Friday 22 December 2017

Sarson da Saag Aur Makke di roti / सरसो दा साग और मक्के दि रोटी




Sarson da Saag Aur Makke di roti:My Magic

For sarson da saag: 

1 bunch of sarson vegetable, 1 bunch of spinach, 6-7 green chilies, asafoetida, 1 teaspoon red chilli powder, 1 teaspoon garam masala, 2 teaspoon makai ka atta (not cornflour, the one which comes in light yellow colour), 8-10 garlic cloves , 1 inch ginger and one onion finely chopped, salt, 1 teaspoon sugar, 1 tablespoon ghee (clarified butter)
Wash and clean both the greens. Chop finely., take only the leaves of spinach. Not the stems. For sarson, clean the stems and shave the outer skin of stem because it’s hard to steam.


Then in a cooker, take both the chopped greens, and pressure cook it with the green chilies and a pinch of asafoetida. After 1 whistle, keep the gas on low flame for about 45 minutes for cooking the greens very nicely.

After the cooker becomes cool, blend the vegetables to a very fine paste from the mixer.
In a pan, take ghee and when it becomes hot, add asafoetida, onion, ginger garlic and sauté. When it’s done, add the paste to it. Add Chili powder, sugar, salt and maize flour for thickening it. Add garam masala and cover the pan. Put off the gas. The saag is ready.


For maize roti:

take maize flour, finely chopped coriander, ajwain (carom seeds), salt and 1 teaspoon of clarified butter. With the help of Warm water, knead the dough tightly.
Now take a zip lock bag. Open it on 2 sides. Keep a medium ball of this atta in between the plastic bag and roll it to a roti. (It breaks while rolling. So, the plastic Bag) Roast it on a hot griddle and apply clarified butter on it. Serve hot.






सरसो दा साग और मक्के दि रोटी: माय मॅजिक

खूप दिवस चालल होत की एकदातरी हा बेत करायचाच. तर तसा दिवस आलाच काल. बाजारात ही सरसोंची भाजी दिसली आणि ताबडतोब घेतली. तर पाहू आता मी ही भाजी कशी केली ते.


भाजीसाठी: 

१ मोहरीच्या भाजीची (सरसो ) जुडी, एक पालकची जुडी, ६-७ हिरव्या मिरच्या, हिंग, लाल मिरची पूड १ टी स्पून , गरम मसाला १ टी स्पून, २ चमचे मक्याच पीठ, १ कांदा अगदी बारीक चिरून, ८-१० लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून, १ इंच आलं अगदी बारीक चिरून, मीठ, १ टी स्पून साखर, साजूक तूप १ टेबलस्पून.


मक्याच्या रोटीसाठी:

 मक्याच पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, साजूक तूप, ओवा आणि गरम पाणी. 
पहिल्यांदा या दोन्ही भाज्या निट धुवून बारीक चिरून घेतल्या. पालकाची फक्त पाने घेतली. मोहरीच्या भाजीचे देठ सोलून मग चिरायला लागतात कारण त्याची साल नीट  शिजत नाही. कुकरमध्ये या चिरलेल्या दोन्ही भाज्या, मिरच्या, थोडा हिंग असं घालून प्रेशर कुकरची एक शिटी होऊ दिली. नंतर जवळजवळ पाऊण तास गॅस मंद आचेवर चालू ठेवला. शिटी होऊ न देता. कारण ही भाजी छान शिजायला बराच वेळ लागतो. मग तो कुकर गार झाल्यावर ही भाजी मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घेतली. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात हिंग, कांदा, आलं-लसूण हे परतून घेतलं. त्यात ही पेस्ट केलेली भाजी घातली. मक्याचं पीठ घातलं. त्याने भाजी घट्ट होते. मीठ, साखर, तिखट घातलं.गरम मसाला घालून झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला.


मक्याच्या पिठात थोडसं तूप, मीठ, ओवा, कोथिंबीर घालून गरम पाण्याने हे पीठ खूप मळून झाकून ठेवलं. १० मिनिटांनी एक प्लास्टिक पिशवी दोन बाजूंनी कापून घेऊन मध्ये हे पीठ ठेवून त्याची पोळी लाटली. (नुसती लाटता येत नाही. तुटते. तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजा आणि गरम गरम वाढा.

No comments:

Post a Comment

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...