Sunday 19 November 2017

Sev-potato-dahi-puree / शेव बटाटा दही पुरी





Sev-potato-dahi-puree – My Magic

It is a famous Indian chaat recipe

Ingredients:

1.Panipuri puffs(purees) as required
2. Boiled potatoes -5
3. Tamarind ½ cup, deseeded dates 10-12 soaked in luck warm water for half an hour, 1 tablespoon jiggery finely chopped, 1 teaspoon cumin seeds-coriander powder, ½ teaspoon red chilli powder, salt as per taste.
3. Bunchful of coriander and mint leaves, 4-5 green chillies, ½ inch piece of ginger, salt as per taste, 1 pinch sugar.
4.thick curd-2 cups, whisked with a little salt and sugar
5. zero no. (very thin) sev – generous
6.onion , tomato each 1 finely chopped and coriander leaves generous amount-finely chopped.
7. red chilli powder and chaat masala as per taste.


Method:

1.       Grind tamarind and dates in a fine paste and sieve through a strainer. Add red chilli powder, coriander cumin powder, jiggery, salt and boil for 5 minutes. Let it cool. It should be thick pulp.
2.       Make chutney of coriander and mint leaves with ginger , chillies and salt.
3.       Mash potatoes./chop finely.
Now just crack the panipuri puries on top and stuff the mashed potatoes, onion, tomato in each puri. Add tamarind pulp, green chutney and curd on each puri. Add a generous amount of sev and coriander on it. Add chilli powder and chaat masala as per taste.
Enjoy…



शेव बटाटा दही पुरी: माय मॅजिक
हा एक सगळ्यांना अतिशय आवडणारा चाट प्रकार आहे,

साहित्यः

१. पाणीपुरीसाठी लागणार्‍या पुर्‍या
२.उकडलेले बटाटे-५
२. चिंच १/२ कप, बिया काढलेले खजूर १०-१२, (अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून) गूळ १ टेबलस्पून  बारीक चिरून, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून तिखट, मीठ
३. पुदिना आणि कोथिंबीर प्रत्येकी मूठभर, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ इंच आल्याचा तुकडामीठ चवीनुसार, किंचित साखर
४. दही- २ कप, घट्ट. थोडेसे मीठ आणि साखर घालून फेटून घेतलेले.
५. भरपूर बारीक शेव (झिरो नंबर्/नायलॉन शेव म्हणून बाजारत मिळते)
६. १ कांदा, १ टोमॅटो, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून.
७. लाल तिखट पावडर आणि चाट मसाला आवडी नुसार.

कृती:

१. चिंच, खजूर मिक्सरमधून थोड्या पाण्याच्या सहाय्याने अगदी बारीक वाटून घ्यावेत. ही पेस्ट एका गाळणीतून गाळून घेउन एका पातेल्यात घालावी.त्यात धने-जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेला गूळ घालून एक उकळी आणावी. हे चिंचेचे पाणी थंड करत ठेवावे.
२. पुदीना, कोथिंबीर, मिरच्या, आलं, मीठ, साखर यांची चटणी करून घ्यावी.
३. बटाटे कुस्करून्/ त्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

आता एका डीशमध्ये पुर्‍या वरून फोडून ठेवाव्यात. त्यात उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी भराव्यात. कांदा, टोमॅटो भरावा. त्यावर हिरवी चटणी, दही, चिंचेचे घट्ट पाणी घालावे.  वरून भरपूर शेव, कोथिंबीर घालावी, आवडीनुसार चाट मसाला आणि तिखट घालावे.
फन्ना उडविण्यासाठी तयार आहे एस-पी- डी-पी अर्थात शेव बटाटा दही पुरी




1 comment:

  1. This recipe has been posted by me on 19.11.17 at 21:43 pm

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...