Saturday, 5 December 2020

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

 

Fresh turmeric pickle: My Magic



Ingredients:

 ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspoon fenugreek seeds, 2 teaspoon mustard seeds, ½ teaspoon asafetida, ½ teaspoon turmeric powder, salt according to taste and oil.

Method: 

First of all clean and peel the fresh turmeric and ginger. Grate both or chop finely in food processor.

Heat a teaspoonful oil and fry fenugreek seeds and mustard seeds. After cooled down, powder this and keep aside.

Now heat almost 100 gm oil and prepare the tempering by adding mustard seeds, asafetida and turmeric powder. Cool it completely.

Cut the chilies. Now mix the chili, fresh turmeric, ginger, fenugreek and mustard powder, lemon juice, salt. Add tempering to this.

A tasty pickle is ready. This pickle can be taken immediately.

 

ओल्या हळदीचे लोणचे: माय मॅजिक



साहित्यः

अर्धा किलो ओली हळद, पाव किलो आलं, पाव किलो हिरव्या मिरच्या, ते ४ मोठ्या लिंबांचा रस,१ टीस्पून मेथी दाणे, २ टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ,  तेल.

कृती: 

सर्व प्रथम ओली हळद आणि आलं स्वच्छ धुवून  त्यांची साले काढून घ्या. नंतर हळद आणि आलं फूड प्रोसेसर मधून अगदी बारीक करुन घ्या. वाटलं तर आपण हे दोन्ही किसू शकतो.

नंतर एक कढल्यात चमचाभर तेल घालून त्यात मेथी दाणे आणि मोहरी तळून घ्या. गार झाल्यावर हे दोन्ही मिक्सरमधून दळून घ्या. परत थोडे जास्त तेल तापवून (मी जवळपास एक वाटी तेल घेतले होते) त्यात मोहरी, हिंग,हळद यांची फोडणी करुन घ्या.

हिरव्या मिरच्यांचे तुकडे करा. आता हळद, आलं यांचे तुकडे/कीस, मिरचीचे तुकडे, लिंबू रस, मोहरी, मेथीची पूड आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. फोडणी पूर्ण गार झाली की या लोणच्यावर घाला.

हे स्वादिष्ट लोणचे लगेच ही खाण्यास घेता येते.

Satori / साटोरी

 Satori: My Magic






This is one of the best festive sweets in India.

Ingredients:

1.       For stuffing: ¼ kg. Khoya (Milk Solids), 1 small bowl fine semolina, ¼ kg or less powdered sugar, 1 teaspoon powdered cardamom, 1-2 teaspoon milk if required.

2.       For cover of satori: take fine semolina and maida/ All purpose flour  in equal proportions  to 3 small bowls, 3 teaspoon clarified butter/Desi ghee, salt as per taste, water for kneading dough.

3.       Clarified butter/desi ghee for frying satori.

Method:

 Dry Roast Khoya on slow flame . Heat one teaspoon of desi ghee and roast fine semolina on slow flame. Mix roasted khoya, semolina, powdered sugar, cardamom powder and if the stuffing is dry, add 1-2 teaspoon of milk to knead a soft dough.

For cover, add refind/all purpose flour/maida and fine semolina. Add a pinchful of salt. Heat 3 teaspoon desi ghee and add in this. Mix well . Add water as per requirement to knead a semi soft dough. Cover it and set aside for half an hour.

After half an hour, make lemon sized balls of stuffing and dough. Prepare a small puri by stuffing the khoya mix in dough.

Roast the puri on slow flame. Then add some desi ghee and roast both sides.

You can deep fry the satories also.

An awesome treat is ready.

 

साटोरी: माय मॅजिक



हा एक अतिशय स्वादिष्ट, खमंग असा पक्वान्नाचा प्रकार आहे.

साहित्यः

१. सारणासाठी:पाव किलो खवा, एक वाटी बारीक रवा, पाव किलो पेक्षा थोडी कमी पिठी साखर, वेलची पूड १ टीस्पून, लागलं तर 1-2 टीस्पून दूध.

२. साटोरीच्या आवरणासाठी: बारीक रवा आणि मैदा समप्रमाणात एकूण तीन वाट्या, ३ टीस्पून साजुक तूप, चवीनुसार मीठ, पीठ मळण्याकरता पाणी.

३. साटोरी भाजण्यासाठी - साजूक तूप.

कृती:

खवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप गरम करुन त्यात बारीक रवा ही खमंग भाजून घ्या. हे दोन्ही एकत्र करुन त्यात पिठी साखर आणि वेलची पूड नीट मिसळून सारण तयार करा.नीट गोळा होत नसेल तर 1-2 टीस्पून दूध घाला.

आवरणासाठी: रवा, मैदा एकत्र करुन त्यात थोडंसं मीठ घाला. ३ टीस्पून तूप कडकडीत गरम करुन यात घाला. नीट मिक्स करुन त्यात जरुरीनुसार पाणी घालून मिश्रणाचा घट्ट गोळा करुन अर्धा तास झाकून ठेवा.

अर्ध्या तासाने पीठ आणि सारण दोन्हीचेही लिंबाएवढे गोळे करावेत. पिठाची पारी करुन त्यात सारणाचा गोळा ठेवून तो गोळा छोट्या पुरीएवढा लाटून घ्या. लाटताना पीठ घ्यायला लागू नये.

तवा गरम करावा आणि त्यावर या पुर्‍या अगदी मंद आचेवर आधी जराशा शेकाव्या आणि मग तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजाव्या.

काही लोक तुपात तळतातही, पण मी या फक्त तूप सोडून भाजल्या आहेत.

एक सुंदर पदार्थ तयार आहे.

 

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...