Coin podi idli/ Coin Masala idli- My Magic
Ingredients:
Mini idlis or regular idlis cut in 4 pieces each, 2 big
onions finely sliced vertically, curry leaves- a bunch full, butter, salt as
per taste and milaga-podi/gunpowder as per taste.
Mini coin idli |
Method:
heat 1 tablespoon
butter in a pan. Add sliced onion and fry till golden brown. Add curry leaves,
coin idlis/idli pieces and salt as per
taste. A delicious, yummy breakfast is ready within minutes.
Serve hot.
Note: Gunpowder/Milaga podi is a dry powdered variety
of chutney in South India. We can make it and store it like our regular dry
chutneys. I have made it by following the under mentioned method:
Ingredients:
20-25 dry red chilies, 1/4 cup black peppercorns, half
cup each black split gram, bengal gram split, rice, salt as per taste, plenty
curry leaves, and 1 teaspoon asafoetida.
Method:
Dry Roast all the ingredients except salt on slow
flame. each ingredient should be nicely roasted but not burnt. Roast in this
order- chilies, peppercorns, black gram, bengal gram, rice, curry leaves and
after switching the gas off, add asafoetida. When this mixture cools down,
grind coarsely and add salt. Gunpowder/ Milaga podi is ready. This chutney can
be served with vada, dosa, idy or can be taken with plain rice and oil. tastes
delicious.
I have made the above recipe by using this method of
gunpowder. The gunpowder can be made by adding garlic and sesame seeds also.
But then, you can't store this chutney longer.
कॉईन पोडी इडली/कॉईन मसाला इडली:- माय मॅजिक
साहित्यः
मिनि इडल्या किंवा नेहमीच्या इडल्यांचे
प्रत्येकी ४ याप्रमाणे तुकडे करून घेतलेले.(साधारण १६ इडल्या) २ मोठे कांदे,
कढीपत्ता मूठभर, बटर, मीठ आणि गनपावडर
(मिळगा-पोडी) ही चटणी चवीनुसार.
मिनी/ कॉईन इडली |
कृती:
२ कांद्यांचे उभे पातळ काप करून घेतले.
एका पॅन मध्ये १ टेबलस्पून बटर तापत ठेवले.
त्यात हे कांद्याचे काप परतून त्यात कढीपत्त्याची पाने घालून त्यात या कॉइन इडल्या
घातल्या. चवीनुसार मीठ घातले. नाश्त्यासाठी एक स्वादिष्ट प्रकार तयार आहे. गरम गरम
खायला द्या.
गनपावडर
(मिळगा-पोडी) ही एक दाक्षिणात्य झणझणीत चटणी आहे. आपल्या पूड चटणी
प्रकारासारखी. ही आधी करून बरणीत भरून ठेवता येते. मी ही चटणी याप्रकारे केली:
साहित्य:
लाल सुक्या मिरच्या २०-२५, पाव
वाटी मिरे, प्रत्येकी अर्धा वाटी उडीद डाळ,
चणा डाळ, तांदूळ, चवीनुसार
मीठ, १ टीस्पून हिंग, भरपूर
कढीपत्त्याची पाने.
कृती:
वरील सर्व साहित्य एका पॅन मध्ये मंदाग्नीवर
कोरडेच भाजून घ्यायचे आहे. पहिल्यांदा मिरच्या, मग
मिरे, चणाडाळ, उडीद डाळ,
तांदूळ, कढीपत्त्याची पाने आणि शेवटी गॅस बंद
करून हिंग घाला. हे मिश्रण पूर्ण थंड झाले
की मिक्सर मधून रवाळ वाटून घ्या. अगदी बारीक नाही करायची. मग त्यात मीठ घाला. झाली
ही गनपावडर तयार. ही वडा, चटणी. डोसा अशा पदार्थांबरोबर खाता
येते. भातावर तेल आणि ही चटणी घालूनही छान लागते. खूप तिखट असते म्हणून ही
गनपावडर. ही चटणी वापरून मी वरील पाककृती केली आहे. य चटणीमध्ये लसूण आणि तीळही
काही जण घालतात. पण मग ती चटणी फार टिकत नाही.
This recipe has been posted by me on 25.06.2017 @ 9:30 p.m.
ReplyDelete