Sabudana Vada – My Magic
Ingredients:
250 grams sago/sabudana soaked overnight, so
that it almost doubles in size and can be easily mashed with fingers also, half
cup roughly powdered roasted peanuts,2 medium boiled potatoes,1 medium raw potato-grated,
1 inch ginger –grated, 2 teaspoon red chili powder, 1 teaspoon cumin seeds, 1
teaspoon sugar, juice of one lemon, salt as per taste, oil for deep frying.
Method:
Take sago/sabudana in a mixing bowl. Add roasted peanut powder, boiled potatoes and
mash it properly. Add salt, sugar, cumin seeds, lemon juice, chili powder and
mix it. Add grated ginger and grated potato to the mixture. Make even sized
balls of this mixture.
Heat oil in a kadhai. On plastic paper, with the help of
palm and fingers, pat the ball and prepare vadas. The vadas should not be too
thin or too thick. Deep fry all the vadas.
Serve it with coconut chutney, peanut chutney or simple
curd.
Note: Adding raw potato makes the vadas more crispy.
Don’t use water while preparing the vadas, as they don’t remain crispy.
साबुदाणा वडा - माय मॅजिक
साहित्य:
250 ग्राम साबुदाणा, रात्रभर पाण्यात भिजवून. म्हणजे
तो दुप्पट होईल. अर्धा कप शेंगदाण्याचे अर्धबोबडे कूट, 2 मध्यम
आकाराचे उकडलेले बटाटे, 1 कच्चा बटाटा किसून, 1 पेर भर आल्याचा तुकडा किसून, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून साखर, 1 लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती:
एका बोल मध्ये साबुदाणा, शेंगदाणा
कूट, उकडलेले बटाटे घालून नीट मळून घ्या. त्यात मीठ, साखर, जिरे, लिंबू रस, तिखट घाला. किसलेले आले आणि बटाटा घालून परत मिश्रण नीट एकत्र करून सारख्या
आकाराचे गोळे करून घ्या.
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा आणि एकीकडे प्लॅस्टिक पेपरवर वडे थापुन
घ्या. वडे खूप पातळ किंवा खूप जाड नकोत. सगळे वडे तळून घ्या.
नारळाची चटणी, दाण्याची
चटणी किंवा दहया बरोबर खायला द्या.
टीप: कच्चा बटाटा घातल्याने वडे जास्त कुरकुरीत होतात.
वडे थापताना पाणी अजिबात वापरू नये, त्याने
वडे लगेच नरम पडतात.