Thursday, 8 February 2018

Rajma Masala / राजमा मसाला






Rajma Masala (kidney Beans) - My Magic

Rajma Masala is a very popular Punjabi cuisine. If you are taking it with rice, then you will not require any accompanies.

Recipe for - 4 people

Ingredients: 

1 cup rajma (kidney beans), 1 big onion, 3 tomatoes, 1 teaspoon cumin-coriandar seeds powder, 1.5 teaspoon red chilli powder, 1/2 teaspoon each -ginger garlic paste, garam masala, kasoori methi, turmeric powder, cumin seeds, 1 pinch asafoetida, salt as per taste, for tempering 1/2 tablespoon butter and 1/2 tablespoon oil. for garnishing, finely chopped coriander leaves.

Method: 

Soak Rajma overnight after proper washing in 4 cups of water. Cook till 4 whistles the next morning. The beans should be separate but tender. 
Cut onions and tomatoes finely. Heat oil and butter together in a pan. Add cumin seeds. When it splutters, add asafoetida and turmeric powder. . Add chopped Onion and saute till golden brown. Don’t overdo the onions otherwise the Rajma masala will taste bitter. Now add ginger garlic paste and saute till the raw smell goes off. Now add tomatoes and all spices one by one. Add red chili powder. Mix well and add the cooked Rajma in it. Add salt and kasoori methi. Serve after garnishing with chopped coriander. Serve this with paratha, naan or rice. It tastes heavenly.
 



राजमा मसाला- माय मॅजिक

ही एक अतिशय लोकप्रिय अशी पंजाबी पाककृती आहे. राजमा चावल म्हटलं की खरं तर तोंडी लावायला इतर काही घ्यायची जरूर ही नसते.

पाककृती: ४ व्यक्तींसाठी

साहित्यः 
१ कप राजमा, १ मोठा कांदा, ३ टोमॅटो, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १.५टीस्पून लाल तिखट, प्रत्येकी १/२ टीस्पून आलं लसूण पेस्टगरम मसाला, कसूरी मेथीहळद, जिरे, एक चिमूट्भर हिंग, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी १/२टेबलस्पून बटर आणि १/२ टेबलस्पून तेल.सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती: 

रात्री राजमा २ वेळा धुवून ४ कप पाण्यात भिजत घाला. सकाळी याच पाण्यासकट कुकरमध्ये ४ शिट्ट्या होइतो मउ शिजवून घ्या. दाणे वेगळे पण व्यवस्थित शिजलेले हवे. कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबेर चिरून बाजूला ठेवा.

एका भांड्यात तेल आणि बटर एकत्र करून तापवा. त्यात जिरे घालून ते तडतडले की हिंग, आणि हळद घाला. बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. खूप परतलं तर राजमा कडू लागतो. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईतो परता. आता टोमॅटो घालून परता आणि सगळे मसाले, लाल तिखट घाला. हा मसाला व्यवस्थित ढवळून त्यात शिजलेला राजमा घाला. चवीनुसार मीठ आणि कसूरी मेथी घाला. वाढताना चिरलेली कोथिंबीर घालून द्या. पराठा, नान किवा भाताबरोबर हा राजमा मसाला खूप छान लागतो.



Saturday, 3 February 2018

Banarasi Nimona / बनारसी निमोना :



Banarasi Nimona - My Magic
Recipe For: 4-5 people
Ingredients:
1/2 kg green peas, 1 bay leaf, each two cloves, black pepper corns,green cordamoms,  1 green chili, 1/4 inch ginger piece, 1/4 teaspoon cumin seeds-coriander powder,  cumin seeds and asafoetida for tempering, clarified butter (desi ghee.) Don't use oil. It doesn't taste good, salt as per taste.
Method:
make course  paste of green peas, ginger, green chili  .
Now heat ghee(clarified butter) and add cumin seeds and asafoetida. Add bay leaf, pepper corns, green cordamoms and add the green peas paste. Saute for a minute. Add cumin seeds-coriander powder, water and salt as per taste. This vegetable is not too thick or thin. But its extremely taste. 
Serve hot only. Otherwise it won't taste that good.
Serve with puri or roti. 

बनारसी निमोना : माय मॅजिक
पाककृती: ४-५ व्यक्तींसाठी
साहित्यः-
 अर्धा  किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको), चवीपुरत मीठ.
कृती: 

अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही. पुरी किंवा पोळी, भात कशाबरोबरही वाढा.

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...