Wednesday 3 January 2018

Soya Chunks Biryani/सोया चंक्स बिर्याणी




Soya Chunks Biryani- My Magic

Recipe for : 4 people

Ingredients:

1 cup basmati  rice, 100 grams small soya chunks, 1 bulb garlic, 2 inch piece of ginger, 1 teaspoon cumin seeds, 2 onions- out of which 1 finely chopped and one sliced thinly and deep fried, 1 big potato sliced, 4 green chilies, 2.5 teaspoon biryani masala, 2 teaspoon curd, 1 teaspoon red chili powder, ½ teaspoon turmeric powder, 2 bay leaves, 1 star anise, 2 green cardamoms, 3-4 black peppercorns, 1 inch cinnamon stick, 2 teaspoon milk and few strands of saffron mixed together, salt as per taste, 2 tablespoon oil, water as required, fresh coriander leaves finely chopped.

 Method:

Wash and rinse rice, soak for ½ an hour and then drain it and keep aside.
Wash Soya chunks and soak them in hot water for 15-20 minutes. Then press them in your palms and take out the excess water from the chunks and keep them in one bowl. Make a fine paste of Ginger, garlic, chilies and cumin seeds. Add this paste, red chili powder, salt, curd, biryani masala and 1 teaspoon oil in the soya chunks. Mix well so that this masala neatly covers all the soya chunks. Marinate this for nearly 2 hours.
Take 5 cups water in a pan and add a little salt and 1 bay leaf in it. When the water starts little boiling, add rice. Let it half done in 5 minutes. Don’t overcook. Drain the excess water from rice.

Now, heat oil in a pan. Add 1 bay leaf, star anise, cardamoms, peppercorns, cinnamon stick and one finely chopped onion. Let it be golden brown. Add turmeric powder and the marinated soya chunks. Fry for 5 minutes.

Take another pot and add 1 teaspoon oil at the bottom. Spread round slices of potato on it (So that the biryani doesn’t stick at the bottom of the vessel and the potato slices become so crispy that you enjoy it) add one layer of soya chunks on it and rice layer on the layer of chunks. Repeat it. The final layer should be of rice. Sprinkle the saffron mixed milk on it and cover the pan. Let the biryani cook on slow flame for 10 minutes.
Serve this after garnishing with fried onion and chopped coriander leaves.
This biryani tastes nice with curd or any gravy. Enjoy….. 



सोया चंक्स बिर्याणी - माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 

१ वाटी बासमती तांदूळ,१०० ग्रॅम्स छोटे सोया चंक्स, १ लसणीचा गड्डा, २ इंच आल्याचा तुकडा, १ टीस्पून जिरे, २ कांदे- पैकी १ बारीक चिरून आणि एक लांब पातळ चिरून आणि तळून१ मोठा बटाटा गोल काप करून, ४ मध्यम तिखट हिरव्या मिरच्या, २.५ टीस्पून बिर्याणी मसाला,२ टीस्पून दही१ टीस्पून लाल तिखट,१/२ टीस्पून हळद२ तमालपत्रे, १  चक्रीफूल, २ वेलदोडे, ३-४ मिरे, १ बोट्भर लांबीची दालचिनी, २ चमचे दूध आणि थोडेसे केशर एकत्र करून,   चवीनुसार मीठ,२ टेबलस्पून तेल,आवश्यकतेनुसार पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीकरिता

कृती:

तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर तास उपसून ठेवा.
सोया चंक्स धुवून गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर ते पिळून एका भांड्यात काढा. लसूण, आलं, मिरच्या, जिरे यांची मिक्सरवर पेस्ट करून घ्या. ही पेस्ट, तिखट, मीठ, दही, बिर्याणी मसाला आणि १ टीस्पून तेल या सोया चंक्स मध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या. मसाला सगळ्या चंक्सना नीट लागला पाहिजे. हे मिश्रण २ तास चांगले मुरायला ठेवा.

नंतर एका पातेल्यात ५ कप पाणी किंचित मीठ घालून गरम करत ठेवा. त्यात १ तमालपत्र घाला. पाण्याला थोडीशी उकळी आली की त्यात  उपसून ठेवलेले तांदूळ घाला आणि त्याचा अर्धव शिजेल असा भात तयार झाला की एका चाळणीवर ओतून जास्तीचे पाणी काढून टाका.

एका पातेल्यात थोडेसे तेल गरम करा.त्यात १ तमाल पत्र, चक्रीफूल, वेलदोडे, मिरे दालचिनी आणि  बारीक चिरलेला एक कांदा घाला. तो छान  परतला की त्यात हळद घालून हे मुरवलेले सोया चंक्स घाला. ५ मिनिटे चांगले परतून घ्या.

आता एका भांड्यात तळाला थोडेसे तेल घाला. बटाट्याचे गोल काप करून तळाशी घाला.(म्हणजे बिर्याणी तळाला लागत नाही आणि खरपूस झालेले बटाट्याचे काप खायला खूप छान लागतात) त्यावर सोया चंक्स चा एक थर आणि भाताचा एक थर असे थर घाला.सर्वात वर भाताचा थर येउदे. वरती केशर मिश्रित  दूध घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे ही बिर्याणी शिजू द्या.

वाढ्ताना बिर्याणीवर तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या.


ही बिर्याणी नुसत्या दह्याबरोबर किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर छान लागते.

1 comment:

  1. This recipe has been posted by me on 03.01.18 at 10 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...