Saturday 1 July 2017

Corn-potato-fenugreek pattice / मका - बटाटा- मेथी पॅटिस




Corn-potato-fenugreek pattice: My Magic

Recipe for 3 people

Ingredients

Half kg each of Potatoes and fresh corn. Fenugreek leaves- 3 bunch full,100 grams grated paneer (cottage cheese), 1 teaspoon cumin seeds, 2 green chilies finely chopped, 1 teaspoon ginger-garlic paste,  2 teaspoon red chili powder, 1/2 teaspoon coriander-cumin seeds powder, 1/2 teaspoon garam masala, salt as per taste, 2 slices of bread, 1 teaspoon corn flour, 2 bunch full of vermicelli (sevai) (take as per your taste) crushed, oil for deep frying.

Method:

Boil potatoes,mash them. Grind 2 bread slices from mixer and add to potatoes. fry the fenugreek (methi) leaves on one teaspoon oil and mix in potatoes. Add salt, red chili powder and coriander-cumin seeds powder and mix well. Keep aside.
Now grind the fresh corns coarsely. Heat 1 teaspoon oil and add cumin seeds, finely chopped chili, ginger garlic paste and corn paste. saute and cover the pan. Let it cook for 5 minutes. saute till the mixture dries properly. Let it be cool. Add grated paneer, garam masala, salt, chili powder and cumin-coriander powder and mix well.

pattice - 4 simple and 2 rolled over sevai before deep fry

 Heat oil in kadhai. Meanwhile take a lemon size ball of potato mixture and stuff the corn mixture in it. Seal it properly. Make a paste of cornflour. Deep this pattice in it and roll over on crushed sevai. Deep fry.Make all the pattice by this way.

I could make 15 pattice out of this. 

Serve this potato-corn-methi pattice hot with tomato sauce.
Enjoy..





मका - बटाटा- मेथी पॅटिस : माय मॅजिक

वाढणी- ३ व्यक्तींसाठी

साहित्यः 

प्रत्येकी अर्धा किलो बटाटे आणि मक्याचे  दाणे., मेथीची अर्धी जुडी, १०० ग्रॅम पनीर, १ टीस्पून जिरे२ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, २ ब्रेडच्या स्लाईस, १ टीस्पून कॉर्न फ्लोअर, अंदाजे २ मूठ शेवया बारीक चुरून. तळण्यासाठी तेल.

कृती

बटाटे उकडून घ्यावेत. २ ब्रेडच्या स्लाईसचा मिक्सरमधून चुरा करून घ्यावा. मक्याचे दाणे मिक्सरमधून भरडसर वाटावेत. मेथीची फक्त पाने घेउन स्वच्छ धुवून घ्यावीत.
एका पातेल्यात एक टीस्पून तेल तापवून मेथीची पाने २ मिनिटे परतून बाजूला काढावीत. त्याच पातेल्यात परत १ टीस्पून तेल घालून त्यात जिरे, बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट घालून वाटलेले मक्याचे दाणे घालावेत. झाकण ठेवून एक वाफ काढावी. मोकळे होईतो परतावे. चवीनुसार मीठ व तिखट घालावे. हे मिश्रण थंड झाले की त्यात पनीर किसून घालावे,धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून चांगले एकजीव करून घ्यावे.

पॅटिस  तळण्यापूर्वी  शेवईत घोळवून 

परतलेल्या मेथीमध्ये उकडलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ, किंचित धने-जिरे पावडर घालून चांगले मळून घ्यावे. एक टीस्पून कॉर्न फ्लोअर पाव वाटी पाण्यात एकजीव करून ठेवावे.


एका कढईत तेल तापत  ठेवा. आता मोठ्या लिंबाएवढा  बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याची पारी करावी व त्यात एक टीस्पून मक्याचे मिष्रण भरावे. सगळीकडून बण्द करून त्या पॅटिसला हवा तसा आकार द्यावा. हे पॅटिस कॉर्न फ्लोअर च्या मिश्रणात बुडवून शेवईच्या चुर्‍यात घोळवावे आणि तेलात खमंग तळून घ्यावे. 

या मापाने माझे सर्वसाधारण आकाराचे १५ पॅटिस झाले. 

टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खाण्यास द्यावे. 

1 comment:

  1. This recipe has been posted by me on 01.07.2017 at 10:50 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...