Monday, 15 April 2019

Vegetable Pulao / व्हेजिटेबल पुलाव



Vegetable  Pulao- My Magic

Recipe For: 6 people

Ingredients:

1.5 cup Basmati or any other long grained rice, 1.5 cup mix vegetables cut finely (I have taken carrot,cauliflower, french beans, green peas), 7-8 cashew nuts (optional), Each two of black peppercorns, cloves, green cardamoms 1 bay leaf,1 inch piece of cinnamon, 2 garlic buds, half inch ginger, 1 finely cut green chili, 2 onions vertically sliced thinly , 1 onion cut finely,  each half teaspoon of cumin seeds and caraway seeds, for tempering 2 teaspoons of oil. clarified butter, salt as per taste and water as required.

Method: 

Rince rice in water for 2-3 times and keep for half an hour. Take one small piece of cloth and tie Each two of black peppercorns, cloves, green cardamoms 1 bay leaf,1 inch piece of cinnamon, 2 garlic buds, half inch ginger, 1 finely cut green chili in it. 
Take oil/clarified butter in a pan. Once heated add cumin seeds and caraway seeds. Add finely cut onion add saute till the onion turns golden. Add cashew nuts. Add tied bundle of spices, vegetables and saute for one more minute. Add 3 cups water and cook till the vegetables are half done on high flame. Add rice and salt. Mix gently and cover the pan and cook on slow flame for 15 minutes. A perfectly cooked, nice vegetable pulao is ready. Deep fry the sliced onion for garnishing the pulao and serve it with vegetable gravy, salad.

Enjoy the yummy pulao.


व्हेजिटेबल पुलाव- माय मॅजिक

वाढणी: ६ व्यक्तींसाठी

साहित्यः 

१.५ कप बासमती किंवा लांब दाण्याचा कुठलाही  तांदूळ, १.५ कप चिरलेल्या मिक्स भाज्या (यात मी  गाजर, फ्लॉवर, फ्रेंच बीन्स, मटार घेतल्या आहेत. ) ७-८ काजू (ऐच्छिक), प्रत्येकी २ मिरी, लवंगा, वेलदोडे,  १ तमाल पत्र, १ इंचाचा दालचिनीचा तुकडा,  २ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच  आलं, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ कांदे अगदी पातळ उभे चिरून, १ कांदा बारीक चिरून,  प्रत्येकी  अर्धा टी स्पून जिरे आणि शहाजिरे,  फोडणीकरिता २ टी स्पून तेल किंवा साजूक तूप, चवीनुसार मीठ, पाणी.

कृती:

तांदूळ २-३ वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. एका छोट्या रुमालात प्रत्येकी २ मिरी, लवंगा, वेलदोडे,  १ तमाल पत्र, १ इंचाचा दालचिनीचा तुकडा, २ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच  आलं, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची बांधा. 

आता एका पॅन मध्ये साजूक तूप्/तेल घ्या. तापले की त्यात जिरे + शहाजिरे घाला. बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होइतो परता. त्यात सगळ्या भाज्या घालून मिनिटभर परता. काजू घाला. आता मसाल्याची पुरचुंडी त्यात घालून ३ कप पाणी घालून भाज्या अर्धवट शिजेतो २ मिनिट गॅस मोठा ठेवा. आता त्यात तांदूळ घालून हलक्या हाताने ढवळून त्यात मीठ घाला. झाकण ठेवून मंदाग्नीवर १५ मिनिटे शिजूदे. सुंदर मोकळा व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. वाढताना त्यावर जो लांब चिरलेला कांदा आहे तो तळून पुलाव वर घालून द्यावा. सोबत व्हेज ग्रेव्ही, सॅलड द्यावे.

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...