Monday, 15 April 2019

Vegetable Pulao / व्हेजिटेबल पुलाव



Vegetable  Pulao- My Magic

Recipe For: 6 people

Ingredients:

1.5 cup Basmati or any other long grained rice, 1.5 cup mix vegetables cut finely (I have taken carrot,cauliflower, french beans, green peas), 7-8 cashew nuts (optional), Each two of black peppercorns, cloves, green cardamoms 1 bay leaf,1 inch piece of cinnamon, 2 garlic buds, half inch ginger, 1 finely cut green chili, 2 onions vertically sliced thinly , 1 onion cut finely,  each half teaspoon of cumin seeds and caraway seeds, for tempering 2 teaspoons of oil. clarified butter, salt as per taste and water as required.

Method: 

Rince rice in water for 2-3 times and keep for half an hour. Take one small piece of cloth and tie Each two of black peppercorns, cloves, green cardamoms 1 bay leaf,1 inch piece of cinnamon, 2 garlic buds, half inch ginger, 1 finely cut green chili in it. 
Take oil/clarified butter in a pan. Once heated add cumin seeds and caraway seeds. Add finely cut onion add saute till the onion turns golden. Add cashew nuts. Add tied bundle of spices, vegetables and saute for one more minute. Add 3 cups water and cook till the vegetables are half done on high flame. Add rice and salt. Mix gently and cover the pan and cook on slow flame for 15 minutes. A perfectly cooked, nice vegetable pulao is ready. Deep fry the sliced onion for garnishing the pulao and serve it with vegetable gravy, salad.

Enjoy the yummy pulao.


व्हेजिटेबल पुलाव- माय मॅजिक

वाढणी: ६ व्यक्तींसाठी

साहित्यः 

१.५ कप बासमती किंवा लांब दाण्याचा कुठलाही  तांदूळ, १.५ कप चिरलेल्या मिक्स भाज्या (यात मी  गाजर, फ्लॉवर, फ्रेंच बीन्स, मटार घेतल्या आहेत. ) ७-८ काजू (ऐच्छिक), प्रत्येकी २ मिरी, लवंगा, वेलदोडे,  १ तमाल पत्र, १ इंचाचा दालचिनीचा तुकडा,  २ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच  आलं, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ कांदे अगदी पातळ उभे चिरून, १ कांदा बारीक चिरून,  प्रत्येकी  अर्धा टी स्पून जिरे आणि शहाजिरे,  फोडणीकरिता २ टी स्पून तेल किंवा साजूक तूप, चवीनुसार मीठ, पाणी.

कृती:

तांदूळ २-३ वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. एका छोट्या रुमालात प्रत्येकी २ मिरी, लवंगा, वेलदोडे,  १ तमाल पत्र, १ इंचाचा दालचिनीचा तुकडा, २ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच  आलं, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची बांधा. 

आता एका पॅन मध्ये साजूक तूप्/तेल घ्या. तापले की त्यात जिरे + शहाजिरे घाला. बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होइतो परता. त्यात सगळ्या भाज्या घालून मिनिटभर परता. काजू घाला. आता मसाल्याची पुरचुंडी त्यात घालून ३ कप पाणी घालून भाज्या अर्धवट शिजेतो २ मिनिट गॅस मोठा ठेवा. आता त्यात तांदूळ घालून हलक्या हाताने ढवळून त्यात मीठ घाला. झाकण ठेवून मंदाग्नीवर १५ मिनिटे शिजूदे. सुंदर मोकळा व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. वाढताना त्यावर जो लांब चिरलेला कांदा आहे तो तळून पुलाव वर घालून द्यावा. सोबत व्हेज ग्रेव्ही, सॅलड द्यावे.

Tuesday, 1 January 2019

Lavang-Latika/लवंग लतिका



Lavang-Latika: My Magic
This is very famous and traditional Bengali sweet dish.


Ingredients: 
200 grams each of all-purpose flour and khoya(Milk solids), and sugar, 1 pinch salt, 4 tablespoon clarified butter (Desi ghee)+ desi ghee for deep frying as per requirement, green cardamom powder 1 teaspoon, edible green colour (totally optional. I have used it as per my liking. It’s not included in the traditional recipe), and most important ingredient is Cloves 15-20. Take the most beautiful looking cloves from your stock. And water as per requirement. 1 teaspoon rose essence.
Method: 
Take all-purpose flour and add pinch of salt and 4 tablespoon of desi ghee and mix properly so that the texture will become somewhat coarse. Then add green colour, mix again and water slowly to make a firm dough. Cover it and keep it aside for half an hour.

Now grate the khoya and fry it on a very slow flame. Keep stirring it continuously. When it becomes light pink in colour, add 4 teaspoon of sugar and stir it. It will become somewhat liquid but within 1-2 minutes, it will become solid again. Now add cardamom powder and keep it aside to cool down completely. When it becomes cool, make small 15 rectangular pieces of this khoya mixture.

Now knead again the firm dough so that it becomes soft. Make 15 balls out of this dough.
Take one ball and roll it to a big size puri. Keep one rectangular piece of khoya in centre of  the puri. Now fold the puri same like we fold the betel leaf. Take the help of water for sticking the folds if needed. Make exactly the shape of paan (Vida) and Secure the ready lavang latika with a clove in centre. Make all the lavang latika like this.

Now take the remaining sugar and add water just to cover the sugar. Make 2 strings sugar syrup and add rose essence in it. 
Take desi ghee in a kadhai and heat it on high flame. When it’s heated properly, keep the flame on very low. Fry all the lavang latika on a very slow flame so that it becomes crispy. When done, soak these lavang latika in hot sugar syrup for half a minute and take it out.

Serve it as a dessert. Enjoy.


लवंग लतिका-माय मॅजिक
लवंग लतिका ही एक बंगाली पारंपारिक पाककृती आहे.

साहित्य:
प्रत्येकी २०० ग्रॅम मैदा, खवा, साखर आणि चवीपुरतं मीठ, ४ टेबल स्पून तूप + तळणीसाठी तूप , वेलची पूड, खाण्याचा हिरवा रंग. (हा मूळ पाककृतीमध्ये नाही. पण मी घातला आहे. पूर्णपणे ऐच्छिक) आणि आवश्यकते नुसार पाणी, थोडासा रोझ इसेन्स . सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे लवंगा. १५-२० लागतील. तुमच्याकडे असलेल्या लवंगांमधल्या सर्वात सुंदर लवंगा घ्या.
कृती:
मैदा, चवीपुरते मीठ, ४ टे.स्पू. तूप असं आधी छान एकत्र करून घ्या. असं तूप चोळून ठेवल्याने मैदा थोडासा रवाळ दिसायला लागतो. तूप अगदी हयगय न करता घालायचं बरंका. म्हणजे हातात मैदा घेऊन मूठ झाकून उघडली की मुटका झालेला दिसायला हवा. मग आवश्यकतेनुसार त्यात हळूहळू पाणी घातलं आणि चांगला घट्ट गोळा मळून घ्या. मळताना त्यात हिरवा रंगही घाला. आणि तो गोळा अर्धा तास झाकून ठेवा.

दुसरीकडे खवा किसून मंद आचेवर परतत ठे वा. सतत हलवत राहिले कारण खाली लागायला नको म्हणून. तो छान गुलबट दिसायला लागला तशी त्यात ४ चमचे साखर घा ला. मग तो परत पातळ झाला. आणखी 2 मिनिटे  परतल्यावर घट्ट होतो. मग त्यात वेलची पावडर घा ला आणि ढवळून थंड व्हायला बाजूला ठेवा. तो थंड झाला की मग त्याचे छोटेछोटे आयताकृती तुकडे करून घ्या.
आता तो मळलेला मैद्याचा गोळा परत थोडासा मळा म्हणजे तो मऊ होइल. मग त्या मैद्याच्याही पुरीला लागेल त्यापेक्षा मोठ्या अशा १५ लाट्या करून घ्या.
आता एक मोठी पुरी लाटा. तिच्या बरोबर मध्ये खव्याचा तुकडा ठेवा आणि पुरीच्या कडेने पाण्याच बोट फिरवा. ती नीट चिकटावी म्हणून. मग आपण विड्या साठी पानाच्या जशा घड्या घालतो तशा या पुरीच्या दोन्ही बाजूंनी एकावर एक अशा घड्या घाला. मग ही घडी उलटून घ्या आणि ज्या बाजू चिकटवल्या नव्हत्या त्यांनाही पाणी लावून घ्या आणि त्या एकमेकांवर चिकटवा.
मग त्या पुरीला छानपैकी विड्याचा आकार द्या आणि खोचा एक लवंग त्यावर.  खालील कोलाज बघा म्हणजे कल्पना येईल.


आता त्या उरलेल्या साखरेत ती बुडेल इतकं पाणी घालून तिचा दोन तारी पाक करून घ्या, त्यात रोझ इसेन्स घाला आणि एकीकडे कढईत तूप गरम करायला ठेवा. आता मंदाग्नीवर अगदी सावकाश या लवंग लतिका तळायच्या आणि गरम पाकातच घालायच्या. त्यामुळे अगदी मन लावून तशा त्या सावकाश तळल्या आणि मग एकेक लवंग लतिका सोडली पाकात. अगदीच १० सेकंद. लगेच काढून ठेवली प्लेटमध्ये.



तुम्हीही करून पहा आणि घ्या आस्वाद या लवंग लतीकेचा.


Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...