Crispy Okra/ladies
fingers/bhendi: My magic
Recipe for – 3 people
Ingredients:
½ kg.
tender okra/ladies fingers/bhendi, 1 teaspoon each red chili powder and garam masala, ½ teaspoon
each dry mango powder, chaat masala and coriander-cumin seeds powder, ½ to ¾ cup
besan (chickpea flour), salt as per taste and oil for shallow frying.
Method:
wash and
clean the okra and dry it on a kitchen towel. Cut both ends of each okra and
give a vertical slit to it. If the okra is too long, then only cut it in 2-3 pieces,
otherwise keep as it is.
In a bowl, mix all
the dry spices with besan. Then take okra pieces in a plate and apply this dry
mixture nicely and rest this for at least half an hour.
okra kept for marination with dry spices |
Take oil in a pan
for shallow frying. When the oil heats, add okra pieces in it and sauté continuously
otherwise the okra pieces get burnt. Keep gas flame on medium. When the subjee
is done, serve it hot with rice-curry or
plain rotis. Note that after getting cool, it doesn’t taste that good. And
doesn’t remain that crispy.
crispy Okra/Ladies fingers ready to serve |
Note:
If we deep
fry Okra, it becomes soggy and oily after some time. Secondly, if we deep fry,
the oil gets messed up with the dry masalas and so,
the oil can’t be used easily. The shallow fried okra remains crispy than the
deep fried one. Do try.
Add caption |
क्रिस्पी भेंडी: माय मॅजिक
वाढणी: ३ व्यक्तींसाठी
साहित्य:
अर्धा किलो कोवळी भेंडी, १
टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून
आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२
टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.
कृती:
पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी
करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर
द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच
ठेवा.
एका ताटात हे सारे तुकडे ठेवून द्या. एका बाउल
मध्ये तिखट, मीठ, धने-जिरे पावडर, गरम मसाला,
आमचूर
पावडर, चाट मसाला, बेसन आणि मीठ हे सगळं नीट एकत्र करावं.
कोरडंच. हा मसाला चिरलेल्या भेंडीवर व्यवस्थित पसरावा आणि हलक्या हाताने
भेंडीमध्ये मिक्स करावा. हे मिश्रण अर्धा
तास तसेच मुरत ठेवून द्यावे.
मुरत ठेवलेली भेंडी |
नंतर एका पॅन मध्ये जरा जास्त तेल घ्यावे. आपण
भेंडी तळणार नाही. त्याची काही आवश्यकता नाही. तेल तापले की त्यात भेंडीचे तुकडे
घालून मंदाग्नीवर सावकाश परतावी. भाजी झाली की मात्र ती गरम गरमच भात-आमटी किंवा
पोळी-रस्सा भाजी याबरोबर वाढावी.
क्रिस्पी भेंडी |
टीपः
भेंडी तळली तर ती नंतर लगेच मऊ पडते.
शिवाय तेलात बेसन आणि इतर मसाले खाली बसतात. ते तेल नंतर वापरता येत नाही नीट.
त्यापेक्षा शॅलो फ्राय भेंडी जास्त वेळ कुरकुरीत रहाते, तेल खराब होत
नाही आणि भाजीही जास्त तेलकट होत नाही.
This recipe has been posted by me on 11.06.17 at 5.50 pm
ReplyDelete