Saturday 23 December 2017

Chhole-Lachha Paratha/छोले- लच्छा पराठा




Chhole-Lachha Paratha- My Magic

Recipe for -4 people

Ingredients:

1.For Chhole- 200 grams Chhole (Chickpeas). 2 onions finely chopped, ½ teaspoon red chili powder, ½ teaspoon coriander-cumin seeds powder, 1 tablespoon chhole masala, salt as per taste, 2 tomatoes- finely chopped, ½ inch ginger piece, 1 green chili-slitted, ½ teaspoon aamchoor powder (Dry Mango powder), ½ teaspoon kasoori methi, oil as required.
2. for lachha paratha: whole wheat atta 350-400 grams (approx.. for 10 parathas), salt as per taste, oil/ghee (clarified butter)
Method: Soak Chhole in water overnight and boil nest day morning with some salt.
Heat oil in a pan and sauté 2 finely chopped onions in it till golden brown. Add , ½ teaspoon red chili powder, ½ teaspoon coriander-cumin seeds powder, 1 tablespoon chhole masala and sauté till the oil separates. Add finely chopped tomatoes.Add boiled chhole, grated ginger and one slit green chili.Adjust salt according to taste.Add aamchoor powder and kasoori methi. Chhole are ready.
Now knead the dough for paratha as usual we make for rotis. Keep it aside for one hour.
After one hour, take one small ball out of the dough and roll it to a full size roti. Apply oil/desi ghee, sprinkle some dry whole wheat atta and fold this roti like a paper fan we use to do in childhood. Now, make a ball of it and roll the paratha keeping the layers side above and roast it with oil/desi ghee.
Enjoy..




छोले- लच्छा पराठा- माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 

१. छोल्यांसाठी: २०० ग्रॅम छोले, २ कांदे, १/२ टीस्पून तिखट, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर, १ टेबलस्पून छोले मसाला, मीठ चवीनुसार, दोन टोमॅटो, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून कसूरी मेथी, तेल आवश्यकतेनुसार.

. लच्छा पराठ्या साठी: कणीक  -१० पोळ्यांसाठी लागेल एवढी (३५०-४००ग्रॅम्स) , चवीनुसार मीठ, तेल्/तूप

 कृती:

छोले रात्रभर भिजवून सकाळी  थोडेसे मीठ घालून कुकरमधून शिजवून घ्या.

एका कढईत पळीभर तेल तापवून त्यात बारीक चिरलेले २ कांदे परतून घ्या. मग १/२ टीस्पून  तिखट, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर, १ टेबलस्पून छोले मसाला घालून परतून घ्या. या मिश्रणाला तेल सुटलं की  त्यात २ टोमेटो बारीक चिरून घाला. वरून शिजवलेले छोले, १/२ इंच आल्याचा तुकडा किसून आणि एक हिरवी मिरची मध्ये चिरून घाला. आधी छोले शिजताना टाकलेलं मीठ लक्षात घेऊन चवीप्रमाणे मीठ आणि किंचित आमचूर पावडर घाला. थोडी कसूरी मेथी घाला. छोले तय्यार.

लच्छा पराठ्यासाठी नेहमीसारखीच कणिक मळून घ्या आणि तासभर झाकून ठेवा. नंतर एक गोळा घेऊन त्याची पूर्ण पोळी लाटा. त्यावर तूप लावून (तेलही चालत) थोडं गव्हाच पीठ त्यावर भुरभुरा आणि त्या पोळीच्या आपण लहानपणी कागदाचा पंखा करायचो तशा उलटसुलट घड्या घाला. आता त्याची एक वळकटी तयार होईल. ती गोल गुंडाळून तिचे चिरोट्या सारखे पदर वरती येतील अशी ठेवून हलक्या हाताने लाटा आणि तूप सोडून पराठा भाजा..


गरम गरम छोले-लच्छा पराठ्याचा आस्वाद घ्या

2 comments:

  1. This recipe has been posted by me on 23.12.17 @10 am

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...