Saturday 18 July 2020

Adai doda/अडा डोसा



Adai Dosa: My Magic

Ingredients:

1.   For Dosa: 1 Cup each of Chickpeas, black gram, yellow lentil, 3 cups rice, 1 teaspoon fenugreek seeds, 1 nicely chopped onion, 4  red chilies, half cup nicely chopped coriander, 1 pinch each turmeric powder and asafetida, salt as per taste, oil for making dosa.
2.   For chutney: 2 medium onions, 3 ripe tomatoes, fistful curry leaves, each one teaspoon of black gram and chickpeas, 7-8 red chilies, a pinch of sugar, salt as per taste.  Oil, mustard seeds and asafetida for tempering.

Method:

1.For Dosa: Soak all the grains and rice separately for 5 hours. Soak fenugreek seeds alongwith rice. After 5 hours, make a fine paste of these grains with red chilies. Add asafetida, turmeric powder, finely chopped onion and coriander in it and keep the batter ready. For this dosa, there is no any need to ferment this. You can prepare this immediately. This dosa is not as crispy as our normal dosa. Its like our besan chilla. Heat one tava, brush oil on it and spread 2-3 tablespoons of batter like dosa. After 2 minutes, flip it and let it cook from the other side also. Adai dosa is ready.

2. For chutney:  You can take any chutney you like with this dosa. But I have made this chutney. Its just amazing in taste. For this, dry roast both the grains. Put aside. Heat some oil in kadhai and add red chilies, curry leaves, chopped onion, tomatoes, one by one. Mix salt and a pinch of sugar. When cools down, make chutney in mixer. For tempering heat 1 teaspoon oil and add mustard seeds, asafetida and mix it in chutney. Awesome chutney is ready.

Note: Evenif, it is stated that its not necessary to ferment this batter, my personal experience is that, when you rest the batter for atleast 3-4 hours, the adai dosa comes out to be very nice and tastes better.  



अडा डोसा : माय मॅजिक:

साहित्य :

1.   डोशासाठी: प्रत्येकी 1 वाटी हरभरा, तूर आणि उडीद डाळ, 3 वाट्या तांदूळ, 1 टीस्पून मेथीदाणे, 1 कांदा, 4 लाल मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चिमूट हिंग, 1 चिमूट हळद, चवीप्रमाणे मीठ. डोसा करण्यासाठी तेल.
2.   चटणीसाठी : 2 मध्यम कांदे, 3 पिकलेले मध्यम आकाराचे टोमॅटो, मूठभर कढीलिंबाची पाने, प्रत्येकी 1 चमचा उडीद आणि हरभरा डाळ, 7-8 लाल मिरच्या, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ. फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग.   

कृती:

1.   डोसा: क्र.1 मध्ये दिलेल्या सर्व डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावेत. तांदूळ भिजवताना त्यातच मेथीदाणेही घालावेत. 5 तासांनी हे सगळे उपसून त्यातच लाल मिरच्या घालून बारीक वाटून एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. मग या मिश्रणात कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घालावे, हिंग, हळद घालून पीठ तयार करावे. अडा डोसा आपल्या धिरडे किंवा घावन यासारखा असतो. डोशासारखा अगदी पातळ नसतो. आणि हे पीठ आंबवायचीही गरज नसते.
      त्यामुळे तवा नीट तापला की तेल सोडून एक डावभर पीठ त्यावर सोडून थोडेसे जाडसर पसरावे.     एका बाजूने अडा डोसा झाला की दुसर्‍या बाजूनेही छान भाजून घ्यावा. डोसा तयार आहे.
2.   चटणी : तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही चटणी घेऊ शकता. पण मी ही चटणी केली. ती  या डोशाबरोबर सुंदर लागते. यासाठी क्र. 2 मध्ये दिलेल्या दोन्ही डाळी कोरड्या भाजून घ्याव्या. थोडे तेल तापवून त्यात मिरच्या, कढीलिंबाची पाने, चिरलेले कांदे, टोमॅटो असे क्रमाक्रमाने परतून घ्यावे. हे सारे थंड झाले की मिक्सर मधून काढावे. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालावी. नंतर एका कढल्यात तेल तापवून त्यात मोहरी आणि हिंग घालून ही फोडणी वरुन  चटणीत घालावी.
सुंदर अडा डोसा आणि चटणी च आस्वाद घ्या.

टीप: हे पीठ आंबवायची गरज नाही हे खरे असले तरीही 3-4 तास ठेवले तर याचा अडा डोसा आणखी उत्कृष्ट आणि जाळीदार होतो हा वैयक्तिक अनुभव आहे.

1 comment:

  1. This post has been published by me on 18.07.20 @ 9:45 a.m.

    ReplyDelete

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...