Satori: My Magic
This is one of the best festive sweets in India.
Ingredients:
1.
For stuffing: ¼ kg. Khoya (Milk Solids), 1 small bowl
fine semolina, ¼ kg or less powdered sugar, 1 teaspoon powdered cardamom, 1-2
teaspoon milk if required.
2.
For cover of satori: take fine semolina and maida/ All
purpose flour in equal proportions to 3 small bowls, 3 teaspoon clarified
butter/Desi ghee, salt as per taste, water for kneading dough.
3.
Clarified butter/desi ghee for frying satori.
Method:
Dry Roast Khoya on slow flame . Heat
one teaspoon of desi ghee and roast fine semolina on slow flame. Mix roasted
khoya, semolina, powdered sugar, cardamom powder and if the stuffing is dry,
add 1-2 teaspoon of milk to knead a soft dough.
For cover, add refind/all purpose flour/maida and fine semolina. Add a
pinchful of salt. Heat 3 teaspoon desi ghee and add in this. Mix well . Add
water as per requirement to knead a semi soft dough. Cover it and set aside for
half an hour.
After half an hour, make lemon sized balls of stuffing and dough. Prepare a
small puri by stuffing the khoya mix in dough.
Roast the puri on slow flame. Then add some desi ghee and roast both sides.
You can deep fry the satories also.
An awesome treat is ready.
साटोरी: माय मॅजिक
हा एक अतिशय स्वादिष्ट, खमंग असा पक्वान्नाचा प्रकार आहे.
साहित्यः
१. सारणासाठी:पाव
किलो खवा, एक वाटी बारीक रवा,
पाव किलो पेक्षा थोडी कमी पिठी साखर, वेलची पूड १ टीस्पून, लागलं तर 1-2
टीस्पून दूध.
२. साटोरीच्या आवरणासाठी: बारीक रवा आणि मैदा समप्रमाणात एकूण तीन वाट्या, ३ टीस्पून साजुक तूप, चवीनुसार मीठ, पीठ मळण्याकरता पाणी.
३. साटोरी भाजण्यासाठी - साजूक तूप.
कृती:
खवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप गरम करुन त्यात बारीक रवा ही खमंग भाजून घ्या. हे दोन्ही एकत्र करुन त्यात पिठी साखर आणि वेलची पूड नीट मिसळून सारण तयार करा.नीट गोळा होत नसेल तर 1-2 टीस्पून दूध घाला.
आवरणासाठी: रवा, मैदा एकत्र करुन त्यात थोडंसं मीठ घाला. ३ टीस्पून तूप कडकडीत गरम करुन यात घाला. नीट मिक्स करुन त्यात जरुरीनुसार पाणी घालून मिश्रणाचा घट्ट गोळा करुन अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासाने पीठ आणि सारण दोन्हीचेही लिंबाएवढे गोळे करावेत. पिठाची पारी करुन त्यात सारणाचा गोळा ठेवून तो गोळा छोट्या पुरीएवढा लाटून घ्या. लाटताना पीठ घ्यायला लागू नये.
तवा गरम करावा आणि त्यावर या पुर्या अगदी मंद आचेवर आधी जराशा शेकाव्या आणि मग तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजाव्या.
काही लोक तुपात तळतातही, पण मी या फक्त तूप सोडून भाजल्या आहेत.
एक सुंदर पदार्थ
तयार आहे.
This recipe has been uploaded by me on 05.12.2020 at 7:37 p.m.
ReplyDelete