Sunday, 19 November 2017

Methi-Paneer Stuff Paratha (Fenugreek-cottage cheese stuff paratha) / मेथी-पनीर स्ट्फ पराठा




Methi-Paneer Stuff Paratha (Fenugreek-cottage cheese stuff paratha) My Magic

Recipe for : 3-4 people

Ingredients:

1.       Whole wheat flour-2 cups, 1/2 cup besan (chickpea flour), 2 teaspoon oil, turmeric powder and asafoetida  ¼ teaspoon each, salt as per taste and water to knead the dough.
2.       For stuffing: 2 bunched of fresh fenugreek –cleaned and chopped finely,  100 grams paneer (cottage cheese). 2 inch piece of ginger, a bulb of garlic, 4 green chillies, garam masala 2 teaspoon, salt as per taste, besan as required (I have used ¾ cup)
3.       For tempering: oil, cumin seeds, asafoetida, turmeric powder
4.       Butter for roasting paratha
5.       Grated cheese for garnishing as per taste


Method:

Refer to No. 1 above. Take whole wheat flour, besan, oil, salt, asafoetida, turmeric powder and knead a regular dough and cover it for an hour.

dough and stuffing


Stuffing:

Make a course paste of ginger, garlic and green chillies.
Now in a pan heat oil and add cumin seeds, asafoetida and turmeric powder in it. Add fenugreek leaves finely chopped. Mix well and cover the pan for a minute. Don’t use water at all. Now add grated cottage cheese (paneer) in it. Steam it again. Add Garam masala and salt. Add besan so that the vegetable will be fully dry. Let it cool.
Now take a normal ball out of the dough and stuff the equal quantity of stuffing in it.
Roll a regular paratha and roast on a hot griddle on medium heat . While roasting, use butter so that it will give a very nice aroma to the paratha.
Serve hot with grated cheese as per taste and with pickle/chutney/sauce.
Enjoy.




मेथी-पनीर स्ट्फ पराठा: माय मॅजिक

वाढणी: ३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्यः

१. कणीक - २ वाटी, १/२ वाटी बेसन,२ टीस्पून तेल, हळद आणि हिंग प्रत्येकी १/४ टीस्पून, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार.
२. सारणासाठी:  २ जुड्या मेथी निवडून , धुवून, बारीक चिरून, पनीर १०० ग्रॅम, आल्याचा २ इंचाचा तुकडा, १ गड्डा लसूण, ४ हिरव्या मिरच्या, गरम मसाला २ टीस्पून, मीठ चवीनुसार, डाळीचे पीठ (बेसन) आवश्यकतेनुसार.
३. फोडणीसाठी:- तेल, जिरे, हिंग, हळद.
३. पराठा भाजण्यासाठी बटर
४ सजावटीसाठी चीज किसून आवडीनुसार.

कृती: क्र.१  मध्ये लिहिल्याप्रमाणे कणीक आणि बेसन एकत्र करून त्यात हळद, हिंग, मीठ, तेल घालून नेहमीप्रमाणे कणीक मळून एक तासभर झाकून ठेवून द्यावी.

कणिक आणि सारण

सारणः

पहिल्यांदा आलं-लसूण आणि हिरव्या मिरच्या थोडे मीठ घालून वाटून घ्याव्यात.
नंतर एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद घालून नेहमीप्रमाणे फोडणी करावी. त्यात हे वाटण चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मेथी घालून एक वाफ काढावी. पाणी अजिबात घालू नये. मेथी शिजत आली की त्यात पनीर किसून घालावे आणि परत एक वाफ काढावी. त्यात गरम मसाला आणि मीठ घालून परतावे. ही भाजी ओलसर दिसेल. तेव्हा आवश्यकतेनुसात डाळीचे पीठ घालून परत एक वाफ काढावी आणि भाजी थंड होण्यास ठेवावी. (मला  पाउण वाटी बेसन लागले होते) भाजी कोरडी व्हायला हवी.

आता कणकेचा नेहमीच्या पोळीसाठी घेतो तेवढा उंडा घेउन त्यात तेवढेच सारण भरावे. नेहमीप्रमाणे पराठा लाटावा आणि भाजताना तो दोन्ही बाजूंनी बटर सोडून मध्यम आचेवर खरपूस भाजावा.


वाढताना त्यावर आवडीप्रमाणे चीज किसून घालावे आणि  लोणचे/ चटणी/टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम खाण्यास द्यावेत.

1 comment:

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...