Jackfruit subjee - My magic
Measurement: 3-4 people
Ingredients:
1 medium sized raw jackfruit, (I took the one
which measured almost 750gms), fresh grated coconut-1/2 cup, finely chopped
coriander 1/2 cup, red chili powder 1 teaspoon, field beans - 1/4 cup (soaked
for 8 hrs, skin removed and cleaned), jaggary 1 tablespoon, salt as per taste,
for tempering - -oil, mustard seeds, asafoetida, turmeric powder, 4-5 red dry
chilies.
Method:
cut the jackfruit in big cubes with skin and pressure cook for 2 whistles (so that it
becomes easier to clean the jackfruit).After cooker gets cooled down, clean the
jackfruit by removing the skin and cut it in small pieces. remove the skin of
the seeds and cut the seeds in two pieces.
Now heat 3 tablespoon oil in a pan and add mustard seeds,
asafoetida, turmeric powder. Add soaked field beans and cover the pan for a
minute. Now add the cleaned jackfruit with seeds, red chili powder, salt,
jaggary, half of the grated coconut and half of coriander leaves. Now cook the
vegetable on slow flame for 5 minutes.
Now again in a small pan, heat 2 tablespoon oil and make the
tempering of mustard seeds, asafoetida, turmeric powder, 4-5 red dry chilies
and add on top of the vegetable. Garnish with left coconut and coriander leaves
and serve it with rice bhakri/jowar bhakri.
Note: This subjee requires much more oil and tempering than
the other subjees/vegetables. Then only it tastes very nice. This subjee has a
nice aroma of asafoetida. So use more than usual. I used 1 teaspoonful of
asafoetida randomly.
The more you use grated fresh coconut and coriander leaves
and tempering, it tastes nice. Just Yummy.
This style is from Konkan region of Maharashtra. You can use
horsegram/soaked groundnuts also insteas of these field beans.
फणसाची भाजी - माय मॅजिक
वाढणी: ३-४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१ भाजीचा फणस (मी घेतलेला पाउण किलो
होता), ओला नारळ खोवून अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, तिखट
१ टीस्पून, भिजवून सोललेले वाल - १/४ वाटी, गूळ
- १ टेबलस्पून, मीठ चवीनुसार. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या ४-५.
कृती:
भाजीचा फणस चिरून त्याचे मोठे तुकडे केले
आणि कुकरला २ शिट्ट्या होईतो वाफवले. (त्यामुळे फणस साफ करायला सोपा जातो.) थंड
झाल्यावर फणस नीट साफ करून, साली काढून, त्यातल्या
आठळांवर जो पापुद्रा असतो तो काढून टाकून त्यांचे दोन दोन तुकडे करून घेतले.
पातेल्यात नेहमीपेक्षा जास्त तेलाची म्हणजे जवळपास
३ टेबलस्पून तेलाची फोडणी केली. हिंगावर जरा जास्तच सढळ हात ठेवला.:) त्यात वाल
घालून एक वाफ आणली. मग त्यात सोललेला फणस, आठळांचे तुकडे घातले. तिखट, मीठ,
गूळ
घातले.थोडे ओले खोबरे आणि कोथिंबीर घातली. ५ मिनिटे भाजी शिजू दिली. नंतर एका
कढल्यात परत दोन टेबलस्पून तेलाची जास्त हिंगाची चरचरीत फोडणी केली. त्यात सुक्या
मिरच्याही घातल्या. आणि वरून ही फोडणी भाजीवर घातली. खोबरे आणि कोथिंबीर घालून
तांदळाच्या भाकरीबरोबर वाढली.
सूचना: मी ही भाजी कोकणात आमच्याकडे करतात त्या
पद्धतीची दिली आहे.
या भाजीला एकूणच खोबरे, कोथिंबीर आणि
चरचरीत तेलाची फोडणी हे जास्त लागतं. हिंगाचा ह्या भाजीला एक सुरेख स्वाद येतो.
वालाऐवजी तुम्ही या भाजीत हरभरे, काळे
वाटाणे किंवा भिजवलेले शेंगदाणेही घालू शकता.