Golabhat: My Magic
Recipe: for 3 people
Ingredients:
2 cups rice (washed and drained), 4 cups
hot water, 1 cup chickpea flour (besan) , 1 cup nicely chopped fenugreek
leaves, 1 teaspoon ginger-garlic paste, ¼ cup grated dry coconut, 1 teaspoon
cumin seeds, 2 teaspoon red chili powder, salt as per taste, juice of 1 lemon, ½
teaspoon sugar, 2 tablespoon oil,
Extra 2 tablespoon oil for tempering, 8-10 garlic cloves-
slightly crushed, mustard seeds, asafoetida,
turmeric powder.
Method:
Heat two tablespoon oil and in a pan and sauté
chickpea flour in it till it gives a
nice aroma. Add fenugreek leaves and sauté again. Grind grated coconut, cumin
seeds with ginger-garlic paste and add this mixture in the chickpea flour-fenugreek
leaves mixture and keep aside to let it cool.
In other pan, take 1 teaspoon oil and sauté drained
rice for 2-3 minutes. Add hot water and let it cook.
Now add chili powder, salt in the besan and add water
slowly to knead the dough in the manner that we can make small balls out of it.
Make the balls accordingly.
Till this time, the rice must be half done. Add 1
pinch chili powder, salt as per taste, sugar and lemon juice. Mix properly and
add the besan-methi balls in the rice. Cover the pan and let the rice cook
completely on slow flame. It will take 5 minutes. Switch off the gas.
Before serving, take 2 tablespoon oil and heat it. Add
mustard seeds, asafetida and turmeric powder and garlic cloves. Add it to the
rice.
Serve hot. Enjoy this rice with pickle, papad and
buttermilk after that. Yummy.
गोळाभातः
माय मॅजिक.
वाढणी: ३ व्यक्तींसाठी
साहित्यः
२ वाट्या तांदूळ (धुवून अर्धा तास
उपसून ठेवलेले), ४ वाट्या गरम पाणी, १ वाटी हरभरा
डाळीचे पीठ, १ वाटी धुवून बारीक चिरलेली मेथीची पाने,
१
टीस्पून आलं लसूण पेस्ट, पाव वाटी किसलेलं कोरडं खोबरं,१
टीस्पून जिरे, २ टीस्पून तिखट, मीठ चवीप्रमाणे,
१
लिंबाचा रस, १/२ टीस्पून साखर, २ टेबलस्पून तेल, , वरून
घ्यायच्या फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, ८-१० लसूण पाकळ्या ठेचून, मोहरी,
हिंग,
हळद.
कृती:
एका भांड्यात २ टेबलस्पून तेल गरम करून
त्यात हरभरा डाळीचे पीठ छान खमंग भाजून घ्यावे. त्यातच मेथीची चिरलेली पाने घालून
परतून घ्यावीत. आलं लसूण पेस्ट, किसलेले खोबरे आणि जिरे वाटून
घेउन या मिश्रणात घालावे. नीट २-३ मिनिटे
परतून हे मिश्रण थंड होउ द्यावे.
तोपर्यंत एका पातेल्यात १ टीस्पून तेल घालून ते
गरम झाले की त्यात उपसून ठेवलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावेत. नंतर त्यात
गरम पाणी घालून भात शिजत ठेवावा.
आता हरभरा डाळीच्या पिठात तिखट, मीठ
घालावे आणि या पिठाचे सुपारी एवढे गोळे करता येतील या बेताने पाणी घालून पीठ
भिजवावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
शिजत असलेल्या भातात अगदी चिमूटभर लाल तिखट,
चवीनुसार
मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालावा. अर्ढवट शिजत आलेल्या भातात हे गोळे अलगद
सोडावेत आणि झाकण लावून भात मंदाग्नीवर शिजू द्यावा.
वाढण्याआधी एका कढल्यामध्ये २ टेबलस्पून तेल
गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद आणि लसणीच्या पाकळ्या घालून चरचरीत
फोडणी करावी आणि भातावर घालावी. लोणचं, पापड आणि ताकाबरोबर
आस्वाद घ्या या गोळाभाताचा..
This recipe has been posted by me on 07.10.17 @ 22 pm
ReplyDelete