Two coloured
Surali vadi/Khandvi- My Magic
Ingredients:
1.5
cups Besan (chickpea flour), 4 cups buttermilk (don’t take too sour), 2
teaspoon maida/all purpose flour, ½ teaspoon turmeric powder, 10-15 spinach
leaves – big in size, 1 teaspoon ginger- garlic paste, 1 green chili, salt as
per taste, ½ cups each fresh scrapped coconut and finely chopped coriander
leaves, for tempering 1 tablespoon oil, 1 teaspoon mustard seeds,1 pinch asafetida
Method:
Blanch the
spinach (palak) leaves for 2 minutes and grind finely with green chili and
ginger-garlic paste. This paste measures about ½ cup. Now add 1 teaspoon all
purpose flour/Maida, 1.5 cup besan, 1.5 cups buttermilk and salt as per taste. Mix
properly. Now cook this mixture while continuously stirring. No lumps should be
formed at all. When the mixture is cooked properly (It should not fall from the
spatula easily), take one steel plate and spread the mixture on the backside of the plate very fast. Apply
a thin layer. Otherwise if the mixture cools down, you will not be able to
spread it evenly. Then just mark
vertically with the help of knife for making the vadi/khandvi. In this
measurement, you can apply this mixture on 2 large steel plates . Keep these plates
aside.
Now take 1.5 cups
besan, 1 teaspoon maida/all purpose flour, 1/5 teaspoon turmeric powder, 2.5
cups buttermilk and salt as per taste. Cook this mixture also in the same
manner as above and keep two plates ready and mark it vertically also.
Make tempering by
heating oil in a pan. Add the mustard seeds and when it splutters, add asafetida.
Just add a teaspoonful of this tempering on these four plates.
Now just roll on
one spinach surali vadi by rolling the spread spinach mixture as per the mark
we have made. Prepare all surali vadi/khandvis like this from palak(spinach
mixture).
Now, take one
palak surali vadi/khandi and place it on the plate where besan mixture has been
spread. Roll on the besan surali
vadi/khandvi keeping the palak surali vadi in the middle. Likewise prepare all
the two coloured surali vadi/khandvis.
Now arrange all
the surali vadis/ khandvis in a serving bowl and garnish this with the fresh scrapped coconut,
chopped coriander and the remaining tempering. Enjoy the silky surali vadi/khandi with your
loved ones.
सुरळीच्या दुरंगी वड्या: माय मॅजिक
साहित्यः
१.५ वाट्या डाळीचे पीठ, ४
वाट्या ताक (खूप आंबट नको), २ टीस्पून मैदा, १/२ टीस्पून हळद,
१०-१५
पालक ची मोठी मोठी पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, १
हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, १/२ वाटी ओलं
खोबरं खोवून, १/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरून, फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, हिंग
कृती:
पालकाची पाने २ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात
घालून लगेच बाहेर काढून थंड पाण्याखाली धरावीत. नंतर ही ब्लांच केलेली पाने,
आलं
लसूण पेस्ट, हिरवी मिरची हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे.
ही पेस्ट अर्धी वाटी होते साधारणपणे. त्यात अर्धी वाटी डाळीचे पीठ, १
टीस्पून मैदा , १.५ वाट्या ताक आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे
मिश्रण छान मिसळून घ्यावे. यात गुठळी होता कामा नये. हे मिश्रण एका पातेल्यात घेउन
गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून सतत ढवळत रहा.
हे काम फार फटाफट करायला लागतं. नाहीतर यात गुठळ्या होतात आणि पीठ खाली लागू
शकतं. हे मिश्रण शिजलं की (म्हणजे उलथनं
वर उचललं की सहजासहजी खाली पडणार नाही असं शिजलं की) एक ताट घेउन त्याच्या मागच्या
बाजूला भराभर हे गरम मिश्रण अगदी पातळ पसरायचं. या प्रमाणासाठी दोन मोठी ताटे
लागतात.
आता एक वाटी डाळीचे पीठ, १ टीस्पून मैदा,
१/२ टीस्पून हळद, २.५ वाट्या ताक आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे
मिश्रणही वरील प्रमाणेच गुठळ्या होउ न देता शिजवायचं आणि दुसर्या दोन ताटांच्या
मागच्या बाजूला भराभर पसरायचं.
या चारही ताटांवरच्या मिश्रणावर सुरीने वड्या
करण्यासाठी उभ्या रेषा पाडा.
आता एका कढल्यात नेहमीप्रमाणे तेल, मोहरी,
हिंगाची
चरचरीत फोडणी करून घ्या. अगदी थोडीथोडी या चारही ताटांवरच्या मिश्रणावर घाला.
आता पहिल्यांदा पालकाच्या वड्या गुंडाळी करून
तयार करून घ्या.
आता एक पालक सुरळी वडी नुसत्या डाळीच्या सुरळी
वड्यांच्या ताटावर रेष मारलेल्या जागी ताटाच्या खालच्या बाजूला ठेवा आणि पिवळी
सुरळीची वडी पालकाच्या वडीसहित गुंडाळा. अशा प्रकारे सर्व दुरंगी वड्या करून घ्या.
एका बाउल मध्ये या सर्व वड्या काढून नीट सजवा. वरून
चिरलेली कोथिंबीर, खोबरं आणि उरलेली फोडणी घालून खायला द्या या
मलमली दुरंगी सुरळीच्या वड्या.