाठी तेल.
६. आवश्यकतेनुसार पाव.

कृती:

१.सर्वप्रथम बटाटे कुकरमधून उकडून घ्यावेत. 
२.वड्यांच्या आवरणासाठी क्र. २ मध्ये लिहिलेले सर्व साहित्य फक्त खाण्याचा सोडा वगळून भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असे भिजवून ठेवावे.
३.क्र. ३ मध्ये दिल्याप्रमाणे चटणीचे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून चटणी करून घ्यावी. 
४.मिरचीच्या भज्यांसाठी मिरच्यांना उभी चीर देउन त्यात आमचूर पावडर आणि मीठ भरून मिरच्या तयार ठेवाव्यात.
५. उकडलेले बटाटे सोलून चिरून त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.
६. एका पातेल्यात तेल गरम करून नेहमीप्रमाणे जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी करून घ्यावी. त्यात आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून कच्चा वास जाईतो परतावे. बटाट्याच्या फोडी, मीठ घालून परतून थोडी कोथिंबीर घालावी.
७. ही भाजी गार झाली की तिचे गोल किंवा चपटे असे आपल्या आवडीनुसार वडे करून घ्यावेत.
८. भिजवलेल्या डाळीच्या पिठात सोडा घालून पीठ सारखे करून ठेवावे..
९. एका कढईत तेल गरम करून  हे वडे डाळीच्या पिठात घोळवून चांगले लालसर रंगावर तळून घावेत.
१०. तशाच भरलेल्या मिरच्याही डाळीच्या पिठात घोळवून मिरचीची भजी तळून घावीत.
११. एक पाव घेउन मधून कापून त्याला ही चटणी लावून त्यात एक वडा घालून खाण्यास द्यावा. बरोबर मिरचीची भजी द्या.
१२. याबरोबर काही जण चिंचेची गोडसर चटणीही करतात. ती मी यावेळी केली नव्हती.

या प्रमाणात मध्यम आकाराचे १५ वडे होतात

1 comment:

  1. This recipe has been posted by me on 09.07.2017 at 7:42 pm.

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...