Wednesday, 7 March 2018

Gulabjaam / गुलाबजाम




Gulabjaam – My Magic

I think the person who doesn’t love gulabjaam must be rare. In our home, we really don’t need any reason to eat Gulabjaam. But, today, I tried the gulabjaam by bringing the khoya (milk solids) and it turned out really very well. Do give it a try.

Ingredients:

 250 grams khoya (Mava as it is pronounced as it is a softer variety of regular khoya.)m 50 grams maida (all-purpose flour), 1 pinch baking soda, clarified butter for deep frying, 2 cups sugar, 1 cup water, 1 teaspoon green cardamom powder, few strands of saffron.

Method:

 knead mava very well about 10 minutes so as there are no lumps at all. Add maida slowly and knead it again. The measurement of maida will vary as it is dependent on how soft your mava is. I required only half of it, i.e. 25 grams. Add 1 pinch baking soda in it and knead a very soft dough. Make small balls or oval shaped gulabjaams as per your choice.

Now in a pan mix water and sugar together and make one string sugar syrup. Add cardamom powder and saffron in it and switch off the flame.
Now heat the clarified butter in one kadhai and deep fry all the gulabjaams and soak it in the sugar syrup for half an hour.
And then.. just take one gulabjaam and see.. how it melts in the mouth… heavenly.



गुलाबजाम - माय मॅजिक

गुलाबजाम आवडतच नाही अशी व्यक्ती विरळाच असेल नाही? आमच्या घरी तर सणवार काही नसताना सुद्धा लहर आली म्हणून गुलाबजाम चा बेत ठरतो. पण यावेळी पहिल्यांदाच खवा आणून त्याचे गुलाबजाम केले आणि ते छानच झाले.

साहित्यः

 २५० ग्रॅम गुलामजामचा मावा (हा नेहमीच्या खव्यापेक्षा मऊअसतो), ५० ग्रॅम मैदा, १ चिमूट खायचा सोडा, तळण्यासाठी साजूक तूप, २ वाट्या साखर, १ वाटी पाणी, १ टीस्पून वेलदोड्याची पावडर, थोडेसे केशर.

कृती:

 खवा खूप मळून त्यातल्या सगळ्या गुठळ्या छान मोडून घ्याव्यात. त्यात लागेल तसा हळूहळू मैदा घालत खवा मऊसर मळा. (मैद्याचे प्रमाण बर्‍याचदा माव्याच्या ओलसरपणावर अवलंबून असते असं आईकडून ऐकलं होतं. मला या प्रमाणातील जेमतेम अर्धा म्हणजे २५ ग्रॅम मैदा लागला. खवा मळतानाच त्यात चिमूटभर खायचा सोडाही घातला.
एकीकडे एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून पाक करण्यास ठेवा. एकतारी पाक होत आला की त्यात वेलदोडा पूड आणि केशर घालून गॅस बंद करा.

आता एका कढईत साजूक तूप तापत ठेवा. मळलेल्या खव्याचे गोल किंवा लांबट गोल आकाराचे गोळे करून तुपात मंदाग्नीवर तळून घ्या आणि लगेच पाकात सोडा. या प्रकारे सगळे गुलाबजाम करून घ्या.
हे गुलाबजाम मुरायला अर्धा तासही पुरतो.

आणि नंतर.. एक गुलाबजाम हळूच तोंडात सोडा आणि कसा अलगद विरघळतो ते पहा.. स्वर्गीय...



Friday, 2 March 2018

Thandai / थंडाई:




Thandai - My magic

Happy Holi!!

Its summer season now. Let's see the recipe of the popular summer drink - THANDAI!!


Ingredients: 

each 3 tablespoons of fennel seeds, melon seeds, poppy seeds, 3 bunch full of dried rose petals, 1 bunch full  each of almonds and cashews, 20 black peppercorns,  crystal sugar as required, 1.5 litre milk, water as required, for garnishing - few strands of saffron.

Method:

 soak all the ingredients except milk, saffron and crystal sugar overnight in enough water. Next day, peel the almonds and make a very  fine paste of all these ingredients along with the soaked water  through mixer. Strain this mixture 2-3 times from a muslin cloth. Add some milk if needed .
Now add crustal sugar and when it dissolves completely, keep thandai in fridge.
Serve with some saffron strands on top.
enjoy.



थंडाई: माय मॅजिक

सर्वप्रथम हुताशनी पौर्णिमेच्या  - होळीच्या अनेकानेक मंगल शुभेच्छा!

उन्हाळा चालू झालाय मंडळी.. आज धुलिवंदनाच्या निमित्ताने पाहू थंडाई या लोकप्रिय पेयाची पाककृती:

साहित्यः

 प्रत्येकी ३ टेबलस्पून बडीशेप, मगज बिया, खसखस, ३ मूठ भरून गुलाब पाकळ्या, प्रत्येकी एक मूठ बदाम आणि काजू, २० काळ्या मिरीचे दाणे, आवडीनुसार खडीसाखर, १.५ लिटर दूध, आवश्यकतेनुसार पाणी, सजावटीसाठी केशर.

पाककृती:

थंडाई करण्यापूर्वी खडीसाखर, दूध आणि केशर वगळ्ता सर्व साहित्य पाण्यात ८-१० तासांसाठी भिजवावे. थंडाई करण्यापूर्वी यातील बदामांची साले काढून टाकावीत आणि भिजवलेल्या पाण्यासकट हे सारं मिक्सरमधून अगदी बारीक गंधासारखं वाटून घ्यावं. हे वाटलेले मिश्रण एका मलमलच्या कापडातून थोडे दूध घालून गाळून घ्यावे.  २-३ वेळा असंच करावं, त्यामुळे सगळं सत्त्व निघूयेइइल्ल. नंतर या गाळलेल्या मिश्रणात खडीसाखर आणि दूध मिसळावे आणि खडीसाखर विरघळली की ही थंडाई फ्रीज मध्ये थंड करावी.

प्यायला देताना त्यात बदामाचे काप आणि  केशर घालून द्यावी.





Thursday, 8 February 2018

Rajma Masala / राजमा मसाला






Rajma Masala (kidney Beans) - My Magic

Rajma Masala is a very popular Punjabi cuisine. If you are taking it with rice, then you will not require any accompanies.

Recipe for - 4 people

Ingredients: 

1 cup rajma (kidney beans), 1 big onion, 3 tomatoes, 1 teaspoon cumin-coriandar seeds powder, 1.5 teaspoon red chilli powder, 1/2 teaspoon each -ginger garlic paste, garam masala, kasoori methi, turmeric powder, cumin seeds, 1 pinch asafoetida, salt as per taste, for tempering 1/2 tablespoon butter and 1/2 tablespoon oil. for garnishing, finely chopped coriander leaves.

Method: 

Soak Rajma overnight after proper washing in 4 cups of water. Cook till 4 whistles the next morning. The beans should be separate but tender. 
Cut onions and tomatoes finely. Heat oil and butter together in a pan. Add cumin seeds. When it splutters, add asafoetida and turmeric powder. . Add chopped Onion and saute till golden brown. Don’t overdo the onions otherwise the Rajma masala will taste bitter. Now add ginger garlic paste and saute till the raw smell goes off. Now add tomatoes and all spices one by one. Add red chili powder. Mix well and add the cooked Rajma in it. Add salt and kasoori methi. Serve after garnishing with chopped coriander. Serve this with paratha, naan or rice. It tastes heavenly.
 



राजमा मसाला- माय मॅजिक

ही एक अतिशय लोकप्रिय अशी पंजाबी पाककृती आहे. राजमा चावल म्हटलं की खरं तर तोंडी लावायला इतर काही घ्यायची जरूर ही नसते.

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 
१ कप राजमा, १ मोठा कांदा, ३ टोमॅटो, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १.५टीस्पून लाल तिखट, प्रत्येकी १/२ टीस्पून आलं लसूण पेस्ट,  गरम मसाला, कसूरी मेथी,  हळद, जिरे, एक चिमूट्भर हिंग, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी १/२टेबलस्पून बटर आणि १/२ टेबलस्पून तेल.सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती: 

रात्री राजमा २ वेळा धुवून ४ कप पाण्यात भिजत घाला. सकाळी याच पाण्यासकट कुकरमध्ये ४ शिट्ट्या होइतो मउ शिजवून घ्या. दाणे वेगळे पण व्यवस्थित शिजलेले हवे. कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबेर चिरून बाजूला ठेवा.

एका भांड्यात तेल आणि बटर एकत्र करून तापवा. त्यात जिरे घालून ते तडतडले की हिंग, आणि हळद घाला. बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. खूप परतलं तर राजमा कडू लागतो. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईतो परता. आता टोमॅटो घालून परता आणि सगळे मसाले, लाल तिखट घाला. हा मसाला व्यवस्थित ढवळून त्यात शिजलेला राजमा घाला. चवीनुसार मीठ आणि कसूरी मेथी घाला. वाढताना चिरलेली कोथिंबीर घालून द्या. पराठा, नान किवा भाताबरोबर हा राजमा मसाला खूप छान लागतो.



Saturday, 3 February 2018

Banarasi Nimona / बनारसी निमोना :



Banarasi Nimona - My Magic
Recipe For: 4-5 people
Ingredients:
1/2 kg green peas, 1 bay leaf, each two cloves, black pepper corns,green cordamoms,  1 green chili, 1/4 inch ginger piece, 1/4 teaspoon cumin seeds-coriander powder,  cumin seeds and asafoetida for tempering, clarified butter (desi ghee.) Don't use oil. It doesn't taste good, salt as per taste.
Method:
make course  paste of green peas, ginger, green chili  .
Now heat ghee(clarified butter) and add cumin seeds and asafoetida. Add bay leaf, pepper corns, green cordamoms and add the green peas paste. Saute for a minute. Add cumin seeds-coriander powder, water and salt as per taste. This vegetable is not too thick or thin. But its extremely taste. 
Serve hot only. Otherwise it won't taste that good.
Serve with puri or roti. 

बनारसी निमोना : माय मॅजिक
पाककृती: ४-५ व्यक्तींसाठी
साहित्यः-
 अर्धा  किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको), चवीपुरत मीठ.
कृती: 

अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही. पुरी किंवा पोळी, भात कशाबरोबरही वाढा.

Sunday, 28 January 2018

Pav Bhaaji / पावभाजी





Pav Bhaaji- My Magic

Pav bhaaji is a very famous street food from Maharashtra. Almost everybody loves it. So, let’s see how to make pav-bhaaji.

Recipe for – 5-6 people

Ingredients:

3 medium sized potatoes, 1 cup green peas (fresh or frozen), 2 green capsicums, 1 cup florets of cauliflower, 3 tomatoes, 2 onions, 2 teaspoon ginger-garlic paste, 2 tablespoon readymade pav-bhaaji masala, 1 teaspoon red chilli powder, salt as per taste, juice of one lemon/dry mango powder, finely chopped coriander, 1 tablespoon each butter and oil.

Optional - Cheese

Method:

Finely chop capsicums. Remove the peels of potatoes and cut it. Now mix florets, green peas, capsicum and potatoes, add some water and pressure cook these vegetables till 2 whistles.

Finely chop onions and tomatoes.

In a pan heat oil and butter together so that the butter doesn’t get burnt. Saute onion till translucent. Add pav-bhaaji masala, red chilli powder and sauté till you get a nice aroma. Add chopped tomatoes and sauté again till the tomatoes get mashed up. Now add all the cooked veggies and mash them together with the help of masher. Add water according to the requirement. Add salt and dry mango powder and mix well. The bhaaji is ready.
Serve this hot with a dollop of butter and finely chopped coriander and of course with butter roasted pav and finely chopped onions mixed with lemon juice and salt.

If you want a cheesy pav-bhaaji, add grated cheese on top of it. 

Cheese pav-bhaaji


Enjoy ..



पावभाजी- माय मॅजिक
पावभाजी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. स्ट्रीट फूड मध्ये या पावभाजीचा नंबर अगदी पहिला लागतो. जवळपास सगळ्या लहानमोठ्यांना आवडणार्‍या पदार्थाची पाककृती पाहू:

पाककृती: ५-६ व्यक्तींसाठी

साहित्यः 

बटाटे-मध्यम आकाराचे ३, १ कप मटारचे दाणे, २ ढोबळ्या मिरच्या/सिमला मिरच्या, १ कप फ्लॉवर चे तुरे, ३ मोठे टोमॅटो, २ कांदे, २ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ टेबलस्पून तयार पावभाजी मसाला, १ टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ टेबलस्पून बटर आणि तेल .

ऐच्छिक: चीज 

कृती: 

सिमला मिरची खूप बारीक चिरुन घ्या. बटाट्याची साले काढून तेही चिरुन घ्या. फ्लॉवर चे तुरे, सिमला मिरची, मटार आणि बटाट्याचे तुकडे एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून  कुकरमध्ये २ शिट्ट्या होईतो उकडून घ्या.

कांदे आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्या.

आता एका पातेल्यात १ टेबलस्पून बटर आणि १ टेबलस्पून तेल गरम करा म्हणजे बटर जळत नाही. त्यात चिरलेला कांदा घालून परता. नंतर त्यात पावभाजी मसाला, तिखट घालून खमंग वास येईतो परता. आता त्यात चिरलेले टोमॅटो घालून खूप परता. शिजवलेल्या सगळ्या भाज्या यात घाला. मॅशरने सगळ्या भाज्या अगदी एकजीव होईतो घोटा. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घाला.आवश्यकतेनुसार पाणी घाला. चांगली एकजीव झाली की झाली भाजी. खावयास देताना वरती बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बटर वर भाजलेल्या पावासोबत द्यावी. बरोबर बारीक चिरलेला कांदा - मीठ व लिंबाचा रस घालून द्यावा.

जर चीज हवे असेल तर चीज वरून किसून  घालावे.
चीज पाव-भाजी



Saturday, 27 January 2018

Kachcha Chivda/ कच्चा चिवडा




Kachcha Chivda- My Magic:

Kachcha Chivda is a very famous Maharashtrian snack item. It requires hardly 10 minutes to prepare and doesn’t have any specific measurement as such. You can adjust all the ingredients as per your choice.

Recipe for 4-5 people

Ingredients: 

200 grams puffed rice, 200 grams thin beaten rice, 1 cup finely chopped spring onion. ½ cup finely chopped coriander, 2 teaspoon red chilli powder, 2 green chillies finely chopped,  2 teaspoon Maharashtrian Goda Masala, 1 tablespoon oil, farsan, thin nylon shev as per your liking and salt as per taste.

Method:

 Take oil in a pan, add chilli powder, goda masala and salt in it. Mix properly. Now add chopped spring onions and chillies  in it and crush it a little. Now add puffed rice and beaten rice. Mix properly. Serve with shev, farsan and chopped coriander.

Tip: 

Prepare this item 10 minutes before serving. Or else there will be no crunchiness as the rice puffs and beaten rice becomes numb.




कच्चा चिवडा- माय मॅजिक

कच्चा चिवडा हा प्रकार महाराष्ट्रात अगदी लोकप्रिय असा प्रकार आहे. झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा.

पाककृती - ४ -५ व्यक्तींसाठी

साहित्यः

 २०० ग्रॅम चुरमुरे, १०० ग्रॅम पातळ पोहे, १ कप कांद्याची पात - कांद्यासह बारीक चिरून, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून लाल तिखट, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, नायलॉन शेव, फरसाण आवडीप्रमाणे, १ टेबलस्पून गोडेतेल, २ टीस्पून गोडा मसाला, चवीनुसार मीठ.

कृती: 

पातेल्यात तेल घेउन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला चांगला मिसळून घ्यावा. त्यात आधी कांद्याची पात चांगली चुरुन घेउन त्यात मिरची, पोहे आणि चुरमुरे मिक्स करावे. खायला देताना त्यावर फरसाण,बारीक शेव आणि कोथिंबीर घालून द्यावे.

टीपः 

हा पदार्थ आयत्या वेळी करून लगेच खायला घ्यावा. नाहीतर पोहे आणि चुरमुरे नरम पडून त्यातला कुरकुरीत पणा जातो आणि खायला मजा येत नाही.



Thursday, 18 January 2018

Cutlet / कटलेट



Cutlet- My Magic

Recipe for 4 people

Recipe:

 2 cups grated carrots, 1 cup finely chopped French beans, ½ cup green peas, 2 big potatoes, ginger garlic paste – 2 teaspoon, paste of 5-6 green chilies, ½ teaspoon citric acid, salt as per taste, 4 slices of bread, oil for shallow frying cutlets.

Method: 

Steam the carrots, beans and green peas. Boil the potatoes. Make bread crumbs of bread from mixer. Mash the potatoes, add all the steamed veggies, ginger-garlic-chili paste, citric acid, salt and add ½ of breadcrumbs and mix evenly. Now make small flat balls of this mixture, dip in the remaining bread crumbs. 

Heat oil in a pan and shallow fry all the cutlets.

Serve hot with mint chutney, tomato ketchup.



कटलेट-माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 

२ वाट्या किसलेले गाजर, १ वाटी बारीक चिरलेली फरसबी,  अर्धी वाटी वाटी, २ मोठे बटाटे, आलं-लसूण पेस्ट- १ टीस्पून, ५-६ हिरव्या मिरच्यांची पेस्ट,  सायट्रिक अ‍ॅसिड १/४ टीस्पून, चवीनुसार मीठ, ब्रेड्च्या ४ स्लाईस, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.

कृती:

 गाजर, फरसबी, मटार यात अजिबात पाणी न घालता वाफवून घ्या. बटाटे उकडून घ्या. ब्रेड्च्या स्लाईस मिक्सर मधून फिरवून घ्या.
आता बटाटे मॅश करुन घ्या. त्यात या वाफवलेल्या भाज्या, आलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट, सायट्रिक अ‍ॅसिड, मीठ आणि हे सगळं मिश्रण हाताने नीट आकार देता येइल इतपत ब्रेडचा चुरा घालून चांगले मिक्स करावे. आता छोटे छोटे चपटे गोळे करून उरलेल्या ब्रेडच्या चुर्‍यात घोळवावे.

एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापत ठेवावे. आणि तेल तापले की सावकाश ही सारी कटलेट्स शॅलो फ्राय करावीत.
टोमॅटो सॉस, पुदिना चटणीबरोबर गरमागरम वाढावीत.


Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...