Thursday, 27 December 2018

Cheesy Mirchi vada/ Mat-Lahariya Samosa - चीझी मिरची वडा/चीझी मॅट /लहरिया सामोसा


Friends, I am giving below two recipes that can be made with the same stuffing. One is Cheesy Mirchi Vada and the other is Mat Samosa/Lahariya Samosa.
Let’s see the stuffing first.

Ingredients for stuffing: Each one of onion, capsicum, tomato, 50 grams sweet corn, 8-10 pods of Garlic, 2 green chilies, 2 inch square piece of cottage cheese (paneer), Cheese as you like, oregano, salt and chili flacks as per taste.

1.       Cheesy Mirchi Vada-My Magic



Mirchi Vada is very famous for its Mirchi Vada. I have Prepared Mirchi Vada using different stuffing to have a great new experience.
Ingredients: Bhavnagari Chilies- ¼ kg.,  all-purpose flour (maida ) – tablespoon, water and salt  as required, bread crumbs, stuffing as I have mentioned over- as required and oil for deep frying.
Method: Clean Bhavnagari Chilies but keep the steams. Chop all the vegetables finely, while cutting the tomato, avoid its seeds and pulp.


Ingredients

Now take a teaspoon oil in a fry pan. Add garlic, onion and chilies in it. Fry it. It’s not at all necessary that the onions should be golden brown. Fry till it gets soft and translucent. Add Sweet corn and capsicum. Saute it and add oregano and chili flacks. Add salt as per taste. Let the mixture cool down completely. Then add grated cheese, paneer and tomato.
Add water in all-purpose flour to make a thick paste. Add a pinch of salt and chili flacks in it.

Ready stuffing

Now heat oil in a kadhai. While the oil is being heated, stuff this mixture tightly in every bhavnagari chili.

stuffed chilies

 Dip this stuffed chili in the maida paste and then dip in bread crumbs. Repeat again as this chili is very smooth from outside and it becomes somewhat difficult to apply the paste and bread crumbs on it properly. Now deep fry all the chilies in the same way.
Nice cheesy mirchi vada is ready to serve.

mirchi vada

You can serve these vadas with tomato ketchup.


2.       Cheesy Mat Samosa/ Cheesy Lahariya Samosa-My Magic



Ingredients: 200 grams All-purpose flour (Maida), 2 tablespoon oil, 1 pinch of carom seeds and salt each, water as required.

Method: Heat 2 tablespoon of oil and add it to maida. Add salt and carom seeds. Mix with the help of spoon as this mixture becomes very hot. Mix properly to obtain a coarse texture of maida. Now add sufficient water to form a semi soft dough and keep it covered for half an hour.
Make a stuffing as per given in the above recipe.


Add caption

Now for mat samosa, take a lemon sized ball and make an oval shaped roti of it. Cut this from middle and keep both the pieces on each other to form a “plus” shape  Now keep  a spoonful of  stuffing in the middle of this plus shape and take one side of this shape and fix it on the stuffing with the help of water if required. Fix the other side also. Now cut the remaining two sides in small ribbons and fix these small ribbon size plates alternatively on that stuffing part. It will form a pattern of mat. (See the collage for getting an idea. )
The mat samosa is ready. Now deep fry it and have it with tomato ketchup/ chutney as per your choice.

mat samosa and lahariya samosa pattern


For lahariya samosa, make an oval shape same like above out of dough. Now cut this roti/chapatti in between. Give slits to only one part and fix another half moon shape over the slitted shape with the help of water. Make triangular samosa as usual.

ready samosas

Deep fry it and have it with tomato ketchup/ chutney.


Enjoy !!!

मंडळी, यावेळी एकाच सारणापासून बनलेल्या दोन पाककृतींची माहीती इथे देत आहे.
  
चीझी मिरची वडा आणि दुसरी चीझी मॅट/लहरिया सामोसा. यात पाककृती दोन असल्या, तरीही मी सारण मात्र एकच वापरलं आहे. मला मिरची वडा करून पाहायचा होता, म्हणून सारण केलंच होतं आणि लहरिया/मॅट सामोसा करता येतो का तेही पाहायचं होतं. त्यामुळे मी दुसरं नेहमीचं सामोशाचं सारण केलंच नाही. पण त्यामुळे घरचे आणि ज्यांना टेस्ट करायला दिला असे दारचे सगळेच खूश झालेत. तर आता पाहू पहिली पाककृती -
१. चीझी मिरची वडा:माय मॅजिक



मिरची वडा हा जोधपूरमध्ये अगदी फेमस आहे. मग मी यात काय केलंय? तर फक्त सारण बदलून मज्जा आणली आहे.

साहित्य - भावनगरी मिरच्या १ पाव, प्रत्येकी १ कांदा, ढब्बू / सिमला मिरची, टोमॅटो, ५० ग्रॅम स्वीट कॉर्न, ८-१० लसणीच्या पाकळ्या, २ हिरच्या मिरच्या, पनीर २ इंच चौकोनी तुकडा, चीज हवं तेवढं, ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स - आवडीनुसार, मैदा २ टेबलस्पून , आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, ब्रेड क्रंब्स आणि तळण्यासाठी तेल. 

कृती - भावनगरी मिरच्या आतून साफ करून घ्याव्या. देठ मात्र तसंच ठेवायचं. सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. त्यात टोमॅटो चिरताना गर आणि बिया घ्यायच्या नाहीत.

एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यात हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, कांदा घालून परता. कांदा नेहमीसारखा गोल्डन ब्राउन वगैरेची आवश्यकता नाही. थोडासा मऊ झाला की बास. त्यात मक्याचे दाणे आणि शिमला मिरची घालून परत थोडे परता. ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. चवीनुसार मीठ घाला. सारण तयार. हे पूर्ण गार झालं की त्यात किसलेलं पनीर आणि चीज, चिरलेला टोमॅटो घाला.
आता मैद्यात पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करा. त्यातही चिमूटभर मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स घाला.
कढईत तेल तापत ठेवा. प्रत्येक मिरचीत हे सारण घट्ट दाबून भरा.

ही मिरची आधी मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवा. ही मिरची बाहेरून खूप गुळगुळीत असते, त्यामुळे परत ती पेस्टमध्ये बुडवून परत बेडच्या चुर्‍यात घोळवा. तळा आणि टोमॅटो केचपबरोबर खा.
नेहमीचंच सारण न भरता दुसरं सारण वापरल्याने याची टेस्ट आणखी छान लागते.
चीझी मॅट /लहरिया सामोसा - माय मॅजिक
Add caption

साहित्य -

सामोशाच्या आवरणासाठी - २०० ग्रॅम मैदा, २ टेबलस्पून तेल, चवीपुरतं मीठ, चिमूटभर ओवा, आवश्यकतेनुसार पाणी.
सारण - वरीलप्रमाणेच, म्हणजे प्रत्येकी १ कांदा, ढब्बू / सिमला मिरची, टोमॅटो, ५० ग्रॅम स्वीट कॉर्न, ८-१० लसणीच्या पाकळ्या, २ हिरच्या मिरच्या,पनीर २ इंच चौकोनी तुकडा, चीज हवे तेवढे, ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स - आवडीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती - पहिल्यांदा मैद्यात कडकडीत तेलाचे मोहन घाला. हे मिश्रण चमच्याने एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा घालून चांगले एकत्र करून घ्या. मैदा थोडा रवाळ दिसू लागतो आणि मुटका होतो सहज मुठीत घेतला तर. असं झालं म्हणजे आपलं मोहन नीट आहे आणि सामोसा नक्की खुसखुशीत होणार. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवा. वर दिल्याप्रमाणे सारण करून घ्या.
सारण

तयार सारण
आता मॅट सामोसा करताना मैद्याची मोठ्या लिंबाच्या आकाराची गोळी घेऊन तिची लांबट पोळी लाटा. ती मधून कापून मग अधिक + असा आकार होइल असे तिचे दोन भाग एकावर एक ठेवा. मध्ये सारण घाला आणि एका बाजूची घडी त्यावर नीट बसवा. गरज लागली तर पाण्याचं बोट फिरवा, म्हणजे नीट चिकटेल. तशीच दुसरीही बाजू चिकटवा. उरलेल्या दोन बाजूंना सुरीने चिरा पाडा आणि एकदा एका बाजूची पट्टी मध्यभागावर बसवा आणि नंतर दुसर्‍या बाजूची पट्टी त्यावर आडवी बसवा. अशा तर्‍हेने त्या सामोशाचं चटईसारखं डिझाइन तयार होईल. हा झाला मॅट सामोसा.
मी खाली सर्वसाधारण कल्पना यावी म्हणून एक कोलाज देतेय. आत मॅट सामोसा आणि लहरिया सामोसा दोन्ही कसे केले ते आहे.

कोलाज
लहरिया सामोसा करताना पहिल्यांदा अशीच लांब पोळी लाटून तिचे मधून दोन भाग करायचे. एका भागाला अशाच चिरा द्यायच्या आणि त्यावर दुसरा प्लेन भाग पाण्याने नीट चिकटवायचा. आता नेहमीच्या सामोशासारखा त्याला आकार देऊन सारण भरा आणि चिकटवा. या सामोशाला वरून आडव्या पट्ट्यांचं डिझाइन दिसतं. हा लहरिया सामोसा.


आता हे सामोसे नेहमीप्रमाणेच तेल तापवून घेऊन मग मंद आचेवर सावकाश तळा.
तयार सामोसे

मॅट/लहरिया सामोसा तयार आहे.
तर मग घ्या आस्वाद!!! 

Friday, 23 November 2018

Fruit Salad / फ्रुट सॅलड




Fruit Salad – My Magic

Recipe for: 3-4 people

Ingredients: 

1 Liter Milk, 3 tablespoon custard powder (I have used mango flavour here. You can use as per your choice), 3 tablespoon sugar, (adjust according to your taste), Fruits- as per your choice. I have used apples-2, 1 pomegranate, 2 chickoo (Sapodilla),  2 banana, and half papaya or a small papaya. As no fresh grapes were available, I have used black raisins by soaking it in luck warm water for 20 minutes and cherry for garnishing.

Method: 

Take half milk and reduce it on slow heat to half. Add sugar and let it dissolve completely). Now take the remaining milk and add the custard powder in it and mix properly so that no lumps are formed. Now cook this mixture on slow heat for 3 minutes with continuous stirring. Add this mixture to the milk and sugar mixture and mix it properly and cook it for 2 minutes. Let this mixture cool completely.
Now peel the fruits, and cut them in half inch sizes. Slice the bananas. Take out the seeds of pomegranate and add all this to the milk.
Keep this mixture in fridge for 2 hours before serving.
Enjoy this super yummy fruit salad.



फ्रुट सॅलड : माय मॅजिक

वाढणी: ३ -४ व्यक्तींसाठी

साहित्यः

 १ लिटर दूध, ३ टेबलस्पून कस्टर्ड पावडर, (मी मँगो फ्लेवर वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा घेउ शकता), ३ टेबलस्पून साखर, (किंवा तुमच्या आवडीनुसार कमी -जास्त करू शकता), फळे- आवडीनुसार. मी यात  2 सफरचंद, 1 डाळींब, 2 चिक्कू, 2 केळी आणि छोटि अर्धी पपई वापरली आहे. द्राक्षे नाही मिळाली म्हणून थोडे मनुके कोमट पाण्यात भिजवून वापरली आहेत आणि चेरी-सजावटीकरता.

कृती:

दुधातले अर्धा लिटर दूध आटवून अर्धे करुन घ्या. त्यातच साखर घाला आणि नीट वितळवून घ्या.
उरलेल्या दुधात कस्टर्ड पावडर नीट मिसळून ती ३ मिनिटांसाठी शिजवून घ्या. कस्टर्ड शिजवत असताना सतत हलवत रहायला लागतं नाहीतर खूप गुठळया होतात. नंतर हे कस्टर्ड आटवलेल्या दुधात घालून सगळे मिश्रण परत दोन मिनिटांकरता गरम करा आणि मग पूर्ण थंड होण्याकरता  बाजूला ठेवा.

त्यानंतर सगळ्या फळांची साले काढून ती अर्धा इंच आकारात चिरून घ्या,  डाळिंबाचे दाणे काढा आणि या दुधात घाला. भिजवलेले मनुके आणि चेरी घालून फ्रुट सॅलड फ्रिज मध्ये २ तास ठेवा आणि नंतर वाढा.
सुंदर चविष्ट फ्रुट सॅलड तयार आहे.

Wednesday, 31 October 2018

Coconut Karanji / ओल्या नारळाच्या करंज्या





Coconut Karanji:

I have started my Diwali Faral This year with this sweet recipe. Do try.
Ingredients:

1.           For Stuffing: 1.5 cups scrapped fresh coconut,1 cup sugar, 1 teaspoon cardamom powder.
2.      For Cover: Maida/all purpose flour 1 cup, fine semolina/rava 1.5 cup, 2 table spoon clarified butter/ghee/vanaspati as per your choice, 1 pinch salt,1 pinch sugar,  milk 1 cup
3.       For deep frying: oil/ghee

Method:

 Take maida/All purpose flour, semolina/rava, salt, sugar and clarified butter (Room temperature) in a mixing bowl and mix it properly for 3-4 minutes. The texture of the flour will become coarse. Then add milk slowly and knead a soft dough of it and keep it aside for half an hour.

Meanwhile take all the ingredients for stuffing except cardamom powder in a pan  and sauté on slow gas continuously. After 5 minutes, the mixture will start releasing the sides of pan. Add cardamom powder and switch off the gas. The stuffing is ready. After it becomes cool, it becomes somewhat dry. Take out this mixture from mixer so that it will be spread evenly and there will not be any lumps.



Now take the dough and knead it again as due to semolina, it becomes firm. You can use food processor for that. Now make small balls out of the dough.

Roll out a small thin puri of the ball. Add stuffing in the centre and join the sides of the puri in half moon shape. Make all the karanjis like that and deep fry it on slow flame.

Nice golden coloured, crispy and  heavenly karanjis are ready to serve.

Note: PLEASE ADD ADEQUATE STUFFING IN KARANJI..




मंडळी,आली दिवाळी. मी या वेळी ओल्या नारळाच्या  करंज्यांपासून फराळाला सुरुवात केली आहे. तर पाहू या कशा करायच्या ते.

साहित्य:

१. सारणासाठी: दीड कप खोवून घेतलेला ओला नारळ, १ कप साखर, १ टीस्पून वेलची पूड

२. आवरणासाठी: मैदा १ कप, बारीक रवा १/२ कप, २ टेबलस्पून साजूक तूप, चिमूटभर मीठ,चिमूटभर साखर, दूध पीठ भिजवायला लागेल तसे. मला १ कप आणि थोडेसे आणखी लागले.

३. करंज्या तळण्यासाठी तेल/तूप

कृती: पहिल्यांदा मैदा आणि रवा परातीत घेउन त्यात मीठ, साखर आणि तूप (थंडच) घातले आणि अगदी ३-४ मिनिटे नीट मिक्स करत राहिले. त्याने हे पीठ रवाळ दिसायला लागते. मग त्यात लागेल तसे दूध घेउन थोडासा मऊ गोळा मळून ठेवला. कारण त्यातला रवा फुलून गोळा बर्‍यापैकी घट्ट होतो. आता हा गोळा अर्ध्या तासासाठी ओलसर कपड्याने झाकून ठेवला.

सारणासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र केले आणि मंद गॅसवर सतत हलवत राहिले. हे मिश्रण कढईच्या बाजूने सुटू लागले तशी त्यात वेलची पूड घातली आणि गॅस बंद केला. हे झालं सारण तयार. हे गार झालं की एकदा मिक्सर मधून फिरवून घेतलं म्हणजे ते अगदी छान एकजीव होतं आणि करंजी फुटत नाही.



आता  मगाशी मळलेला पिठाचा गोळा परत घेतला  आणि मस्तपैकी फूड प्रोसेसर मधून काढला. नाहीतर ५ मिनिटे परत मळून घेतला तरी चालतो.  आता हा गोळा छान मऊ होतो.

याच्या पुरीसाठी लागतील एवढ्या आकाराच्या लाट्या करून घेतल्या. मग एक लाटी घेउन तिची पातळ पुरी लाटली. तिच्या मध्यावर २ चमचे सारण घातले.  पुरी करंजीच्या आकारात चिकटवण्यासाठी दुधाचे बोट फिरवले तरी चालते. मला नाही लागले. पुरी करंजीच्या आकारात कातून घेतली. याप्रमाणे सगळ्या करंज्या करून घेतल्या आणि तेलात तळल्या.

सूचना: या करंज्यांमध्ये सारण अगदी भरपूर घालावे  म्हणजे त्या सुरेख लागतात.



Sunday, 18 March 2018

Paneer Tikka Masala / पनीर टिक्का मसाला




Paneer Tikka Masala- My Magic

Recipe for : 4 people

Ingredients: 

250 grams cottage cheese, 2 big onions, 2 big tomatoes, 1 green bell pepper, 10 cashew nuts, 1 teaspoon ginger-garlic paste, 1 teaspoon garam masala, ½ teaspoon red chili powder, ½ teaspoon turmeric powder,  ½ teaspoon chaat masala, 1/52 teaspoon cumin seeds-coriander powder, ½ teaspoon kasoori methi, ½ cup hung curd, ½ cup full cream, 2 tablespoon butter+cooking oil, salt as per taste, a pinch of sugar, finely chopped coriander for garnishing.

Method:

Make cubes of paneer (cottage cheese) and just stir fry in a little butter. Keep aside.
Make fine paste of one onion and one tomato separately. Make square pieces of remaining 1 onion, tomato and green bell pepper.

Now mix hung curd, garam masala, chili powder, cumin-coriander seeds powder, chaat masala, turmeric powder, sugar properly and marinate paneer cubes in this for ½ hour.
In a pan heat oil+butter. When heated, add ginger garlic paste.When it’s done, add onion paste and when it’s done, add tomato paste. Add pieces of onion only. When this mixture starts separating oil, add paneer pieces and the spice mixture. Sauté it for 2 minutes. Add water as required. Make fine paste of cashew nuts in it. Add pieces of green bell pepper and tomato. Let this comes to boil. Now add kasoori methi and full cream. Add salt as per taste. Boil for 2 minutes more.

The tasty Paneer Tikka Masala is ready. Serve after garnishing with fresh coriander. Tastes very good with naan or paratha.



पनीर टिक्का मसाला: माय मॅजिक

पाककृती: ४ व्यक्तिंसाठी

साहित्यः 

२५० ग्रॅम पनीर, २ मोठे कांदे, २ मोठे टोमॅटो, १ ढोबळी मिरची, १० काजू१ टीस्पून आलं लसूण पेस्ट, १ टीस्पून गरम मसाला, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून चाट मसाला,१/२ टीस्पून धने-जिरे पावडर१/२ टीस्पून कसूरी मेथी, १/२ कप चक्का, १/२ कप साय, २ टेबलस्पून बटर आणि तेल, चवीपुरतं मीठ, किंचित साखर, सजावटीसाठी कोथिंबीर

कृती: 

पनीर चे चौकोनी आकारात काप करुन ते थोड्याशा बटर मध्ये परतून बाजूला काढा.
१ मोठा कांदा आणि १ टोमॅटो यांची मिक्सर मधून बारीक पण वेगवेगळी पेस्ट करून घ्या. १ कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची यांचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या.
चक्का, गरम मसाला, तिखट, धने-जिरे पावडर, चाट मसाला, हळद, साखर हे सगळं एकत्र करुन त्यात हे पनीरचे तुकडे घालून सगळं एकत्र करा. 


एका पॅन मध्ये तेल+बटर तापत ठेवा. तापले की त्यात आलं लसूण पेस्ट घाला. ती परतली गेली की कांद्याची पेस्ट, टोमॅटो ची पेस्ट घालून चांगलं परता. कांद्याचे तुकडे घाला. परता. त्यात हे पनीरचे तुकडे आणि सगळा मसाला घाला. एक -दोन मिनिट परतून त्यात हवं तेवढं पाणी घाला. काजूची अगदी बारीक पेस्ट करून ती यात घाला. आता ढोबळी मिरची आणि टोमॅटो चे तुकडे घालून एक उकळी आणा. कसूरी मेथी थोडिशी चुरून घाला. साय फेटून घाला आणि आणखी २ मिनिटे उकळा. 

अतिशय स्वादिष्ट असा पनीर टिक्का मसाला तयार आहे. वाढताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढा. पराठा, नान बरोबर मस्तच लागतो.


Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...