Paneer Tikka
Masala- My Magic
Recipe for : 4
people
Ingredients:
250
grams cottage cheese, 2 big onions, 2 big tomatoes, 1 green bell pepper, 10 cashew
nuts, 1 teaspoon ginger-garlic paste, 1 teaspoon garam masala, ½ teaspoon red
chili powder, ½ teaspoon turmeric powder, ½ teaspoon chaat masala, 1/52 teaspoon cumin
seeds-coriander powder, ½ teaspoon kasoori methi, ½ cup hung curd, ½ cup full
cream, 2 tablespoon butter+cooking oil, salt as per taste, a pinch of sugar,
finely chopped coriander for garnishing.
Method:
Make cubes of
paneer (cottage cheese) and just stir fry in a little butter. Keep aside.
Make fine paste
of one onion and one tomato separately. Make square pieces of remaining 1
onion, tomato and green bell pepper.
Now mix hung
curd, garam masala, chili powder, cumin-coriander seeds powder, chaat masala,
turmeric powder, sugar properly and marinate paneer cubes in this for ½ hour.
In a pan heat
oil+butter. When heated, add ginger garlic paste.When it’s done, add onion
paste and when it’s done, add tomato paste. Add pieces of onion only. When this
mixture starts separating oil, add paneer pieces and the spice mixture. Sauté it
for 2 minutes. Add water as required. Make fine paste of cashew nuts in it. Add
pieces of green bell pepper and tomato. Let this comes to boil. Now add kasoori
methi and full cream. Add salt as per taste. Boil for 2 minutes more.
The tasty Paneer
Tikka Masala is ready. Serve after garnishing with fresh coriander. Tastes very
good with naan or paratha.
पनीर टिक्का
मसाला: माय मॅजिक
पाककृती: ४
व्यक्तिंसाठी
साहित्यः
२५० ग्रॅम
पनीर, २ मोठे कांदे, २ मोठे टोमॅटो, १ ढोबळी
मिरची, १० काजू, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, १ टीस्पून
गरम मसाला, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून
चाट मसाला,१/२ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून कसूरी मेथी, १/२ कप चक्का, १/२ कप साय, २ टेबलस्पून बटर आणि तेल, चवीपुरतं
मीठ, किंचित साखर, सजावटीसाठी
कोथिंबीर
कृती:
पनीर चे
चौकोनी आकारात काप करुन ते थोड्याशा बटर मध्ये परतून बाजूला काढा.
१ मोठा कांदा आणि १
टोमॅटो यांची मिक्सर मधून बारीक पण वेगवेगळी पेस्ट करून घ्या. १ कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची यांचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या.
चक्का, गरम मसाला, तिखट, धने-जिरे पावडर, चाट मसाला, हळद, साखर हे
सगळं एकत्र करुन त्यात हे पनीरचे तुकडे घालून सगळं एकत्र करा.
एका पॅन मध्ये
तेल+बटर तापत ठेवा. तापले की त्यात आलं लसूण पेस्ट घाला. ती परतली गेली की
कांद्याची पेस्ट, टोमॅटो ची पेस्ट घालून चांगलं परता. कांद्याचे तुकडे
घाला. परता. त्यात हे
पनीरचे तुकडे आणि सगळा मसाला घाला. एक -दोन मिनिट परतून त्यात हवं तेवढं पाणी
घाला. काजूची अगदी बारीक पेस्ट करून ती यात घाला. आता ढोबळी मिरची आणि टोमॅटो चे
तुकडे घालून एक उकळी आणा. कसूरी मेथी थोडिशी चुरून घाला. साय फेटून घाला आणि आणखी
२ मिनिटे उकळा.
अतिशय स्वादिष्ट असा पनीर टिक्का मसाला तयार आहे. वाढताना
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढा. पराठा, नान बरोबर
मस्तच लागतो.