Sunday, 19 November 2017

Stuffed Brinjal / भरली वांगी







Stuffed Brinjal : My Magic
This is a famous, mouth-watering  Maharashtrian dish.

Recipe for : 4 people

Ingredients:

Green brinjals (those having thorns) – 250 grams, ½ cup grated dry coconut, 1 tablespoon besan, ½ cup roasted peanut powder, 2 teaspoon red chilli powder, 2 teaspoon goda masala, 2 small onions, 6-7 garlic cloves, ½ inch ginger piece, ½ teaspoon aamchur powder (dry mango powder), ½ teaspoon sugar, salt as per taste. (You can adjust red chilli powder as per taste)
For tempering: oil, mustard seeds, asafoetida, and turmeric powder.
For garnishing – chopped coriander leaves.

Method:

Dry roast grated dry coconut and besan till it gets a nice aroma. Now grind these two with red chilli powder, goda masala, aamchur powder, sugar, salt to a fine powder. Add roasted peanut powder in it. Finely chop onions and ginger garlic.
Cut the brinjals till the end in + shape. But don’t cut till the end. Let the stem be there. Stuff the brinjals in the cut with the masala .
Now heat oil in kadhai  and add mustard seeds. When it splutters, add asafetida and turmeric powder in it. Add onion, ginger, garlic and sauté it. When it is done, add stuffed brinjals and the remaining masala. Add some water. Cover the kadhai and add water in that covered thali so that the vegetable will not stick at the bottom of the kadhai. Steam for 10 minutes. The stuffed brinjal subji is ready. Garnish it with chopped coriander leaves.
Have it with hot bhakri, pickle and enjoy the winter season.
Note: This vegetable is spicy and hot. This requires more oil than we use for other vegetables. That way only, it is enjoyed.



भरली वांगी:
ही एक अतिशय प्रसिद्ध अशी महाराष्टीयन पद्धतीची भाजी आहे.

वाढणी: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 
काटेरी हिरवी वांगी- २५० ग्रॅम, १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, १ टेबलस्पून बेसन, १/४ वाटी शेंगदाणा कूट, २ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून गोडा मसाला, २ छोटे कांदे, ६-७ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून साखर, चवीनुसार मीठ (तिखट आपापल्या आवडीनुसार कमी-जास्त करु शकतो.)
फोडणीसाठी - नेहमीपेक्षा जास्त तेल, मोहरी, हिंग, हळद.
सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

पहिल्यांदा किसलेले सुके खोबरे आणि बेसन कोरडेच खमंग भाजून घ्या. आता खोबरे, बेसन, तिखट, मसाला, आमचूर पावडर, साखर आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्या.  कांदे आणि आलं लसूण बारीक चिरून घ्या.

वांगी देठासकट घ्या आणि वरून खालपर्यंत  + अशी चिर देउन कापा. अगदी शेवटपर्यंत कापायची नाहीत. या वांग्यांमध्ये तयार केलेला मसाला घट्ट भरा.

आता एका कढईत नेहमीपेक्षा जास्त तेलाची फोडणी करा. त्यात कांदे, आलं लसूण परतून घ्या. त्यात ही वांगी घाला. उरलेला मसाला घाला आणि थोडेसे पाणी घाला. कढईवर झाकण ठेवून त्यात पाणी घाला म्हणजे भाजी खाली लागणार नाही. १० मिनिटांत भाजी शिजेल.
वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढा.

गरमागरम भाकरी, लोणच्याबरोबर या भरल्या वांग्यांच्या आस्वाद घ्या.

Sev-potato-dahi-puree / शेव बटाटा दही पुरी





Sev-potato-dahi-puree – My Magic

It is a famous Indian chaat recipe

Ingredients:

1.Panipuri puffs(purees) as required
2. Boiled potatoes -5
3. Tamarind ½ cup, deseeded dates 10-12 soaked in luck warm water for half an hour, 1 tablespoon jiggery finely chopped, 1 teaspoon cumin seeds-coriander powder, ½ teaspoon red chilli powder, salt as per taste.
3. Bunchful of coriander and mint leaves, 4-5 green chillies, ½ inch piece of ginger, salt as per taste, 1 pinch sugar.
4.thick curd-2 cups, whisked with a little salt and sugar
5. zero no. (very thin) sev – generous
6.onion , tomato each 1 finely chopped and coriander leaves generous amount-finely chopped.
7. red chilli powder and chaat masala as per taste.


Method:

1.       Grind tamarind and dates in a fine paste and sieve through a strainer. Add red chilli powder, coriander cumin powder, jiggery, salt and boil for 5 minutes. Let it cool. It should be thick pulp.
2.       Make chutney of coriander and mint leaves with ginger , chillies and salt.
3.       Mash potatoes./chop finely.
Now just crack the panipuri puries on top and stuff the mashed potatoes, onion, tomato in each puri. Add tamarind pulp, green chutney and curd on each puri. Add a generous amount of sev and coriander on it. Add chilli powder and chaat masala as per taste.
Enjoy…



शेव बटाटा दही पुरी: माय मॅजिक
हा एक सगळ्यांना अतिशय आवडणारा चाट प्रकार आहे,

साहित्यः

१. पाणीपुरीसाठी लागणार्‍या पुर्‍या
२.उकडलेले बटाटे-५
२. चिंच १/२ कप, बिया काढलेले खजूर १०-१२, (अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून) गूळ १ टेबलस्पून  बारीक चिरून, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १/२ टीस्पून तिखट, मीठ
३. पुदिना आणि कोथिंबीर प्रत्येकी मूठभर, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ इंच आल्याचा तुकडामीठ चवीनुसार, किंचित साखर
४. दही- २ कप, घट्ट. थोडेसे मीठ आणि साखर घालून फेटून घेतलेले.
५. भरपूर बारीक शेव (झिरो नंबर्/नायलॉन शेव म्हणून बाजारत मिळते)
६. १ कांदा, १ टोमॅटो, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून.
७. लाल तिखट पावडर आणि चाट मसाला आवडी नुसार.

कृती:

१. चिंच, खजूर मिक्सरमधून थोड्या पाण्याच्या सहाय्याने अगदी बारीक वाटून घ्यावेत. ही पेस्ट एका गाळणीतून गाळून घेउन एका पातेल्यात घालावी.त्यात धने-जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेला गूळ घालून एक उकळी आणावी. हे चिंचेचे पाणी थंड करत ठेवावे.
२. पुदीना, कोथिंबीर, मिरच्या, आलं, मीठ, साखर यांची चटणी करून घ्यावी.
३. बटाटे कुस्करून्/ त्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

आता एका डीशमध्ये पुर्‍या वरून फोडून ठेवाव्यात. त्यात उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी भराव्यात. कांदा, टोमॅटो भरावा. त्यावर हिरवी चटणी, दही, चिंचेचे घट्ट पाणी घालावे.  वरून भरपूर शेव, कोथिंबीर घालावी, आवडीनुसार चाट मसाला आणि तिखट घालावे.
फन्ना उडविण्यासाठी तयार आहे एस-पी- डी-पी अर्थात शेव बटाटा दही पुरी




Methi-Paneer Stuff Paratha (Fenugreek-cottage cheese stuff paratha) / मेथी-पनीर स्ट्फ पराठा




Methi-Paneer Stuff Paratha (Fenugreek-cottage cheese stuff paratha) My Magic

Recipe for : 3-4 people

Ingredients:

1.       Whole wheat flour-2 cups, 1/2 cup besan (chickpea flour), 2 teaspoon oil, turmeric powder and asafoetida  ¼ teaspoon each, salt as per taste and water to knead the dough.
2.       For stuffing: 2 bunched of fresh fenugreek –cleaned and chopped finely,  100 grams paneer (cottage cheese). 2 inch piece of ginger, a bulb of garlic, 4 green chillies, garam masala 2 teaspoon, salt as per taste, besan as required (I have used ¾ cup)
3.       For tempering: oil, cumin seeds, asafoetida, turmeric powder
4.       Butter for roasting paratha
5.       Grated cheese for garnishing as per taste


Method:

Refer to No. 1 above. Take whole wheat flour, besan, oil, salt, asafoetida, turmeric powder and knead a regular dough and cover it for an hour.

dough and stuffing


Stuffing:

Make a course paste of ginger, garlic and green chillies.
Now in a pan heat oil and add cumin seeds, asafoetida and turmeric powder in it. Add fenugreek leaves finely chopped. Mix well and cover the pan for a minute. Don’t use water at all. Now add grated cottage cheese (paneer) in it. Steam it again. Add Garam masala and salt. Add besan so that the vegetable will be fully dry. Let it cool.
Now take a normal ball out of the dough and stuff the equal quantity of stuffing in it.
Roll a regular paratha and roast on a hot griddle on medium heat . While roasting, use butter so that it will give a very nice aroma to the paratha.
Serve hot with grated cheese as per taste and with pickle/chutney/sauce.
Enjoy.




मेथी-पनीर स्ट्फ पराठा: माय मॅजिक

वाढणी: ३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्यः

१. कणीक - २ वाटी, १/२ वाटी बेसन,२ टीस्पून तेल, हळद आणि हिंग प्रत्येकी १/४ टीस्पून, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार.
२. सारणासाठी:  २ जुड्या मेथी निवडून , धुवून, बारीक चिरून, पनीर १०० ग्रॅम, आल्याचा २ इंचाचा तुकडा, १ गड्डा लसूण, ४ हिरव्या मिरच्या, गरम मसाला २ टीस्पून, मीठ चवीनुसार, डाळीचे पीठ (बेसन) आवश्यकतेनुसार.
३. फोडणीसाठी:- तेल, जिरे, हिंग, हळद.
३. पराठा भाजण्यासाठी बटर
४ सजावटीसाठी चीज किसून आवडीनुसार.

कृती: क्र.१  मध्ये लिहिल्याप्रमाणे कणीक आणि बेसन एकत्र करून त्यात हळद, हिंग, मीठ, तेल घालून नेहमीप्रमाणे कणीक मळून एक तासभर झाकून ठेवून द्यावी.

कणिक आणि सारण

सारणः

पहिल्यांदा आलं-लसूण आणि हिरव्या मिरच्या थोडे मीठ घालून वाटून घ्याव्यात.
नंतर एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद घालून नेहमीप्रमाणे फोडणी करावी. त्यात हे वाटण चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मेथी घालून एक वाफ काढावी. पाणी अजिबात घालू नये. मेथी शिजत आली की त्यात पनीर किसून घालावे आणि परत एक वाफ काढावी. त्यात गरम मसाला आणि मीठ घालून परतावे. ही भाजी ओलसर दिसेल. तेव्हा आवश्यकतेनुसात डाळीचे पीठ घालून परत एक वाफ काढावी आणि भाजी थंड होण्यास ठेवावी. (मला  पाउण वाटी बेसन लागले होते) भाजी कोरडी व्हायला हवी.

आता कणकेचा नेहमीच्या पोळीसाठी घेतो तेवढा उंडा घेउन त्यात तेवढेच सारण भरावे. नेहमीप्रमाणे पराठा लाटावा आणि भाजताना तो दोन्ही बाजूंनी बटर सोडून मध्यम आचेवर खरपूस भाजावा.


वाढताना त्यावर आवडीप्रमाणे चीज किसून घालावे आणि  लोणचे/ चटणी/टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम खाण्यास द्यावेत.

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...