Shahi Vegetable Biryani: My Magic
Recipe: for 4 people.
Ingredients:
1.5 cups Basmati
rice, 1.5 cups mixed vegetables- cut in medium pieces. (I have taken Carrots,
green peas, French Beans, Flower, potato and one green chili cut in half.) 7 medium
onions, 8-10 garlic cloves, 1 inch piece of ginger, 2 ripe tomatoes, 100 grams
fresh cottage cheese (pander), 1 teaspoon black cumin seeds (Shaha jire), 5
cloves, 1 inch cinnamon stick, 2 black cardamoms, 2 green cardamoms, 1 bay
leaf, 2 teaspoon biryani masala, 10-12 saffron strands soaked in 2 teaspoon
milk, 2 tablespoon thick curd, 10 almond and 10 cashew nuts cut finely, bunch full
of coriander leaves and mint leaves finely chopped, 1 pinch sugar, ½ teaspoon
red chili powder, salt as per taste, water and oil as per need.
Method:
Wash Rice and drain it.
Keep for at least 2 hours. Cut the vegetables in medium size. Don’t cut very
finely otherwise all the vegetables will get mashed up.
Blanch 2 tomatoes and puree them.
Make paste of ginger, garlic and 2
onions.
After two hours take 6 cups water
in a large pan and add 1 teaspoon salt, 5 cloves, cinnamon stick, black and
green cardamoms, 1 bay leaf and 1 teaspoon oil.
Boil the water. Add drained rice and let it cook up to 80% not more than
that. Drain excess water from the rice by pouring it on a strainer. Let it
cool.
In another pan, heat 1 teaspoon oil. Add black cumin. After it
splutters, add ginger-garlic-onion paste. Saute it. Add tomato puree and again sauté
it. Add red chili powder, Biryani masala and sauté till the oil separates. Add
all the vegetables. Cover the pan for 2-3 minutes. Add pieces of cottage cheese. Add salt as per
taste and a pinch of Sugar. The vegetables should be nicely coated with the
masala.
Now take one pan. Add 1 teaspoon
of clarified butter (Desi ghee) and a little water in it. Now make 1 layer of
the half done rice in that pan. Above this layer, make one layer of the mixed
vegetables. Add third layer of coriander and mint leaves, fourth layer of
cashew nuts and almonds. Add half of thick curd and again repeat the total
process of layers. The uppermost layer should be of rice. Add remaining
coriander and mint leaves and add the soaked saffron strands with milk in it.
Now the process of making layers is complete.
making second layer |
making 4th layer |
making final layer |
Sprinkle a spoonful of milk on
the rice. Cover the pan. Now heat a griddle and keep this Biryani pan on it.
The flame should be very slow. Cook the biryani for 5-7 minutes.
Now cut the remaining 5 onions length
wise and very thin. Fry them and garnish the biryani with this onion.
Enjoy this biryani with Tomato
soup,cucumber salad and fried papad.
शाही व्हेजिटेबल बिर्याणी - माय मॅजिक
वाढणी: ४ व्यक्तींसाठी.
साहित्यः
१.५ वाट्या बासमती तांदूळ, १.५
वाट्या चिरलेल्या भाज्या (यात मी गाजर, मटार, घेवडा, फ्लॉवर
आणि बटाटा या भाज्या घेतल्या आहेत आणि एक हिरवी मिरची २ तुकडे करून. ). ७ कांदे,८-१०
लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ मोठे पिकलेले
टोमॅटो, १०० ग्राम पनीरचे तुकडे, १ टीस्पून
शहाजिरे, ५ लवंगा,
१
इंच दालचिनीचा तुकडा, २ मसाला वेलच्या, २ हिरवे वेलदोडे,
१ तमालपत्र, २ टीस्पून बिर्याणी मसाला, केशराच्या
१०-१२ काड्या २ टीस्पून दुधात भिजवून,
२ टेबलस्पून घट्ट दही चांगले फेटून घेउन, प्रत्येकी १० बदाम
आणि काजू बारीक तुकडे करून, प्रत्येकी मूठ्भर पुदिन्याची पाने आणि
कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून, चिमूटभर साखर,१/२ टीस्पून लाल
तिखट, मीठ चवीनुसार. पाणी आणि तेल आवश्यकतेनुसार.
कृती:
प्रथम तांदूळ धुवून रोवळीवर २ तास उपसून
ठेवा. भाज्या चिरून घ्या. चिरताना फार बारीक न चिरता मध्यम तुकडे करा नाहीतर
बिर्याणीत त्या भाज्यांचा शिजून गाळ होतो.
२ टोमॅटो ब्लांच करून त्यांची मिक्सरमधून
प्रुरी करून घ्या. आलं लसूण आणि २ कांदे घालून ही पेस्ट तयार करा.
दोन तासांनी एका मोठ्या पातेल्यात ६ वाट्या
पाणी गरम करत ठेवा. त्यात १ टीस्पून मीठ,
५
लवंगा, दालचिनी, १ तमालपत्र , दोन्ही प्रकारचे
वेलदोडे घाला. १ टीस्पून तेल घाला. पाण्याला उकळी आली की धुवून उपललेले तांदूळ
त्यात घाला. सतत ढवळू नका. तांदळाचा दाणा मोडतो.
तांदूळ साधारण ८०% शिजत आले की चाळणीवर ओतून
त्यातील पाणी काढून टाका. भात तसाच निथळत
ठेवा .
एकीकडे दुसर्या पॅन मध्ये १टीस्पून तेल घाला.
गरम झाले की त्यात शहाजिरे घाला. ते तडतडले की त्यात आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट
घालून चांगली परता. मग टोमॅटो प्युरी घालून परत परता. त्यात तिखट, बिर्याणी
मसाला घालून परता. तेल सुटू लागलं की सगळ्या भाज्या घाला. भाज्यांना एक चांगली वाफ
येउदे. आता पनीरचे तुकडे घाला आणि चांगलं ढवळा.
भाजीला मसाला सगळीकडून नीट लागायला हवा. चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घाला.
आता एका पॅन मध्ये खाली किंचित पाणी आणि १ चमचा
साजूक तूप घाला. त्यावर या तयार भाताचा एक थर घाला. त्यावर भाजीचा थर घाला,
त्यावर
कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा थर, नंतर काजू आणि बदाम तुकडे, मग
फेटलेल्या दह्यापैकी अर्ध दही असे थर लावा. परत भात, भाजी, कोथिंबीर-पुदीना,
काजू-बदाम,
दही
आणि परत भात असे थर येउदेत. त्यावर उरलेली कोथिंबीर-पुदिना पाने घाला. वरून केशर
मिश्रित दूध घाला. ही झाली बिर्याणीचे थर लावायची पध्दत.
२ रा थर |
४ था थर |
शेवटचा थर |
त्यावर चमचाभर दूधाचा शिपका मारा. आता एक तवा
चांगला तापवा. त्यावर हे बिर्याणीचे पातेले ठेवा. त्यावर झाकण ठेवा आणि अगदी
मंदाग्नीवर ५-७ मिनिटे शिजवा.
आता जे कांदे बाजूला काढून ठेवले असतील,
ते
लांब पातळ चिरून तळून घ्या आणि बिर्याणी वाढताना तिच्यावर हा तळलेल्या कांद्याचा
कीस घालून द्या.
या बिर्याणीचा आस्वाद टोमॅटो सूप, काकडीची
कोशिंबीर आणि तळलेल्या पापडाबरोबर जरूर घ्या.
This recipe has been posted by me on 21.10.2017 @ 11:35 pm
ReplyDeleteछानच!
ReplyDelete