Meduvada-Sambar- My Magic
This is very famous south Indian
dish. Let’s see how I prepared it.
Recipe for 4 people
Measurement:
1. For vade: 2 cups split black gram washed and soaked for
2.5 to 3 hours, 10-12 black peppercorns, 8-10 curry leaves, 1.5 inch piece of
fresh coconut, 2 green chilies, salt as per taste.
2. For Sambar: ¾ cup pigeon peas (Arhar daal,
Toor dal), 1 each- a small onion, tomato, brinjal, potato, drumstick, 1.5
teaspoon sambar masala, a small lemon sized tamarind,1 teaspoon red chili
powder, 10-12 curry leaves, 5 dry red chilies, salt as per taste, for tempering-
oil, ¼ teaspoon fenugreek seeds, mustard
seeds, turmeric powder , asafetida, finely chopped coriander leaves.
3. For Chutney: ¼ cup each
roasted grams, fresh coconut, a bunchful of coriander. 2 teaspoon curd, ½ teaspoon
ginger garlic paste, salt and sugar as per taste.
4. For deep frying: Oil
Method:
1. Cut
onion, tomato, brinjal, potato and drum stick. Wash the arhar daal , add some asafetida
and turmeric powder in it. Add all the cut veggies and keep in cooker. Cook for
at least 2 whistles.
2. Grind
the soaked black gram with peppercorns with very little or no water. Cut green
chilies and coconut finely. Mix it in the batter. Add salt in the batter as per
taste.
3. Mix
all the ingredients given for chutney and grind it to a fine paste. Chutney is ready.
4. Heat
oil in a pot. Add teaspoon fenugreek
seeds, mustard seeds, turmeric powder , asafetida, curry leaves and dry red
chilies. Add cooked daal in it, add tamarind pulp, sambar masala,red chili
powder salt and water as required. Bring
to a boil Add chopped coriander. Sambar is ready.
5. Heat
oil in a kadhai and make vadas with wet hands. Keep a hole in it so that it
will get fried from inside also. Make all the vadas in this manner.
Serve vadas with hot sambar and
chutney. Enjoy.
मेदूवडा-सांबार : माय मॅजिक
ही एक दाक्षिणात्य आणि सर्वांची अतिशय आवडती अशी डिश आहे. तर पाहूया मी ही पाककृती कशी केली
ते..
वाढणी: ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
१.
मेदूवडे करण्यासाठी: २ वाट्या उडदाची डाळ २.५ ते
३ तास भिजवून, १०-१२ मिरी दाणे, ८-१० कढीपत्त्याची पाने, १.५ इंच ओल्या खोबर्याचा
तुकडा, २ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.
२.
सांबार करण्यासाठी : पाऊण वाटी तूर डाळ,
प्रत्येकी एक छोटा कांदा, टोमेटो, वांगे, बटाटा, १ शेवग्याची शेंग, १.५ टेबलस्पून सांबार
मसाला, छोट्या लिम्बाइतकी चिंच,१ टीस्पून तिखट, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ५ सुक्या लाल मिरच्या,
चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मेथीदाणे १/४ टीस्पून, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेली
कोथिंबीर.
३.
चटणी करता : पाव वाटी ओले खोबरे, पाव वाटी डाळे,
मूठभर कोथिंबीर, २ चमचे दही, १/२ टीस्पून आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, साखर.
४.
वडे तळण्यासाठी तेल.
कृती:
१.
कांदा, टोमेटो,वांगे, बटाटा, शेवग्याची शेंग, हे
सांर चिरून घ्या. तूरडाळ धुवून त्यात हळद आणि हिंग घाला. त्यात या सगळ्या
चिरलेल्या भाज्या घाला आणि कुकरला लावून २ शिट्ट्या करून छान मउ शिजवून घ्या.
२.
भिजवलेली उडदाची डाळ अगदी कमी पाणी घालून
मिक्सरमधून मिरीदाण्यांसह बारीक वाटून घ्या. मिरच्या बारीक चिरून घ्या. खोबर्याचेही
बारीक तुकडे करा. मिरच्या आणि हे तुकडे वाटलेल्या पिठात घाला. कढीपत्त्याची पाने,
हातानेच तोडून या पिठात घाला. मीठ घाला.
३.
चटणीसाठी दिलेले सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक
वाटून एकत्र करा. झाली चटणी.
४.
तेल, मेथीदाणे, मोहरी, हिंग, हळद, सुक्या
मिरच्या, कढीपत्त्याची पाने, यांची खमंग फोडणी करून त्यात ही भाज्यांसकट शिजलेली डाळ घाला. तिखट, सांबार
मसाला, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि ५ मिनिटे
उकळा. कोथिंबीर घाला. सांबार तयार.
५.
कढई मध्ये तेल तापत ठेवा. तापले की त्यात ओल्या
हाताने थोडे पीठ हातावर घेऊन त्यामध्ये एक भोक पाडून अलगद तेलात सोडा. दोन्ही
बाजूंनी खमंग तळा . या पद्धतीने सगळे वडे तळून घ्या.
वड्यांचा गरम गरम सांबार आणि चटणीबरोबर आस्वाद
घ्या.