Gulachi Poli – My Magic
This is a
special menu in every Maharashtrian house on the day of Makar Sankranti.
Gulachi poli means a roti/chapatti stuffed with jaggery and sesame seeds which
are very useful for the winter season.
Ingredients:
1. For Poli - 4 cups maida/all purpose flour,2 cups whole
wheat flour, 1 pinch salt, 2 tablespoon oil and water as required.
2. 2. For stuffing: ½ kg jaggery,2 cups
roasted sesame seeds, 1.5 cups roasted peanuts, 2 tablespoon besan (chickpea flour),
2 tablespoon oil, fine powder of one nutmeg.
Method:
for
roti – mix maida, aata, salt together. Heat 2 tablespoon oil and add in this
mixture. Knead a firm dough by adding water as required. Keep covered.
Now finely
grate the jaggery, make a very fine powder of roasted sesame seeds and peanuts.
Now heat oil in a pan and roast besan on a slow flame till it gives you a nice
aroma. Now switch off the flame and add jaggery, sesame-peanut powder, nutmeg
powder and mix well. Let it cool. Then make a very fine powder of all this
mixture from mixer.
Take two small
balls like we take for making puri and add same sized ball of jaggery mixture
in between these two balls. Seal the edges properly and roll out to a thin
roti. Roast this on a medium flame. Place this roti on a paper. Make all the
rotis like this.
Serve with
a dollop of desi ghee/clarified butter.
Tip: the consistency
of dough and jaggery mixture should be same so that the mixture gets evenly
spread in roti.
गुळाची पोळी-माय मॅजिक
गुळाची पोळी हा मकर संक्रांतीला हमखास केला
जाणारा खास महाराष्ट्रियन पदार्थ आहे.
साहित्यः
१. पोळीसाठी: ४ वाट्या मैदा, २
वाट्या कणीक, चिमूटभर मीठ, २ टेबलस्पून तेल,
आवश्यकतेनुसार
पाणी.
२.सारणासाठी: १/२ किलो चांगला पिवळा गूळ,
२
वाट्या भाजलेले तीळ, १.५ वाटी भाजलेले शेंगदाणे, २
टेबलस्पून बेसन. २ टेबलस्पून तेल, १ किसलेले जायफळ
कृती:
पोळीसाठी मैदा, कणीक, मीठ
एकत्र करुन घ्या. त्यात २ टेबलस्पून तेल चांगले कडकडीत तापवून मोहन घाला.
आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट कणीक मळून गोळा झाकून ठेवा.
गूळ पातळ चिरून किंवा किसून घ्या. भाजलेले तीळ
आणि शेंगदाणे मिक्सरमधुन अगदी बारीक करून घ्या. त्याला चांगलं तेल सुटतं.
आता एका कढईत २ टेबलस्पून तेल तापवा आणि त्यात
बेसन छान खमंग भाजून घ्या.
गॅस बंद करून त्यात गूळ, तीळ-शेंगदाणा
कूट, जायफळ हे सारं मिक्स करा.
हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून सगळं एकजीव
करून घ्या.
२ पुरी ला घेतो तशा लाट्या घ्या. तेवढ्याच
आकाराची एक गुळाची गोळी त्यात ठेवून कडा व्यवस्थित बंद करून पातळ पोळी लाटा.
मध्यम आचेवर भाजा आणि पेपर वर सगळ्या पोळ्या
पसरुन ठेवा.
वाढताना साजूक तुपाचा गोळा पोळीवर जरूर घाला.
टीपः गूळ जितका घट्ट असेल तशीच कणीक असावी
म्हणजे पोळीत गूळ पसरला जातो एकसारखा.
This post has been published by me on 14.01.18 @ 8:15 pm
ReplyDelete