Sunday, 25 June 2017

Veg Cauliflower / फ्लॉवरची भाजी



Veg Cauliflower - My Magic

Recipe for 4 people

This is very simple, yet very delicious recipe.

Ingredients: 


1/2 kg. Cauliflower, 2 red tomatoes, fresh grated 1/2 coconut, 1 tablespoon cumin seeds, 5-6 fresh red chilies, (you can take as per your taste), salt as per taste, sugar 1 teaspoon, for tempering oil, mustard seeds and asafetida, finely chopped coriander leaves for garnishing.

Method: 

cut cauliflower in large florets. Blanch for 2 minutes. Run through cold water and keep aside. Blanch tomatoes and puree them. Make paste of grated coconut, chilies and cumin seeds.

Now heat oil in a pan. Add mustard seeds and asafetida. Add Cauliflower florets and give a steam. Now add coconut-chili-cumin seeds paste, add some water, salt, sugar. Add tomato puree. Again steam till the vegetable cooks well. Garnish with finely chopped coriander leaves. Serve this yummy dish with hot and soft rotis/fulkas.

Notes:

1. Don't add turmeric powder in this veg. Due to this, the colour of recipe looks attractive.
2. This recipe needs slightly more sugar than the other recipes. It tastes good.



फ्लॉवरची भाजी:माय मॅजिक

वाढणी: ४ व्यक्तींसाठी

एक अतिशय साधीसुधी आणि तरीही चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे.

साहित्यः 

अर्धा किलो फ्लॉवर, २ लालबुंद टोमॅटो, नारळाची अर्धी वाटी खोवून, १ टेबलस्पून जिरे, ५-६ ओल्या लाल मिरच्या (चवीनुसार कमी-जास्त करू शकता), चवीनुसार मीठ, साखर १ टीस्पून, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती

फ्लॉवर चे मोठे मोठे तुरे चिरून घ्या. मीठ घातलेल्या गरम पाण्यात २ मिनिटे हे तुरे उकळून गार पाण्यातून काढून घ्या. टोमॅटो ब्लांच करून घ्या. मिक्सर मधून खोवलेला नारळ, जिरे, मिरच्या यांची पेस्ट करून घ्या. टोमॅटोची साले काढून त्याची प्युरी करा.
एका पातेल्यात तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करा. हळद घालायची नाही. यात फ्लॉवरचे तुरे घालून एक वाफ आणा. त्यात खोबरे-जिरे-मिरचीची पेस्ट घाला. व्यवस्थित ढवळून थोडे पाणी घाला. मीठ साखर घाला. आता टोमॅटोची प्युरी घालून परत एक वाफ आणा. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून गरम गरम पोळ्यांबरोबर वाढा.

टीपा:

१.या भाजीत हळद घालायची नाही. त्यामुळे हिचा रंग वेगळा आणि आकर्षक दिसतो.
२. त्याचप्रमाणे या भाजीत थोडीशी जास्त साखर चांगली लागते.


1 comment:

  1. I have posted this recipe on 25.06.2017 at 2.30 p.m.

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...