Saturday, 5 December 2020

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

 

Fresh turmeric pickle: My Magic



Ingredients:

 ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspoon fenugreek seeds, 2 teaspoon mustard seeds, ½ teaspoon asafetida, ½ teaspoon turmeric powder, salt according to taste and oil.

Method: 

First of all clean and peel the fresh turmeric and ginger. Grate both or chop finely in food processor.

Heat a teaspoonful oil and fry fenugreek seeds and mustard seeds. After cooled down, powder this and keep aside.

Now heat almost 100 gm oil and prepare the tempering by adding mustard seeds, asafetida and turmeric powder. Cool it completely.

Cut the chilies. Now mix the chili, fresh turmeric, ginger, fenugreek and mustard powder, lemon juice, salt. Add tempering to this.

A tasty pickle is ready. This pickle can be taken immediately.

 

ओल्या हळदीचे लोणचे: माय मॅजिक



साहित्यः

अर्धा किलो ओली हळद, पाव किलो आलं, पाव किलो हिरव्या मिरच्या, ते ४ मोठ्या लिंबांचा रस,१ टीस्पून मेथी दाणे, २ टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ,  तेल.

कृती: 

सर्व प्रथम ओली हळद आणि आलं स्वच्छ धुवून  त्यांची साले काढून घ्या. नंतर हळद आणि आलं फूड प्रोसेसर मधून अगदी बारीक करुन घ्या. वाटलं तर आपण हे दोन्ही किसू शकतो.

नंतर एक कढल्यात चमचाभर तेल घालून त्यात मेथी दाणे आणि मोहरी तळून घ्या. गार झाल्यावर हे दोन्ही मिक्सरमधून दळून घ्या. परत थोडे जास्त तेल तापवून (मी जवळपास एक वाटी तेल घेतले होते) त्यात मोहरी, हिंग,हळद यांची फोडणी करुन घ्या.

हिरव्या मिरच्यांचे तुकडे करा. आता हळद, आलं यांचे तुकडे/कीस, मिरचीचे तुकडे, लिंबू रस, मोहरी, मेथीची पूड आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. फोडणी पूर्ण गार झाली की या लोणच्यावर घाला.

हे स्वादिष्ट लोणचे लगेच ही खाण्यास घेता येते.

Satori / साटोरी

 Satori: My Magic






This is one of the best festive sweets in India.

Ingredients:

1.       For stuffing: ¼ kg. Khoya (Milk Solids), 1 small bowl fine semolina, ¼ kg or less powdered sugar, 1 teaspoon powdered cardamom, 1-2 teaspoon milk if required.

2.       For cover of satori: take fine semolina and maida/ All purpose flour  in equal proportions  to 3 small bowls, 3 teaspoon clarified butter/Desi ghee, salt as per taste, water for kneading dough.

3.       Clarified butter/desi ghee for frying satori.

Method:

 Dry Roast Khoya on slow flame . Heat one teaspoon of desi ghee and roast fine semolina on slow flame. Mix roasted khoya, semolina, powdered sugar, cardamom powder and if the stuffing is dry, add 1-2 teaspoon of milk to knead a soft dough.

For cover, add refind/all purpose flour/maida and fine semolina. Add a pinchful of salt. Heat 3 teaspoon desi ghee and add in this. Mix well . Add water as per requirement to knead a semi soft dough. Cover it and set aside for half an hour.

After half an hour, make lemon sized balls of stuffing and dough. Prepare a small puri by stuffing the khoya mix in dough.

Roast the puri on slow flame. Then add some desi ghee and roast both sides.

You can deep fry the satories also.

An awesome treat is ready.

 

साटोरी: माय मॅजिक



हा एक अतिशय स्वादिष्ट, खमंग असा पक्वान्नाचा प्रकार आहे.

साहित्यः

१. सारणासाठी:पाव किलो खवा, एक वाटी बारीक रवा, पाव किलो पेक्षा थोडी कमी पिठी साखर, वेलची पूड १ टीस्पून, लागलं तर 1-2 टीस्पून दूध.

२. साटोरीच्या आवरणासाठी: बारीक रवा आणि मैदा समप्रमाणात एकूण तीन वाट्या, ३ टीस्पून साजुक तूप, चवीनुसार मीठ, पीठ मळण्याकरता पाणी.

३. साटोरी भाजण्यासाठी - साजूक तूप.

कृती:

खवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप गरम करुन त्यात बारीक रवा ही खमंग भाजून घ्या. हे दोन्ही एकत्र करुन त्यात पिठी साखर आणि वेलची पूड नीट मिसळून सारण तयार करा.नीट गोळा होत नसेल तर 1-2 टीस्पून दूध घाला.

आवरणासाठी: रवा, मैदा एकत्र करुन त्यात थोडंसं मीठ घाला. ३ टीस्पून तूप कडकडीत गरम करुन यात घाला. नीट मिक्स करुन त्यात जरुरीनुसार पाणी घालून मिश्रणाचा घट्ट गोळा करुन अर्धा तास झाकून ठेवा.

अर्ध्या तासाने पीठ आणि सारण दोन्हीचेही लिंबाएवढे गोळे करावेत. पिठाची पारी करुन त्यात सारणाचा गोळा ठेवून तो गोळा छोट्या पुरीएवढा लाटून घ्या. लाटताना पीठ घ्यायला लागू नये.

तवा गरम करावा आणि त्यावर या पुर्‍या अगदी मंद आचेवर आधी जराशा शेकाव्या आणि मग तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजाव्या.

काही लोक तुपात तळतातही, पण मी या फक्त तूप सोडून भाजल्या आहेत.

एक सुंदर पदार्थ तयार आहे.

 

Saturday, 18 July 2020

Sabudana Vada / साबुदाणा वडा




Sabudana Vada – My Magic

Ingredients:

250 grams sago/sabudana soaked overnight, so that it almost doubles in size and can be easily mashed with fingers also, half cup roughly powdered roasted peanuts,2 medium boiled potatoes,1 medium raw potato-grated, 1 inch ginger –grated, 2 teaspoon red chili powder, 1 teaspoon cumin seeds, 1 teaspoon sugar, juice of one lemon, salt as per taste, oil for deep frying.

Method:

Take sago/sabudana in a mixing bowl.  Add roasted peanut powder, boiled potatoes and mash it properly. Add salt, sugar, cumin seeds, lemon juice, chili powder and mix it. Add grated ginger and grated potato to the mixture. Make even sized balls of this mixture.
Heat oil in a kadhai. On plastic paper, with the help of palm and fingers, pat the ball and prepare vadas. The vadas should not be too thin or too thick. Deep fry all the vadas.

Serve it with coconut chutney, peanut chutney or simple curd.

Note: Adding raw potato makes the vadas more crispy.
Don’t use water while preparing the vadas, as they don’t remain crispy.



साबुदाणा वडा - माय मॅजिक

साहित्य: 

250 ग्राम साबुदाणा, रात्रभर पाण्यात भिजवून. म्हणजे तो दुप्पट होईल. अर्धा कप शेंगदाण्याचे अर्धबोबडे कूट, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 1 कच्चा बटाटा किसून, 1 पेर भर आल्याचा तुकडा किसून, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून साखर, 1 लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि तळण्यासाठी तेल.


कृती: 

का बोल मध्ये साबुदाणा, शेंगदाणा कूट, उकडलेले बटाटे घालून नीट मळून घ्या. त्यात मीठ, साखर, जिरे, लिंबू रस, तिखट घाला. किसलेले आले आणि बटाटा घालून परत मिश्रण नीट एकत्र करून सारख्या आकाराचे गोळे करून घ्या.
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा आणि एकीकडे प्लॅस्टिक पेपरवर वडे थापुन घ्या. वडे खूप पातळ किंवा खूप जाड नकोत. सगळे वडे तळून घ्या.

नारळाची चटणी, दाण्याची चटणी किंवा दहया बरोबर खायला द्या.

टीप: कच्चा बटाटा घातल्याने वडे जास्त कुरकुरीत होतात.
वडे थापताना पाणी अजिबात वापरू नये, त्याने वडे लगेच नरम पडतात.


Rava Ladu/Ladoo / रवा लाडू




Rava Ladu/Ladoo –My Magic

There is no any festival in India, when we don’t prepare any sweet thing. So, here comes a simple yet tasty recipe. Rava ladu/Rava Ladoo.

Ingredients:  

Fine Semolina- 1 kg., fresh scrapped coconuts 2, sugar  a little less than 1 kg, water for preparing sugar syrup, 3 teaspoon green cardamom powder, fistful of raisins, clarified butter/ghee 300 gms.

Method: 

Heat clarified butter in a kadhai. Add semolina. Slowly roast the semolina on slow flame. It takes time. But if you roast it on high flame, the semolina remains raw from inside. So, take out time and then prepare this recipe.  When semolina starts changing colour slightly, add scrapped coconut also in the same kadhai and roast both on slow flame. In a big pan take sugar and add water just to soak the sugar. On second burner, put this pan for making sugar syrup. When the sugar dissolves and makes a one string consistency, add cardamom powder and add roasted semolina and coconut mixture in this syrup. Put the flame off. Mix well and keep this pan covered for 2-3 hours. After that make ladus/laddoos of this mixture. While making the ladus/laddoos, put one raisin on each laddoo or you can mix the raisins in the mixture only.

Delicious rava ladu/laddoos are ready. Enjoy



रवा लाडू – माय मॅजिक

गोडाधोडाचं करायला आपल्याला काही सणच हवा असाही नाही. हो ना? तर ही घ्या रवा लाडू ची सोपी कृती.

साहित्य: 

1 किलो बारीक रवा, 2 खोवलेले नारळ, 1 किलो पेक्षा थोडी कमी साखर, साखर बुडेल इतकं पाणी, 3 टीसपून वेलदोडा पूड, मूठभर बेदाणे, साजूक तूप 300 ग्राम्स.

कृती:

एका कढईत तूप तापत ठेवा. ते तापल की त्यात रवा घालून अगदी मंदाग्नी वर भाजावा. याला खूप वेळ लागतो पण जर आच जास्त ठेवली तर रवा आतून कच्चा रहातो. रवा गुलबट रंगाचा होत आला की त्यात खोवलेले नारळ घालून सतत परतत रहावे. दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात साखर आणि ती बुडेल इतक पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालून रवा आणि नारळ घाला. गॅस बंद करून मिक्स करा.2-3 तास हे मिश्रण तसेच झाकून ठेवा.  नंतर लाडू करताना प्रत्येक लाडूवर एकेक बेदाणा लावा किंवा मिश्रणातच सगळे बेदाणे घाला.

चविष्ट रवा लाडू तयार आहेत.    

Adai doda/अडा डोसा



Adai Dosa: My Magic

Ingredients:

1.   For Dosa: 1 Cup each of Chickpeas, black gram, yellow lentil, 3 cups rice, 1 teaspoon fenugreek seeds, 1 nicely chopped onion, 4  red chilies, half cup nicely chopped coriander, 1 pinch each turmeric powder and asafetida, salt as per taste, oil for making dosa.
2.   For chutney: 2 medium onions, 3 ripe tomatoes, fistful curry leaves, each one teaspoon of black gram and chickpeas, 7-8 red chilies, a pinch of sugar, salt as per taste.  Oil, mustard seeds and asafetida for tempering.

Method:

1.For Dosa: Soak all the grains and rice separately for 5 hours. Soak fenugreek seeds alongwith rice. After 5 hours, make a fine paste of these grains with red chilies. Add asafetida, turmeric powder, finely chopped onion and coriander in it and keep the batter ready. For this dosa, there is no any need to ferment this. You can prepare this immediately. This dosa is not as crispy as our normal dosa. Its like our besan chilla. Heat one tava, brush oil on it and spread 2-3 tablespoons of batter like dosa. After 2 minutes, flip it and let it cook from the other side also. Adai dosa is ready.

2. For chutney:  You can take any chutney you like with this dosa. But I have made this chutney. Its just amazing in taste. For this, dry roast both the grains. Put aside. Heat some oil in kadhai and add red chilies, curry leaves, chopped onion, tomatoes, one by one. Mix salt and a pinch of sugar. When cools down, make chutney in mixer. For tempering heat 1 teaspoon oil and add mustard seeds, asafetida and mix it in chutney. Awesome chutney is ready.

Note: Evenif, it is stated that its not necessary to ferment this batter, my personal experience is that, when you rest the batter for atleast 3-4 hours, the adai dosa comes out to be very nice and tastes better.  



अडा डोसा : माय मॅजिक:

साहित्य :

1.   डोशासाठी: प्रत्येकी 1 वाटी हरभरा, तूर आणि उडीद डाळ, 3 वाट्या तांदूळ, 1 टीस्पून मेथीदाणे, 1 कांदा, 4 लाल मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चिमूट हिंग, 1 चिमूट हळद, चवीप्रमाणे मीठ. डोसा करण्यासाठी तेल.
2.   चटणीसाठी : 2 मध्यम कांदे, 3 पिकलेले मध्यम आकाराचे टोमॅटो, मूठभर कढीलिंबाची पाने, प्रत्येकी 1 चमचा उडीद आणि हरभरा डाळ, 7-8 लाल मिरच्या, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ. फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग.   

कृती:

1.   डोसा: क्र.1 मध्ये दिलेल्या सर्व डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावेत. तांदूळ भिजवताना त्यातच मेथीदाणेही घालावेत. 5 तासांनी हे सगळे उपसून त्यातच लाल मिरच्या घालून बारीक वाटून एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. मग या मिश्रणात कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घालावे, हिंग, हळद घालून पीठ तयार करावे. अडा डोसा आपल्या धिरडे किंवा घावन यासारखा असतो. डोशासारखा अगदी पातळ नसतो. आणि हे पीठ आंबवायचीही गरज नसते.
      त्यामुळे तवा नीट तापला की तेल सोडून एक डावभर पीठ त्यावर सोडून थोडेसे जाडसर पसरावे.     एका बाजूने अडा डोसा झाला की दुसर्‍या बाजूनेही छान भाजून घ्यावा. डोसा तयार आहे.
2.   चटणी : तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही चटणी घेऊ शकता. पण मी ही चटणी केली. ती  या डोशाबरोबर सुंदर लागते. यासाठी क्र. 2 मध्ये दिलेल्या दोन्ही डाळी कोरड्या भाजून घ्याव्या. थोडे तेल तापवून त्यात मिरच्या, कढीलिंबाची पाने, चिरलेले कांदे, टोमॅटो असे क्रमाक्रमाने परतून घ्यावे. हे सारे थंड झाले की मिक्सर मधून काढावे. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालावी. नंतर एका कढल्यात तेल तापवून त्यात मोहरी आणि हिंग घालून ही फोडणी वरुन  चटणीत घालावी.
सुंदर अडा डोसा आणि चटणी च आस्वाद घ्या.

टीप: हे पीठ आंबवायची गरज नाही हे खरे असले तरीही 3-4 तास ठेवले तर याचा अडा डोसा आणखी उत्कृष्ट आणि जाळीदार होतो हा वैयक्तिक अनुभव आहे.

Friday, 17 July 2020

Bhajanee Vada-Mix Flour vade /भाजणीचे वडे



Mix Flour Vade-Bhajani Vade: My Magic

Recipe for : 4 people

Ingredients: 

250 grams thalipeeth bhajani, half teaspoon each of carom seeds,cumin seeds and asafetida, 2 teaspoon red chili powder or according to taste, 1 teaspoon sesame seeds, salt as per taste, water for kneading dough , oil for deep frying.

Method: 

Mix well all the ingredients except water and oil. Heat water (approximately same as the flour). With the help of hot water knead the dough and cover it for 30 minutes.
After thirty minutes, Heat oil in a kadhai for deep frying. Take one lemon sized ball from the dough and prepare a vada by patting it on a plastic paper with the help of water if necessary. Put a hole in centre of vada so that it will fry nicely.  Now fry this vada on medium flame. Prepare all the vadas in the same manner.
Serve these super crispy vadas with fresh curd.

Note: For preparing Bhajani: (Bhajani is a flour of mix grains and some spices. )
I have taken each 1 cup of rice and wheat, half cup each of jowar and chickpeas,  one fourth cup each of green gram and black gram, 1 teblespoon cumin seeds, one fourth cup of coriander seeds, 1 teaspoon of fenugreek seeds, 1  teaspoon of carom seeds. Dry roast each grain separately on medium flame. Dry roast cumin, coriander seeds, after putting off the gas flame, add fenugreek seeds and carom seeds in the same kadhai. Mix all the ingredients and get it powdered from the flour mill. Use as and when necessary. Its shelf life is 4-6 months also. You can prepare thalipeeth, vade from this flour.



भाजणीचे वडे: माय मॅजिक:

साहित्य: 

250 ग्रॅम थालीपीठाची भाजणी, प्रत्येकी अर्धा टीस्पून ओवा आणि जिरे , अर्धा टीस्पून हिंग, 2 टीस्पून किंवा चवीनुसार तिखट, 1 टीस्पून तीळ, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्याकरता पाणी, तळण्यासाठी तेल.

कृती:  

पहिल्यांदा भाजणीत पाणी आणि तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळून घ्यावे. नंतर साधारण भाजणी एवढच पाणी गरम करून त्याच्या सहाय्याने हे वड्यांच पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. व्यवस्थित थापता येईल इतपत पीठ घट्ट असावे. जर लागले तर आणखी गरम पाणी घेता येईल. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासाने कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. मळलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोला घेऊन एका प्लॅस्टिक पेपरवर वडा थापा. वड्याला मध्ये भोक पाडून गरम तेलात मंद आचेवर खुसखुशीत तळा. याच पद्धतीने सर्व वडे करून घ्या.
खायला देताना दहयाबरोबर द्या.
अतिशय सोपे असे हे वडे खूप खमंग लागतात.

टीप: भाजणी तयार करताना मी प्रत्येकी 1 कप गहू आणि तांदूळ, प्रत्येकी अर्धा कप ज्वारी आणि चणा/हरभरा डाळ, प्रत्येकी पाव कप मूग आणि उडीद डाळ, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टेबलस्पून जिरे, पाव कप धने, थोडासा ओवा  असे प्रमाण घेतले आहे. प्रत्येक धान्य वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घेतले, त्यात धने, जिरे भाजून घातले. नंतर धान्य भाजलेल्या कढईतच गॅस बंद करून मेथी आणि ओवा घातला. हे सगळे थंड झाल्यावर दळून आणले. ही भाजणी थालीपीठ, वडे यांसाठी वापरता येते.
   

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...