Sunday, 28 January 2018

Pav Bhaaji / पावभाजी





Pav Bhaaji- My Magic

Pav bhaaji is a very famous street food from Maharashtra. Almost everybody loves it. So, let’s see how to make pav-bhaaji.

Recipe for – 5-6 people

Ingredients:

3 medium sized potatoes, 1 cup green peas (fresh or frozen), 2 green capsicums, 1 cup florets of cauliflower, 3 tomatoes, 2 onions, 2 teaspoon ginger-garlic paste, 2 tablespoon readymade pav-bhaaji masala, 1 teaspoon red chilli powder, salt as per taste, juice of one lemon/dry mango powder, finely chopped coriander, 1 tablespoon each butter and oil.

Optional - Cheese

Method:

Finely chop capsicums. Remove the peels of potatoes and cut it. Now mix florets, green peas, capsicum and potatoes, add some water and pressure cook these vegetables till 2 whistles.

Finely chop onions and tomatoes.

In a pan heat oil and butter together so that the butter doesn’t get burnt. Saute onion till translucent. Add pav-bhaaji masala, red chilli powder and sauté till you get a nice aroma. Add chopped tomatoes and sauté again till the tomatoes get mashed up. Now add all the cooked veggies and mash them together with the help of masher. Add water according to the requirement. Add salt and dry mango powder and mix well. The bhaaji is ready.
Serve this hot with a dollop of butter and finely chopped coriander and of course with butter roasted pav and finely chopped onions mixed with lemon juice and salt.

If you want a cheesy pav-bhaaji, add grated cheese on top of it. 

Cheese pav-bhaaji


Enjoy ..



पावभाजी- माय मॅजिक
पावभाजी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. स्ट्रीट फूड मध्ये या पावभाजीचा नंबर अगदी पहिला लागतो. जवळपास सगळ्या लहानमोठ्यांना आवडणार्‍या पदार्थाची पाककृती पाहू:

पाककृती: ५-६ व्यक्तींसाठी

साहित्यः 

बटाटे-मध्यम आकाराचे ३, १ कप मटारचे दाणे, २ ढोबळ्या मिरच्या/सिमला मिरच्या, १ कप फ्लॉवर चे तुरे, ३ मोठे टोमॅटो, २ कांदे, २ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ टेबलस्पून तयार पावभाजी मसाला, १ टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ टेबलस्पून बटर आणि तेल .

ऐच्छिक: चीज 

कृती: 

सिमला मिरची खूप बारीक चिरुन घ्या. बटाट्याची साले काढून तेही चिरुन घ्या. फ्लॉवर चे तुरे, सिमला मिरची, मटार आणि बटाट्याचे तुकडे एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून  कुकरमध्ये २ शिट्ट्या होईतो उकडून घ्या.

कांदे आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्या.

आता एका पातेल्यात १ टेबलस्पून बटर आणि १ टेबलस्पून तेल गरम करा म्हणजे बटर जळत नाही. त्यात चिरलेला कांदा घालून परता. नंतर त्यात पावभाजी मसाला, तिखट घालून खमंग वास येईतो परता. आता त्यात चिरलेले टोमॅटो घालून खूप परता. शिजवलेल्या सगळ्या भाज्या यात घाला. मॅशरने सगळ्या भाज्या अगदी एकजीव होईतो घोटा. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घाला.आवश्यकतेनुसार पाणी घाला. चांगली एकजीव झाली की झाली भाजी. खावयास देताना वरती बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बटर वर भाजलेल्या पावासोबत द्यावी. बरोबर बारीक चिरलेला कांदा - मीठ व लिंबाचा रस घालून द्यावा.

जर चीज हवे असेल तर चीज वरून किसून  घालावे.
चीज पाव-भाजी



Saturday, 27 January 2018

Kachcha Chivda/ कच्चा चिवडा




Kachcha Chivda- My Magic:

Kachcha Chivda is a very famous Maharashtrian snack item. It requires hardly 10 minutes to prepare and doesn’t have any specific measurement as such. You can adjust all the ingredients as per your choice.

Recipe for 4-5 people

Ingredients: 

200 grams puffed rice, 200 grams thin beaten rice, 1 cup finely chopped spring onion. ½ cup finely chopped coriander, 2 teaspoon red chilli powder, 2 green chillies finely chopped,  2 teaspoon Maharashtrian Goda Masala, 1 tablespoon oil, farsan, thin nylon shev as per your liking and salt as per taste.

Method:

 Take oil in a pan, add chilli powder, goda masala and salt in it. Mix properly. Now add chopped spring onions and chillies  in it and crush it a little. Now add puffed rice and beaten rice. Mix properly. Serve with shev, farsan and chopped coriander.

Tip: 

Prepare this item 10 minutes before serving. Or else there will be no crunchiness as the rice puffs and beaten rice becomes numb.




कच्चा चिवडा- माय मॅजिक

कच्चा चिवडा हा प्रकार महाराष्ट्रात अगदी लोकप्रिय असा प्रकार आहे. झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा.

पाककृती - ४ -५ व्यक्तींसाठी

साहित्यः

 २०० ग्रॅम चुरमुरे, १०० ग्रॅम पातळ पोहे, १ कप कांद्याची पात - कांद्यासह बारीक चिरून, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून लाल तिखट, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, नायलॉन शेव, फरसाण आवडीप्रमाणे, १ टेबलस्पून गोडेतेल, २ टीस्पून गोडा मसाला, चवीनुसार मीठ.

कृती: 

पातेल्यात तेल घेउन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला चांगला मिसळून घ्यावा. त्यात आधी कांद्याची पात चांगली चुरुन घेउन त्यात मिरची, पोहे आणि चुरमुरे मिक्स करावे. खायला देताना त्यावर फरसाण,बारीक शेव आणि कोथिंबीर घालून द्यावे.

टीपः 

हा पदार्थ आयत्या वेळी करून लगेच खायला घ्यावा. नाहीतर पोहे आणि चुरमुरे नरम पडून त्यातला कुरकुरीत पणा जातो आणि खायला मजा येत नाही.



Thursday, 18 January 2018

Cutlet / कटलेट



Cutlet- My Magic

Recipe for 4 people

Recipe:

 2 cups grated carrots, 1 cup finely chopped French beans, ½ cup green peas, 2 big potatoes, ginger garlic paste – 2 teaspoon, paste of 5-6 green chilies, ½ teaspoon citric acid, salt as per taste, 4 slices of bread, oil for shallow frying cutlets.

Method: 

Steam the carrots, beans and green peas. Boil the potatoes. Make bread crumbs of bread from mixer. Mash the potatoes, add all the steamed veggies, ginger-garlic-chili paste, citric acid, salt and add ½ of breadcrumbs and mix evenly. Now make small flat balls of this mixture, dip in the remaining bread crumbs. 

Heat oil in a pan and shallow fry all the cutlets.

Serve hot with mint chutney, tomato ketchup.



कटलेट-माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 

२ वाट्या किसलेले गाजर, १ वाटी बारीक चिरलेली फरसबीअर्धी वाटी वाटी, २ मोठे बटाटे, आलं-लसूण पेस्ट- १ टीस्पून, ५-६ हिरव्या मिरच्यांची पेस्टसायट्रिक अ‍ॅसिड १/४ टीस्पून, चवीनुसार मीठ, ब्रेड्च्या ४ स्लाईस, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.

कृती:

 गाजर, फरसबी, मटार यात अजिबात पाणी न घालता वाफवून घ्या. बटाटे उकडून घ्या. ब्रेड्च्या स्लाईस मिक्सर मधून फिरवून घ्या.
आता बटाटे मॅश करुन घ्या. त्यात या वाफवलेल्या भाज्या, आलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट, सायट्रिक अ‍ॅसिड, मीठ आणि हे सगळं मिश्रण हाताने नीट आकार देता येइल इतपत ब्रेडचा चुरा घालून चांगले मिक्स करावे. आता छोटे छोटे चपटे गोळे करून उरलेल्या ब्रेडच्या चुर्‍यात घोळवावे.

एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापत ठेवावे. आणि तेल तापले की सावकाश ही सारी कटलेट्स शॅलो फ्राय करावीत.
टोमॅटो सॉस, पुदिना चटणीबरोबर गरमागरम वाढावीत.


Sunday, 14 January 2018

Gulachi Poli / गुळाची पोळी




Gulachi  Poli – My Magic

This is a special menu in every Maharashtrian house on the day of Makar Sankranti. Gulachi poli means a roti/chapatti stuffed with jaggery and sesame seeds which are very useful for the winter season.

Ingredients:

1.       For Poli -  4 cups maida/all purpose flour,2 cups whole wheat flour, 1 pinch salt, 2 tablespoon oil and water as required.

2.       2. For stuffing: ½ kg jaggery,2 cups roasted sesame seeds, 1.5 cups roasted peanuts, 2 tablespoon besan (chickpea flour), 2 tablespoon oil, fine powder of one nutmeg.

Method: 

for roti – mix maida, aata, salt together. Heat 2 tablespoon oil and add in this mixture. Knead a firm dough by adding water as required. Keep covered.
Now finely grate the jaggery, make a very fine powder of roasted sesame seeds and peanuts. Now heat oil in a pan and roast besan on a slow flame till it gives you a nice aroma. Now switch off the flame and add jaggery, sesame-peanut powder, nutmeg powder and mix well. Let it cool. Then make a very fine powder of all this mixture from mixer.

Take two small balls like we take for making puri and add same sized ball of jaggery mixture in between these two balls. Seal the edges properly and roll out to a thin roti. Roast this on a medium flame. Place this roti on a paper. Make all the rotis like this.
Serve with a dollop of desi ghee/clarified butter.

Tip: the consistency of dough and jaggery mixture should be same so that the mixture gets evenly spread in roti.



गुळाची पोळी-माय मॅजिक

गुळाची पोळी हा मकर संक्रांतीला हमखास केला जाणारा खास महाराष्ट्रियन पदार्थ आहे.

साहित्यः

१. पोळीसाठी: ४ वाट्या मैदा, २ वाट्या कणीक, चिमूटभर मीठ, २ टेबलस्पून तेल, आवश्यकतेनुसार पाणी.
२.सारणासाठी: १/२ किलो चांगला पिवळा गूळ, २ वाट्या भाजलेले तीळ, १.५ वाटी भाजलेले शेंगदाणे, २ टेबलस्पून बेसन. २ टेबलस्पून तेल, १ किसलेले जायफळ

कृती: 

पोळीसाठी मैदा, कणीक, मीठ एकत्र करुन घ्या. त्यात २ टेबलस्पून तेल चांगले कडकडीत तापवून मोहन घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट कणीक मळून गोळा झाकून ठेवा.

गूळ पातळ चिरून किंवा किसून घ्या. भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधुन अगदी बारीक करून घ्या. त्याला चांगलं तेल सुटतं.
आता एका कढईत २ टेबलस्पून तेल तापवा आणि त्यात बेसन छान खमंग भाजून घ्या.
गॅस बंद करून त्यात गूळ, तीळ-शेंगदाणा कूट, जायफळ हे सारं मिक्स करा.
हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून सगळं एकजीव करून घ्या.

२ पुरी ला घेतो तशा लाट्या घ्या. तेवढ्याच आकाराची एक गुळाची गोळी त्यात ठेवून कडा व्यवस्थित बंद करून पातळ पोळी लाटा.

मध्यम आचेवर भाजा आणि पेपर वर सगळ्या पोळ्या पसरुन ठेवा.

वाढताना साजूक तुपाचा गोळा पोळीवर जरूर घाला.


टीपः गूळ जितका घट्ट असेल तशीच कणीक असावी म्हणजे पोळीत गूळ पसरला जातो एकसारखा.

Tilgul / तिळगूळ





Tilgul – My Magic (Sesame and jaggery chikki)

Ingredients: 

½ kg. jaggery –finely grated, 2 teaspoon clarified butter, 2 cups roasted sesame course powder, 1.5 cups roasted peanut powder, 2 teaspoon cardamom powder, 2 tablespoon dry coconut- grated

Method:

 Heat clarified butter in a pan and add jaggery. After it melts completely, switch off the flame and mix all the ingredients very fast. Pour this mixture on a greased plate and roll out with the help of greased rolling pin to even size. Spread dry grated coconut. Make 1 inch piece mark with the help of knife. Take out all the tilgul vadies/chikki once they are cold.




तिळगूळ: माय मॅजिक

साहित्यः 

अर्धा किलो साधा गूळ बारीक चिरुन्/किसून, २ टीस्पून साजूक तूप, २ वाट्या भाजलेल्या तिळाचे भरडसर कूट, १.५ वाट्या भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट, २ टीस्पून वेलदोडे पूड, २ टेबलस्पून किसलेले सुके खोबरे

कृती: एका कढईत तूप गरम करून त्यात चिरलेला गूळ घालावा. तो विरघळला की लगेच गॅस बंद करून त्यात तीळ आणि दाण्याचे कूट, वेलची पावडर घालून भराभर हलवून एकत्र करावे आणि तूप लावलेल्या ताटावर तो गोळा घालावा. तूप लावलेल्या लाटण्याने एकसारखे पसरून त्यावर सुके खोबरे पसरुन हव्या त्या आकारात वड्या कराव्या.

Saturday, 13 January 2018

Bhogichi Bhaaji / भोगीची भाजी




Bhogichi Bhaaji – My Magic (Mix vegetable especially from Maharashtra)

‘Bhogi’ is celebrated a day before Makar sankranti in Maharashtra. As its winter season, all fresh vegetables are  available easily. So, this type of mixed vegetable is prepared specially on this day and all the family members enjoy having it early in the morning. Let’s see the recipe for Bhogichi Bhaaji.

Recipe for -4 people

Ingredients :

 1 small carrot, 7-8 ber (Indian Jujube), fresh green chana (chick peas)Lima beans, broad beans, lablab beans and many other types of beans available in the market, 1 potato, 1 small brinjal, 1 drumstick, 4-5 pieces of sugarcane (cut into 1 inch size), green peas, raw tamarind and ginger piece of 1 inch  -  all these vegetables equal to ½ kg.

¼ cup scrapped fresh coconut, ½ cup finely chopped coriander, 3 teaspoon roasted sesame powder, 2 teaspoon roasted peanut powder,  2 teaspoon Maharashtrian Goda Masala, 2 teaspoon red chilli powder, 1 teaspoon tamarind pulp, 2 teaspoon jiggery (Adjust according to your taste), salt as per taste.

For tempering: oil, mustard seeds, cumin seeds, asafoetida, turmeric powder, few curry 
leaves.



Method: 

peel carrot, drumstick and potato. Make medium size pieces of potato and brinjal and keep in water. Clean and de shell all the other vegetables. Cut Carrot also in medium size cubes, make 4-5 pieces of drumstick.

Heat oil in a pan and make usual tempering by adding mustard seeds, cumin seeds, asafoetida, turmeric powder, few curry leaves. Add brinjal,  potato  and drumstick pieces and cover the pan. Steam for 2 minutes. Add all the other vegetables. Stir properly and steam again for 2 minutes. Add chilli powder, salt, goda masala, tamarind pulp, jiggery, roasted sesame and peanut powder. Add very less water just to cook the vegetables. Serve after garnishing with scrapped coconut and chopped coriander.

This subjee is served with Bajra bhakri prepared with sesame, a dollop of white butter on it,  yellow lentil-rice khichadi, kadhi and sesame chutney.

Do give it a try. Its just awesome. Yummilicious..




भोगीची भाजी - माय मॅजिक

संक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगीचा दिवस म्हणून  महाराष्ट्रात साजरा  करतात. तीळ लावलेली भाकरी, मुगाची खिचडी, कढी आणि ही भाजी हा भोगीचा मुख्य नैवेद्य असतो. तर आज पाहू भोगीची भाजी कशी करायची ते. हिला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात.

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः

१ छोटे गाजर, ७-८ बोरंसोलाणे (ओल्या हरभर्‍याचे दाणे ), पावटा, पापडी , डबलबी आणि इतरही मिळतील आणि आवडतील त्या सर्व शेंग भाज्या, १ बटाटा, १ वांगं,शेवग्याची १ शेंग, उसाचे ४-५ सोललेले तुकडे (करवे), मटार, १ इंचाचा ओल्या हळदीचा आणि आल्याचा तुकडा अशी सगळी मिळून भाजी अर्धा किलो


१/४ वाटी खोवलेले खोबरे, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ टीस्पून तिळाचं आणि २ टीस्पून शेंगदाण्याचं कूट, २ टीस्पून गोडा मसाला,२ टीस्पून  लाल तिखट, १ टीस्पून चिंचेचा दाट कोळ, २ टीस्पून गूळ (आवडी नुसार कमीजास्त करु शकता )चवीनुसार मीठ.

फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता

कृती: 

गाजर, शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा यांचे साल काढा. बटाटा आणि वांगं  यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन पाण्यात ठेवाव्या म्हणजे त्यांचा राप निघुन जाईल. इतर सर्व शेंग भाज्या नीट निवडून आणि दाणे काढून घ्याव्यात. काही शेंगांच्या सालीही चालतात.त्याही घ्याव्यात. गाजराचेही मध्यम आकाराचे तुकडे करावेत. शेवग्याच्या शेंगांचे ४-५ तुकडे करावेत.

आता एका पातेल्यात तेल घेउन नेहमीसारखी मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात पहिल्यांदा वांगं, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालून एक वाफ काढावी. नंतर त्यात बाकीच्या सर्व भाज्या घालाव्या. नीट ढवळून परत एक वाफ काढावी. त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. तिळाचे आणि शेंगदाण्याचे कूट घालावे. पाणी अगदी जेमतेम घालून ही भाजी शिजवावी. वाढताना वरून खोवलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून द्यावी.

भोगीच्या दिवशी ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, मुगाची खिचडी, कढी आणि तिळाच्या चटणीबरोबर खातात.

करा तर मग ...


Saturday, 6 January 2018

Matar Karanji /मटार करंजी





Matar Karanji –My Magic

Matar Karanji is a famous Maharashtrian snack item made from fresh  green peas.

Ingredients:

1.    For stuffing: 1 kg. green peas, 1 inch piece of ginger, 5-6 green chilis, 1 teaspoon cumin seeds, 1 teaspoon cumin seeds-coriander seeds powder, 2 teaspoon garam masala, salt as per taste, 1 pinch sugar, ½ teaspoon red chilli powder. For tempering – 2 teaspoon oil, mustard seeds, 1 pinch asafoetida.

2.       For cover – Maida (all purpose flour) 300 grams, 2 teaspoon oil, salt ½ teaspoon, carom seeds (Ajwain ) ½ teaspoon, water as required.

3.       Oil for deep frying



Method: 

Take maida and add salt and carom seeds. Heat 2 teaspoon oil and add in maida. Mix properly and add water to knead a firm dough. Keep it covered for an hour.
In a mixer, make course paste of green peas, cumin seeds, ginger &  chilli. Heat 2 teaspoon oil in a pan and add mustard seeds, asafoetida and this mixture in it. Saute and cover the pan. Let the peas cook properly. Add garam masala, salt as per taste, 1 pinch sugar, ½ teaspoon red chilli powder in it. Let it cool.

Now, make small lemon sized balls from the dough. Roll out one ball with the help of rolling pin to a size of puri. Add 2 teaspoon full stuffing and make a half fold to puri. Seal the edges and cut the extra portion of the karaji with the help of pizza cutter. I have not used the cutter, instead, I have twisted the edges of the karanji. (proper Marathi word – murad-मुरड). Make all the karanjis in this way.

Heat oil and deep fry each karanji on a low flame.
Serve it with tomato chutney, sauce or eat it like that only.
It’s just yummy. Enjoy




मटार करंजी - माय मॅजिक

मटार करंजी हा महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय असा उपाहारचा पदार्थ आहे.

साहित्यः
१. सारणासाठी  : १ किलो सोललेला मटार१ इंच आल्याचा तुकडा, ५-६ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून धने-जिरे पूड, गरम मसाला २ टीस्पून, मीठ चवीनुसार, चिमूट भर साखर, लाल तिखट १/२ टीस्पून, फोडणीसाठी - २ टीस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग.
२. आवरणासाठी: ३०० ग्रॅम मैदा,२ टीस्पून कडकडीत तेलाचे मोहन, मीठ १/२ टीस्पून, ओवा १/२ टीस्पून, आवश्यकतेनुसार पाणी
३. तळण्यासाठी तेल.



कृती:

मैद्यामध्ये २ टीस्पून तेल चांगले कडकडीत गरम करून घाला. मीठ आणि ओवा घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून तो तासभर झाकून ठेवा.

मटार चे दाणे, आलं, हिरव्या मिरच्या,जिरे मिक्सरमधून अर्धबोबडे वाटून घ्या. एका कढईत २ टीस्पून तेल तापवा आणि त्यात मोहरी व हिंग घाला. हे वाटलेले मिश्रण त्यात घालून चांगले ढवळून झाकून एक वाफ आणा.गरम मसाला, धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि लाल तिखट घाला. भाजी चांगली शिजली की थंड करून घ्या.

आता मैद्याचे छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. त्याची पुरी लाटून २ टीस्पून सारण भरा. नेहमीसारखा करंजीचा  आकार देउन कातण्याने कापा किंवा मुरड घाला. अशा प्रकारे सर्व करंज्या करून घ्या आणि गरम तेलात मंद आचेवर सावकाश तळा.


टोमॅटोची चटणी, सॉस बरोबर किंवा नुसतीच खा/खायला द्या.



Wednesday, 3 January 2018

Soya Chunks Biryani/सोया चंक्स बिर्याणी




Soya Chunks Biryani- My Magic

Recipe for : 4 people

Ingredients:

1 cup basmati  rice, 100 grams small soya chunks, 1 bulb garlic, 2 inch piece of ginger, 1 teaspoon cumin seeds, 2 onions- out of which 1 finely chopped and one sliced thinly and deep fried, 1 big potato sliced, 4 green chilies, 2.5 teaspoon biryani masala, 2 teaspoon curd, 1 teaspoon red chili powder, ½ teaspoon turmeric powder, 2 bay leaves, 1 star anise, 2 green cardamoms, 3-4 black peppercorns, 1 inch cinnamon stick, 2 teaspoon milk and few strands of saffron mixed together, salt as per taste, 2 tablespoon oil, water as required, fresh coriander leaves finely chopped.

 Method:

Wash and rinse rice, soak for ½ an hour and then drain it and keep aside.
Wash Soya chunks and soak them in hot water for 15-20 minutes. Then press them in your palms and take out the excess water from the chunks and keep them in one bowl. Make a fine paste of Ginger, garlic, chilies and cumin seeds. Add this paste, red chili powder, salt, curd, biryani masala and 1 teaspoon oil in the soya chunks. Mix well so that this masala neatly covers all the soya chunks. Marinate this for nearly 2 hours.
Take 5 cups water in a pan and add a little salt and 1 bay leaf in it. When the water starts little boiling, add rice. Let it half done in 5 minutes. Don’t overcook. Drain the excess water from rice.

Now, heat oil in a pan. Add 1 bay leaf, star anise, cardamoms, peppercorns, cinnamon stick and one finely chopped onion. Let it be golden brown. Add turmeric powder and the marinated soya chunks. Fry for 5 minutes.

Take another pot and add 1 teaspoon oil at the bottom. Spread round slices of potato on it (So that the biryani doesn’t stick at the bottom of the vessel and the potato slices become so crispy that you enjoy it) add one layer of soya chunks on it and rice layer on the layer of chunks. Repeat it. The final layer should be of rice. Sprinkle the saffron mixed milk on it and cover the pan. Let the biryani cook on slow flame for 10 minutes.
Serve this after garnishing with fried onion and chopped coriander leaves.
This biryani tastes nice with curd or any gravy. Enjoy….. 



सोया चंक्स बिर्याणी - माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 

१ वाटी बासमती तांदूळ,१०० ग्रॅम्स छोटे सोया चंक्स, १ लसणीचा गड्डा, २ इंच आल्याचा तुकडा, १ टीस्पून जिरे, २ कांदे- पैकी १ बारीक चिरून आणि एक लांब पातळ चिरून आणि तळून१ मोठा बटाटा गोल काप करून, ४ मध्यम तिखट हिरव्या मिरच्या, २.५ टीस्पून बिर्याणी मसाला,२ टीस्पून दही१ टीस्पून लाल तिखट,१/२ टीस्पून हळद२ तमालपत्रे, १  चक्रीफूल, २ वेलदोडे, ३-४ मिरे, १ बोट्भर लांबीची दालचिनी, २ चमचे दूध आणि थोडेसे केशर एकत्र करून,   चवीनुसार मीठ,२ टेबलस्पून तेल,आवश्यकतेनुसार पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीकरिता

कृती:

तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर तास उपसून ठेवा.
सोया चंक्स धुवून गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर ते पिळून एका भांड्यात काढा. लसूण, आलं, मिरच्या, जिरे यांची मिक्सरवर पेस्ट करून घ्या. ही पेस्ट, तिखट, मीठ, दही, बिर्याणी मसाला आणि १ टीस्पून तेल या सोया चंक्स मध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या. मसाला सगळ्या चंक्सना नीट लागला पाहिजे. हे मिश्रण २ तास चांगले मुरायला ठेवा.

नंतर एका पातेल्यात ५ कप पाणी किंचित मीठ घालून गरम करत ठेवा. त्यात १ तमालपत्र घाला. पाण्याला थोडीशी उकळी आली की त्यात  उपसून ठेवलेले तांदूळ घाला आणि त्याचा अर्धव शिजेल असा भात तयार झाला की एका चाळणीवर ओतून जास्तीचे पाणी काढून टाका.

एका पातेल्यात थोडेसे तेल गरम करा.त्यात १ तमाल पत्र, चक्रीफूल, वेलदोडे, मिरे दालचिनी आणि  बारीक चिरलेला एक कांदा घाला. तो छान  परतला की त्यात हळद घालून हे मुरवलेले सोया चंक्स घाला. ५ मिनिटे चांगले परतून घ्या.

आता एका भांड्यात तळाला थोडेसे तेल घाला. बटाट्याचे गोल काप करून तळाशी घाला.(म्हणजे बिर्याणी तळाला लागत नाही आणि खरपूस झालेले बटाट्याचे काप खायला खूप छान लागतात) त्यावर सोया चंक्स चा एक थर आणि भाताचा एक थर असे थर घाला.सर्वात वर भाताचा थर येउदे. वरती केशर मिश्रित  दूध घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे ही बिर्याणी शिजू द्या.

वाढ्ताना बिर्याणीवर तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या.


ही बिर्याणी नुसत्या दह्याबरोबर किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर छान लागते.

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...