Kat Vada - My Magic.
Recipe for: 4
people
Ingredients:
1.
For making
vade and kat – 2 inch ginger piece, 1 bulb of garlic, 4-5 green chillies, ground together, chopped green coriander
leaves.
2.
For making
Batata vada - ½ kg potatoes –boiled and
peeled, 2 onions, chickpea flour (Besan) -300 gms, salt as per taste, pinch full
each of asafoetida, turmeric powder, 1/2
teaspoon red chilli powder, juice of ½ lemon.
3.
For
making kat (tarry) - 2 onions, 2 small tomatoes, 3-4 teaspoon jowar atta, 2
teaspoon red chilli powder, 3 teaspoon
garam masala, salt as per taste, for tempering oil, mustard seeds, asafoetida,
turmeric powder
4.
For deep
frying – oil
5.
Water as
required.
6. shev, farsan (optional)
Method:
First of all chop
the onions and tomatoes. Chop the coriander finely.
For making Vada:
Mash potatoes, Add half of the chopped onion, ½ of the ground ginger-garlic-chilli
paste, salt as per taste, asafoetida, turmeric powder, red chilli powder and
lemon juice. Make equal sized balls or flattened ball shaped vadas.
Take besan and add
salt, turmeric powder, chilli powder and salt as per taste. Heat 2 teaspoon oil
and add to this flour. Add water and make the batter thicker than the pakoda
batter.
Now heat oil in a
kadhai. Dip each batata vada in this batter and deep fry the vadas. Prepare all
the vadas in this manner. Keep aside.
Now heat 2
teaspoon oil in a pan and roast jowar flour on low flame till you get a nice
aroma. Keep this roasted flour aside.
Heat oil in the
same pan (but in somewhat more quantity than usual) and add mustard seeds,
asafoetida and add remaining ginger-garlic and chilli paste. When oil starts separating,
add remaining chopped onion and add a little salt in it so that the oinion will
get sauted fast. Add chopped tomatoes. When they are done, add red chilli
powder, turmeric powder and add water as per the consistency you want. (I added
2 full glass of lukewarm water). When this mixture starts boiling, add garam
masala. When you get a nice aroma of this masala, slowly the roasted jowar
powder to get the right consistency for the kat. If you add too much of this
flour, the kat may become too thick. So, mix as per your taste. Adjust the
salt.
Now take a dish
and add kat and 2 batatavadas in it. If you like you may serve this dish with
chopped onions, farsan, shev etc.
Enjoy the
kat-vada.
कट वडा - माय मॅजिक
पाककृती-४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१. वडे आणि कट करण्याकरिता लागणारे एकत्रित
साहित्यः २ इंच आल्याचा तुकडा, लसणीचा १ गड्डा, ४-५ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,
२.वड्यांसाठी - १/२ किलो बटाटे, २ कांदे, डाळीचे पीठ -३००
ग्रॅम्स, मीठ चवीनुसार, प्रत्येकी चिमूटभर हिंग, हळद
आणि लाल तिखट रंगासाठी १/२ टीस्पून, १/२ लिंबाचा रस
३.कट करण्याकरिता: २ कांदे, २
टोमॅटो, ३-४ टीस्पून
ज्वारीचे पीठ थोड्या तेलावर खमंग भाजून, लाल तिखट २ टीस्पून,३
टीस्पून गरम मसाला, मीठ
चवीनुसार. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद.
४. तळण्यासाठी तेल
५. आवश्यकतेनुसार
पाणी.
६. शेव, फरसाण (ऐच्छिक)
कृती:
वडे करण्यासाठी: बटाटे उकडून मॅश करून
घ्या. त्यात चवीनुसार मीठ, आलं
लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण,
थोडीशी चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस असं एकत्र करून सारण तयार करून घ्या. या सारणाचे
एक्सारख्या आकाराचे गोल किंवा चपटे वडे करा.
डाळीच्या पिठात मीठ, तिखट, हळद आणि २टीस्पून तेलाचे कडकडीत मोहन घाला. आवशकतेनुसार पाणी घालून
भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं पीठ तयार करा.
एका कढईत तेल तापवून त्यात हे वडे डाळीच्या
पिठात घोळवून नेहमीप्रमाणे बटाटेवडे तयार करुन घ्या.
कट करण्यासाठी कांदे आणि टोमॅटो बारीक चिरा.
एका कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घेउन
मोहरी, हिंग घालून
फोडणी करा. त्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण घालून परता. तेल सुटू लागले की त्यात
उरलेला कांदा घालून परता. कांदा शिजताना थोडेसे मीठ घाला म्हणजे कांदा लौकर शिजेल.
यात आता चिरलेला टोमॅटो घाला. हे सर्व मिश्रण शिजले की त्यात २ टीस्पून लाल तिखट
घाला. त्याच बरोबर हळद घाला आणि आवश्यकतेनुसार गरम
पाणी घाला.(मी २ ग्लास पाणी घातले होते) उकळी यायला लागली की मसाला घाला.
मसाल्याचा वास येउ लागला की कट घट्ट होण्याकरिता ज्वारीचे भाजलेले पीठ कटाला लावा.
(आवश्यकतेनुसार पीठ वापरावे नाहीतर कट खूप घट्ट होईल).
वाढताना एका डीश मध्ये कट घेउन त्यात २ वडे
घालून द्या. हवे असल्यास वरून फरसाण, शेव, कांदा
घालून द्या.
सुरेख डीश तयार आहे.