Stuffed
Chillies
Recipe for 3-4 people
Ingredients:
10 bhavnagari chillies (long one), ½ cup each—besan, grated dry coconut,
groundnuts, 2 teaspoon goda masala, 1-1.5 teaspoon chilli powder (take
according to the taste of chillies), 1 teaspoon sugar, ½ teaspoon amchoor
powder, 1 teaspoon coriander-cummin powder, ½ teaspoon cumin seeds, ½ teaspoon
fennel seeds, salt according to taste. For tempering, -oil, turmeric, mustard
seeds, asafetida, 2 teaspoon oil for roasting besan.
Method:
roast grated dry coconut in a pan. Keep it aside. Take 2 teaspoon oil in the
same pan. When hot, add cumin seeds,
fennel seeds, groundnuts. When groundnuts get nicely roasted, add besan and roast
till you get a nice aroma. Turn off the gas and put all dry masala powders in
it. When this mixture becomes coll, grind it to a fine powder.
Wash
the chillies, dry it, give a vertical slit and stuff the masala in each chili.
Heat
oil in a wide bottomed pan and make tempering with mustard seeds, turmeric
powder and asafetida. Put all the chillies and cover the pan. Keep the gas on a
minimum. After 10 minutes, open it and flip the sides of the chillies. Cover it
again for 10 minutes.
Serve
it with a hot roti. Really awesome.
भरली मिरची:
वाढणी: ३-४ व्यक्तींसाठी
बाजारात मस्त भाजीच्या
मिरच्या मिळाल्या. मग काय, लगेच भरली मिरची केली सुद्धा.
साहित्य:
१० भाजीच्या
मिरच्या, प्रत्येकी १/२ वाटी बेसन, किसलेले खोबरे, शेंगदाणे, २ चमचे गोडा मसाला, १-१.५ चमचा तिखट (मिरचीचा
तिखट पणा पाहून मग घाला), चवीनुसार मीठ, १ चमचा साखर, १/२ चमचा आमचूर
पावडर, १/२ चमचा बडीशेप, १ चमचा धनेजीरे पावडर, १/२ चमचा जिरे. फोडणीसाठी तेल,
मोहरी,हिंग, हळद आणि २ चमचे तेल बेसन, शेंगदाणे भाजण्यासाठी.
कृती:
पहिल्यांदा मिरच्या
धुवून, कोरड्या करून त्यांची देठे काढून टाकली. प्रत्येक मिरचीला उभी चीर देऊन
आतल्या बिया आणि एक नाजूक दांडा असतो तो काढून टाकला.
एका कढइत सुकं किसलेलं
खोबरं घालून भाजून घेतलं आणि बाजूला काढलं. त्याच कढइत २ चमचे तेल घेऊन ते
तापल्यावर त्यात जिरे, बडीशेप घालून ते तडतडल्यावर त्यात शेंगदाणे घातले. ते तळले
गेल्यावर त्यात बेसन घालून खरपूस भाजलं. मग आच बंद करून त्यात सगळे मसाले घातले,
खोबरं मिक्स करून सगळं थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतलं.
आता हा मसाला मिरच्यांमध्ये
भरला. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात या मिरच्या अलगद ठेवून वर झाकण ठेवलं. मंद
आचेवर १० मिनिटे शिजल्यावर झाकण काढून मिरच्या बाजू पालटून परत ठेवल्या. १०
मिनिटांनी गॅस बंद केला.
गरमागरम
पोळीबरोबर ही खमंग भाजी छान लागते.
I have posted this recipe on 05.06.2017 @ 9:09 am
ReplyDelete